महारेराच्या दलालांच्या परीक्षेत ४१६५ उमेदवार उत्तीर्ण, निकाल जाहिर| Maharera Agent Result PDF
Maharera Agent Result PDF maharera.mahaonline.gov.in
Maha RERA Result of Agent Exam Link 2024
महारेराच्या दलालांच्या पाचव्या प्रशिक्षण प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत ४७५९ उमेदवरांपैकी ४१६५ उमेदवार पास झाले आहेत. या परीक्षेचा ८७ टक्के निकाल लागला आहे. त्यात मुंबई आणि पुण्यातील दोघांना १०० टक्के मिळवले आहेत.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
रेरा कायद्यानुसार दलालांना महरेरा नोंदणी बंधनकारक आहे. आता महारेरा प्रशिक्षण आणि प्रशिक्षण प्रमाणपत्रही बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमानुसार महारेराकडून नुकतीच पाचवी प्रशिक्षण प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला ४७६९ उमेदवार बसले होते. त्यातील ४१६५ यशस्वी झाले आहेत. त्यात ३५५३ पुरुष आणि ६१२ महिलांचा समावेश आहे. उत्तीर्ण उमेदवारांपैकी १९६ उमेदवार ज्येष्ठ नागरिक असून त्यात १२ महिला आहेत. या निकालात मुंबईच्या शरद मोटा आणि पुण्याच्या दिवेश माहेश्वरी या दोघांनी १०० टक्के गुण मिळवून संयुक्तपणे गुणानुक्रमे पहिले स्थान मिळवले आहे. आतापर्यंत झालेल्या पाचही परीक्षांमधून १३,३७० उमेदवार दलाल म्हणून पात्र ठरले आहेत. त्यात आताच्या परीक्षेत ४१६५,पहिल्या परीक्षेत ४०५ आणि दुसऱ्या परीक्षेत २८१२ , तिसऱ्या परीक्षेत ४४६१ आणि चौथ्या परीक्षेत १५२७ असे हे एकूण १३,३७० पात्र उमेदवार आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्यात सुमारे ४७ हजार दलाल नोंदणीकृत होते. त्यापैकी १३ हजार ७८५ दलालांनी नूतनीकरण न केल्याने त्यांची नोंदणी रद्द करण्यात आलेली आहे. त्यानंतर एप्रिल अखेर महारेराने २० हजार पेक्षा जास्त दलालांनी प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र मिळविण्याच्या अटींची ३१ डिसेंबर पर्यंत पूर्तता केली नाही. त्यामुळे त्यांची नोंदणी स्थगित करून त्यांना काही अटीसापेक्ष या क्षेत्रात काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
Maharera Result PDF: Maha RERA Had Published an advertisement for 37 Vacant position of Senior Clerk, Junior Clerk, Clerk, Steno-Typist, Higher-Grade Steno. For this Maha Rera has published a list of eligible candidates who have been short listed for theser posts. Also Maha Rera has issued a list of candidates who are rejected for above mentioned posts with the ground Of Rejection Mentioned in the list.
महारेराने वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लिपिक, लघुलेखक, उच्च श्रेणीतील लघुलेखकांच्या ३७ रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित केली होती. यासाठी महारेराने या पदांसाठी शॉर्ट लिस्ट केलेल्या पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. तसेच महारेराने वर नमूद केलेल्या पदांसाठी नाकारलेल्या उमेदवारांची यादी जारी केली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
Maha Rera Selection List and Waiting List
1 | Select list and wait list of Higher Grade Stenographer |
Download Maha Rera Clerk Result 2024
Sr.No | Subject | Date | Document |
---|---|---|---|
1 | Grounds of rejection and list of rejected candidates for the post of Senior Clerk With reference to Advertisement No. 01/2024 | ||
2 | List of eligible candidates for the Post of Senior Clerk With reference to Advertisement No. 01/2024 | ||
3 | Grounds of rejection and list of rejected candidates for the post of Junior Clerk With reference to Advertisement No. 01/2024 | ||
4 | List of eligible candidates for the Post of Junior Clerk With reference to Advertisement No. 01/2024 | ||
5 | Grounds of rejection and list of rejected candidates for the post of Clerk With reference to Advertisement No. 01/2024 | ||
6 | List of eligible candidates for the Post of Clerk With reference to Advertisement No. 01/2024 | ||
7 | Grounds of rejection and list of rejected candidates for the post of Steno-Typist With reference to Advertisement No. 01/2024 | ||
8 | List of eligible candidates for the Post of Steno-Typist With reference to Advertisement No. 01/2024 | ||
9 | Grounds of rejection and list of rejected candidates for the post of Higher-Grade Steno With reference to Advertisement No. 01/2024 | ||
10 | List of eligible candidates for the Post of Higher-Grade Steno With reference to Advertisement No. 01/2024 |
Maharera Peon Result 2023
Maharera Result PDF: With rererence to advertisement no. 05/2023 dt.31/1o/2023 list of candidates selected for the post of Peon has been issued. Those candidates who have applied for Maharera Peon Bharti can download Maharera Peon Selection List form below link.
दि.३१/१०/२०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरात क्र. ०५/२०२३ शिपाई पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी जारी करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी महारेरा शिपाई भरती साठी अर्ज केला आहे ते महारेरा शिपाई निवड यादी खालील लिंकवर डाउनलोड करू शकतात. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Maharera Peon Selection List
Maharera Result 2023
Maharera Result PDF: ‘Maharera’ has made examination and certification mandatory for brokers in the construction business and ‘Maharera’ conducted the first examination for brokers on 20th May. The result of this exam has been declared and 96 percent candidates have passed in this exam. 423 people appeared for the exam. Out of them 405 candidates have passed. ‘Maharera’ has prepared a syllabus for this and conducted the first exam on May 20 after training the brokers.
‘महारेरा’ने बांधकाम व्यवसायातील दलालांसाठी परीक्षा आणि प्रमाणपत्र बंधनकारक केले असून ‘महारेरा’ने दलालांसाठी २० मे रोजी पहिली परीक्षा घेतली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत ९६ टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेला ४२३ जण बसले होते. त्यापैकी ४०५ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Real Estate Agent Training Certification Result 2023
रेरा कायद्यानुसार विकासक आणि स्थावर संपदा क्षेत्रातील दलालांना महारेरा नोंदणी बंधनकारक आहे. ही नोंदणी असेल तरच दलाल म्हणून काम करता येते. मोठया संख्येने ग्राहक दलालांच्या माध्यमातूनच घर खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात. पण अनेक वेळा ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. महत्त्वाचे म्हणजे या क्षेत्रात दलाल म्हणून काम करण्यासाठी कोणतेही शिक्षण – प्रशिक्षण नाही. त्यामुळे कोणीही हा व्यवसाय करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या, या क्षेत्रातील कोणतेही ज्ञान नसलेल्यांना रोखण्यासाठी ‘महारेरा’ने महारेरा प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.
‘महारेरा’ने १० जानेवारी २०२३ च्या आदेशान्वये दलालांची नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी प्रशिक्षण घेऊन विहीत प्रमाणपत्र मिळविणे बंधनकारक केले आहे. तसेच सुमारे २९ हजार जुन्या नोंदणीकृत दलालांनाही १ सप्टेंबरपूर्वी हे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करावे लागणार आहे.
‘महारेरा’ने यासाठी अभ्यासक्रम तयार केला असून दलालांना प्रशिक्षण देऊन २० मे रोजी पहिली परीक्षा घेतली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ४२३ पैकी ४०५ दलाल उत्तीर्ण झाले आहेत. एकूण ९६ टक्के निकाल लागला असून तब्बल ५ उमेदवारांनी ९० टक्के गुण मिळवून संयुक्तपणे गुणानुक्रमे पहिले स्थान मिळवले आहे. तर ४०५ पैकी ३६ उमेदवार हे ६० वर्षांवरील आहेत. यातही ६ उमेदवार ७० वर्षांवरील असून या सर्वांनी ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये मुंबईतील एस. एम. मालदे हे सर्वात ज्येष्ठ नागरिक असून ते ७४ वर्षांचे आहेत.
या परीक्षेत महिलांनी बाजी मारली आहे. उत्तीर्ण ४०५ उमेदवारांत ३७ महिला उमेदवारही आहेत. या परीक्षेत ९० टक्के गुण मिळविणाऱ्या पाच जणांमध्ये पुण्यातील गीता छाब्रिया यांचा समावेश आहेत. दरम्यान, दलालांसाठी प्रशिक्षण, परीक्षा आणि त्याअनुषंगाने प्रमाणपत्र बंधनकारक करणारे देशातील हे पहिले आणि एकमेव राज्य आहे.
Real Estate Agent Training Certification Exam Result
क्रमांक | विषय | तारीख | डाउनलोड |
---|---|---|---|
1 | परीक्षेचा निकाल | 20/05/2023 | Download |
Table of Contents
Bharti cha result kadhi lagel…