महाराष्ट्राने मागील पाच वर्षांत मनरेगा अंतर्गत रोजगार निर्मितीत देशात सर्वाधिक प्रगती केली आहे.
मनरेगामध्ये महाराष्ट्रात तयार झालेले ‘मनुष्य दिवस’ तब्बल २.५५ पट वाढले आहेत —
२०१९-२० मध्ये ६२९.५८ लाख मनुष्य दिवस होते, ते आता १,६११.२० लाखांवर गेले आहेत.

राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक वेगाने वाढ
देशपातळीवर मनरेगातील वाढ केवळ ८% इतकी होती, तर महाराष्ट्राची वाढ याच कालावधीत २५५% झाली आहे — यामुळे राज्य सर्वाधिक वेगाने ग्रामीण रोजगार निर्माण करणारे राज्य ठरले आहे.
ग्रामीण कुटुंबांना मनरेगाचा मोठा आधार
- राज्यात ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी मर्यादित असल्याने अनेक कुटुंबे मनरेगावर अवलंबून आहेत.
- विशेषतः कोरोनाकाळात या योजनेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला होता.
‘मनुष्य दिवस’ म्हणजे काय?
- ‘मनुष्य दिवस’ म्हणजे एका व्यक्तीने एका दिवसात केलेल्या कामाची मोजणी.
- मनरेगात प्रत्येक व्यक्तीने प्रतिदिन केलेलं काम एक मनुष्य दिवस मानलं जातं.
२०२४-२५ साठी मनरेगाचा निधी आणि इतर राज्यांची स्थिती
- उत्तर प्रदेशने २०२४-२५ मध्ये ३,३३७.९१ लाख मनुष्य दिवसांसह आघाडी घेतली.
- मात्र, वाढीच्या टक्केवारीत महाराष्ट्रानेच सर्व राज्यांना मागे टाकले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















