JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

वनसेवक भरती लवकरच सुरु होणार, २०२६ मध्ये भरतीचा मुहूर्त! | Maharashtra Van Sevak Bharti 2026

Maharashtra Van Sevak Bharti 2026– MAHA Forest (Maharashtra Sevak Bharti 2026) will begin soon new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Vanrakshak (Forest Guard). Eligible 12th Passed candidates are directed to submit their application online through https://mahaforest.gov.in/ this Website. Total 12,991 Vacant Posts have been announced by Maharasahtra Forest Department (Maharashtra Van Sevak) Recruitment Board, Maharashtra in the advertisement 2026 under MAHA Forest Vanrakshak Bharti process. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. Starting date & Last date to submit online application will Update Soon in this webpage of MahaBharti.

तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही वनसेवक भरतीची प्रक्रिया राबविण्याचा प्रस्ताव असून, राज्यात तब्बल १२,९९१ वनसेवकांची भरती करण्याची योजना आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ही भरती मंत्रालयाच्या लालफितशाहीत अडकली आहे. वनमंत्री यांनी भरतीला तत्त्वतः संमती दिली असतानाही, अद्याप यावर अंतिम निर्णय झालेला नाही. या संदर्भात सून कुठलीही जाहिरात प्रकाशित झाली नाही. परंतु नवीन भरती जाहिरात प्रकाशित होणे आवश्यक आहे. कारण कमी मनुष्यबळाचा परिणाम शासकीय कामावर होस्ट असल्याचे समजते.  वनरक्षक पदाच्या तुलनेत ही वनसेवक पदे निम्न श्रेणीची असली, तरी वनव्यवस्थापनात या संवर्गाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या पदांमुळे वनमजूरांच्या जागी प्रशिक्षित वनसेवक कार्यरत राहतील आणि वनसंवर्धन व संरक्षणाचे काम अधिक कार्यक्षमतेने होईल, असा यामागचा उद्देश आहे. नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग) एम. श्रीनिवास राव यांनी महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव (वने) यांच्याकडे सविस्तर प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावात राज्यातील ११ वनसेवकांची आवश्यक संख्या, सध्याची स्थिती वनवृत्तांमध्ये आणि त्यांची कार्यभूमिका यांचा टॉप टू बॉटम आढावा सादर करण्यात आला आहे. दरम्यान वनसेवकांची भरती ही संकल्पना तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेंद्र टेंभुर्णीकर यांची असल्याची माहिती आहे. एक हजार ९९१ वनसेवकांची भरती केली जाईल, असे जाहीर होते. नागपूर येथील वन भवनात वनमंत्री  हे अधिकाऱ्यांच्या आढावा साठी आले असताना, तेथे रक्षक, वनपाल संघटनेचे अध्यक्ष य पाटील यांच्या नेतृत्वात सेवकांची भरती त्वरेने करावी, निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Maharashtra Van Sevak Bharti 2026: वनविभागाने क्षेत्रीय आकडेवारीच्या आधारे १२,९९१ वनसेवकांची पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. या प्रस्तावात परिशिष्ट-३ नुसार विभागनिहाय पदांचा तपशील नमूद करण्यात आला आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळाची विभागणी दोन भागांमध्ये प्रस्तावित आहे—बाह्य यंत्रणेद्वारे हाताळता येणाऱ्या कामांसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि नियमित स्वरूपात आवश्यक मनुष्यबळ. या प्रस्तावाच्या अंमलबजावणीमुळे वनविभागाची कार्यक्षमता आणि व्यवस्थापन अधिक परिणामकारक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

 

महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशन 2026 मध्ये आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सन्मानीय सदस्यांनी बिबट्यांद्वारे मनुष्यावर होणारे हल्ले, आदिवासी पाड्यांचे स्थलांतर, वनविभागात वनक्षेत्रपाल आणि वनकर्मचारी यांची भरती करणे, वन्यप्राण्यांमुळे शेतजमिनीचे होणारे नुकसान व त्याची भरपाई अश्या अनेक समस्या मांडल्या त्यांच्या सर्व प्रश्नाची उत्तरे देऊन त्यांचे निराकरण केले.

 

राज्यातील वनविभागात रिक्त असलेल्या सुमारे १४ हजार पदांसाठी नोकरभरती दोन महिन्यांच्या आत करण्यात येईल, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेवत लाखो विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि प्रशिक्षणाला सुरुवात केली, मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला, तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे वनविभागाची नोकरभरती प्रत्यक्षात होणार की नाही, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला असून राज्याचे वनमंत्री यांनी सुशिक्षित बेरोजगारांकडे लक्ष देऊन वाढता बेरोजगार पाहता लवकरात लवकर जाहिरात काढून लवकर भरती करावे, अशा प्रकारची मागणी युवा रोजगार परिषदचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केली आहे.
जागतिक वन दिनानिमित्त म्हणजे २१ मार्च रोजी वाशी येथे वनविभागाच्या पदक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

राज्याचे वनखाते उत्कृष्ट काम करीत आहे म्हणून खात्याचा सन्मान झाला. वन खात्यात अनेक पदे रिक्त आहेत. त्याचा आढावा घेऊन लवकरच नोकरभरती करण्यात येईल, अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली होती. या आश्वासनावर विश्वास ठेवून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी या नोकरभरतीची तयारी सुरू केली आहे, मात्र आजपर्यंत कोणतीही जाहिरात, परीक्षा आराखडा अथवा अधिकृत अधिसूचना निघालेली नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन आणि मानसिक स्वास्थ्य यावर परिणाम होत आहे. याविषयी युवा रोजगार परिषदेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कलमूर्गे यांनी सांगितले की, वनमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर १४ हजारांहून अधिक पदे रिक्त असल्याचे परिपत्रक तसेच सविस्तर माहिती मिळाल्यानंतर त्यावर विश्वास ठेवून लाखो विद्यार्थ्यांनी नोकरभरतीची तयारी सुरू केली आहे. मात्र, सरकारने याबाबत फक्त घोषणाच केली आहे. कोणतीही ठोस कार्यवाही अद्याप केलेली नाही.

राज्यात साधारणपणे १४ हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. नोकर भरती केल्यास मनुष्यबळाअभावी येणारा ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच बेरोजगारीच्या विळख्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळेल. त्यामुळे सरकारने दिलेले आश्वासन पाळावे, अशी आमची विनंती आहे. सध्या वनसेवक पदाच्या १२ हजार ९९१ जागा आणि वनरक्षक पदाच्या एक हजार ६०० पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. या पदांवरील मनुष्यबळाच्या अभावामुळे वनविभागावर प्रचंड कामाचा ताण पडत असून वनसंवर्धन आणि कायद्याची अंमलबजावणी यावर प्रतिकूल परिणाम होत आहे.

 

Maharashtra Van Sevak Bharti 2026

 

वनसेवक पदभरतीसाठी मार्गदर्शक तत्त्वे

वनसेवक पदांच्या नियुक्तीसाठी खालील अटी आणि मार्गदर्शक तत्त्वे लागू असतील:

  1. स्थानिक उमेदवारांची नियुक्ती
    • नियुक्तीसाठी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
    • स्थानिक म्हणजे ज्या वनविभागात (Division) नियुक्ती होणार आहे, त्या विभागातील रहिवासी उमेदवार.
  2. पदाची श्रेणी आणि वेतन
    • हे पद गट-ड श्रेणीत येईल.
    • सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी एस-१ (₹१५,०००-४७,६००) असेल.
    • पदाचे पदनाम वनसेवक असेल.
  3. शैक्षणिक पात्रता
    • किमान शैक्षणिक पात्रता १० वी पास असावी.
    • कमाल शैक्षणिक पात्रता १२ वी पास ठेवण्यात येईल.
    • जास्त शिक्षण घेतलेले उमेदवार निवड प्रक्रियेत सहभागी होणार नाहीत यासाठी हमीपत्र लिहून घेतले जाईल.
  4. रोजंदारी मजुरांसाठी विशेष अट
    • सध्याचे कार्यरत रोजंदारी मजूर वयोमर्यादेत ५५ वर्षांपर्यंत सूटसह १०% आरक्षणाचा लाभ घेऊ शकतील.
    • रोजंदारी मजुराने प्रतिवर्ष किमान १८० दिवस तुटक स्वरूपात ५ वर्षे काम केलेले असणे आवश्यक.
    • रोजंदारी कामासंबंधी न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्यास, ती मागे घेतल्याशिवाय नियुक्ती मिळणार नाही.
  5. पदोन्नतीचे संधी
    • वनरक्षक (गट-क) पदांमध्ये २५% पदे वनसेवकांमधून पदोन्नतीने भरली जातील.

ही नियमावली स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासह गरजू रोजंदारी मजुरांसाठी विशेष सुविधा देण्यासाठी तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे वनसेवक पदावर न्याय्य व पारदर्शक भरती प्रक्रिया सुनिश्चित होईल.

वनमजूर आवश्यकतेची आकडेवारी 

अ. क्र.वनवृत्तवनविभागकार्यरत अधिसंख्य वनमजूरअधिकच्या मजुरांची आवश्यकताशेरा
1नागपूरनागपूर वनविभाग332189
2नागपूरवर्धा वनविभाग71168
3नागपूरभंडारा वनविभाग57171
4नागपूरगोंदिया वनविभाग138205
5नागपूरपें. व्या. प्रकल्प, नागपूर70214
6नागपूरनवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव, गोंदिया1984
7नागपूरकार्य आयोजना विभाग, नागपूर1
8नागपूरव.सं., सा.व. नागपूर (नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया)3994
नागपूर वनवृत्त एकूण7261126
9चंद्रपूरनिर्देशन विभाग, चंद्रपूर
10चंद्रपूरब्रम्हपूरी वनविभाग33104
11चंद्रपूरमध्य चांदा वनविभाग96158
12चंद्रपूरचंद्रपूर वनविभाग24122
13चंद्रपूरबफर, ता.अं.व्या.प्र. चंद्रपूर3398
14चंद्रपूरकोअर, ता.अं.व्या.प्र. चंद्रपूर10141
15चंद्रपूरकार्य आयोजना, चंद्रपूर1
16चंद्रपूरबांबू संशोधन केंद्र, चिचपल्ली1
17चंद्रपूरसा.व.वि. चंद्रपूर123
चंद्रपूर वनवृत्त एकूण198647
18गडचिरोलीआलापल्ली वनविभाग63202
19गडचिरोलीसिरोंचा वनविभाग46200
20गडचिरोलीभामरागड वनविभाग2318
21गडचिरोलीगडचिरोली वनविभाग89363
22गडचिरोलीवडसा वनविभाग47338
23गडचिरोलीवनसंवर्धन तज्ञ, चंद्रपूर416
24गडचिरोलीआलापल्ली वन्यजीव विभाग3
25गडचिरोलीसा.व.वि. गडचिरोली29
गडचिरोली वनवृत्त एकूण2771146
26अमरावतीप्रादेशिक वनविभाग (अमरावती, मेळघाट, बुलढाणा, अकोला)247443
27अमरावतीवन्यजीव विभाग (सिपना, गुगामल, मेळघाट, आकोट, अकोला)136241
28अमरावतीव.सं., सा.व. अमरावती (अमरावती, बुलढाणा, अकोला)2472
29अमरावतीकार्य आयोजना, अमरावती16
30अमरावतीवन प्रशिक्षण संस्था, चिखलदरा315
अमरावती वनवृत्त एकूण411777
31यवतमाळनिर्देशन विभाग, यवतमाळ
32यवतमाळवाशिम वनविभाग1810
33यवतमाळपुसद वनविभाग2691
34यवतमाळपांढरकवडा वनविभाग3988
35यवतमाळयवतमाळ वनविभाग107175
36यवतमाळकार्य आयोजना, यवतमाळ
37यवतमाळमूल्यांकन, यवतमाळ
38यवतमाळपांढरकवडा वन्यजीव विभाग1363
39यवतमाळसा.व.वि. वाशिम56
40यवतमाळसा.व.वि. यवतमाळ222
यवतमाळ वनवृत्त एकूण210455
बाकी जिल्ह्यांकरिता तुम्ही खाली दिलेली अधिकृत PDF बघू शकता

Vanmajoor Bharti Details

वनसेवकांची वरीलप्रमाणे पदे निर्माण केल्यास खालीलप्रमाणे फायदे होणार आहेत. (अ) मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी निर्माण होतील. (ब) नियमित वनसेवक उपलब्ध झाल्याने क्षेत्रीय कर्मचा-यांचे बळकटीकरण होईल व कार्यक्षमा वाढीस येईल. (क) वरीलप्रमाणे वनसेवकांच्या पदनिर्मितीमुळे वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन अधिक प्रभावीपणे करता येईल. वनसेवकांची १२९९१ पदे निर्माण करणेसंदर्भात शासन निर्णयाचा मसूदा यासोबत जोडला आहे. तरी वनसेवकांची १२९९१ पदे निर्माण करण्यात यावी, ही विनंती.
Download Maharashtra Van Sevak Bharti GR

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड