खूशखबर! १२,९९१ वन सेवकांची लवकरच होणार भरती, जाणून घ्या काय आहे पात्रता | Maharashtra Van Sevak Bharti 2025

Maharashtra Van Sevak Bharti 2025

Maharashtra Van Sevak Bharti 2025: वनविभागाने क्षेत्रीय आकडेवारीच्या आधारे १२,९९१ वनसेवकांची पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. या प्रस्तावात परिशिष्ट-३ नुसार विभागनिहाय पदांचा तपशील नमूद करण्यात आला आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळाची विभागणी दोन भागांमध्ये प्रस्तावित आहे—बाह्य यंत्रणेद्वारे हाताळता येणाऱ्या कामांसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि नियमित स्वरूपात आवश्यक मनुष्यबळ. या प्रस्तावाच्या अंमलबजावणीमुळे वनविभागाची कार्यक्षमता आणि व्यवस्थापन अधिक परिणामकारक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Maharashtra Van Sevak Bharti 2024

Maharashtra Van Sevak Bharti 2025

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

वनसेवक पदभरतीसाठी मार्गदर्शक तत्त्वे

वनसेवक पदांच्या नियुक्तीसाठी खालील अटी आणि मार्गदर्शक तत्त्वे लागू असतील:

  1. स्थानिक उमेदवारांची नियुक्ती
    • नियुक्तीसाठी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
    • स्थानिक म्हणजे ज्या वनविभागात (Division) नियुक्ती होणार आहे, त्या विभागातील रहिवासी उमेदवार.
  2. पदाची श्रेणी आणि वेतन
    • हे पद गट-ड श्रेणीत येईल.
    • सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी एस-१ (₹१५,०००-४७,६००) असेल.
    • पदाचे पदनाम वनसेवक असेल.
  3. शैक्षणिक पात्रता
    • किमान शैक्षणिक पात्रता १० वी पास असावी.
    • कमाल शैक्षणिक पात्रता १२ वी पास ठेवण्यात येईल.
    • जास्त शिक्षण घेतलेले उमेदवार निवड प्रक्रियेत सहभागी होणार नाहीत यासाठी हमीपत्र लिहून घेतले जाईल.
  4. रोजंदारी मजुरांसाठी विशेष अट
    • सध्याचे कार्यरत रोजंदारी मजूर वयोमर्यादेत ५५ वर्षांपर्यंत सूटसह १०% आरक्षणाचा लाभ घेऊ शकतील.
    • रोजंदारी मजुराने प्रतिवर्ष किमान १८० दिवस तुटक स्वरूपात ५ वर्षे काम केलेले असणे आवश्यक.
    • रोजंदारी कामासंबंधी न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्यास, ती मागे घेतल्याशिवाय नियुक्ती मिळणार नाही.
  5. पदोन्नतीचे संधी
    • वनरक्षक (गट-क) पदांमध्ये २५% पदे वनसेवकांमधून पदोन्नतीने भरली जातील.

ही नियमावली स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासह गरजू रोजंदारी मजुरांसाठी विशेष सुविधा देण्यासाठी तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे वनसेवक पदावर न्याय्य व पारदर्शक भरती प्रक्रिया सुनिश्चित होईल.

वनमजूर आवश्यकतेची आकडेवारी (दि. १/४/२०२४ रोजी)

अ. क्र. वनवृत्त वनविभाग कार्यरत अधिसंख्य वनमजूर अधिकच्या मजुरांची आवश्यकता शेरा
1 नागपूर नागपूर वनविभाग 332 189
2 नागपूर वर्धा वनविभाग 71 168
3 नागपूर भंडारा वनविभाग 57 171
4 नागपूर गोंदिया वनविभाग 138 205
5 नागपूर पें. व्या. प्रकल्प, नागपूर 70 214
6 नागपूर नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव, गोंदिया 19 84
7 नागपूर कार्य आयोजना विभाग, नागपूर 1
8 नागपूर व.सं., सा.व. नागपूर (नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया) 39 94
नागपूर वनवृत्त एकूण 726 1126
9 चंद्रपूर निर्देशन विभाग, चंद्रपूर
10 चंद्रपूर ब्रम्हपूरी वनविभाग 33 104
11 चंद्रपूर मध्य चांदा वनविभाग 96 158
12 चंद्रपूर चंद्रपूर वनविभाग 24 122
13 चंद्रपूर बफर, ता.अं.व्या.प्र. चंद्रपूर 33 98
14 चंद्रपूर कोअर, ता.अं.व्या.प्र. चंद्रपूर 10 141
15 चंद्रपूर कार्य आयोजना, चंद्रपूर 1
16 चंद्रपूर बांबू संशोधन केंद्र, चिचपल्ली 1
17 चंद्रपूर सा.व.वि. चंद्रपूर 1 23
चंद्रपूर वनवृत्त एकूण 198 647
18 गडचिरोली आलापल्ली वनविभाग 63 202
19 गडचिरोली सिरोंचा वनविभाग 46 200
20 गडचिरोली भामरागड वनविभाग 23 18
21 गडचिरोली गडचिरोली वनविभाग 89 363
22 गडचिरोली वडसा वनविभाग 47 338
23 गडचिरोली वनसंवर्धन तज्ञ, चंद्रपूर 4 16
24 गडचिरोली आलापल्ली वन्यजीव विभाग 3
25 गडचिरोली सा.व.वि. गडचिरोली 2 9
गडचिरोली वनवृत्त एकूण 277 1146
26 अमरावती प्रादेशिक वनविभाग (अमरावती, मेळघाट, बुलढाणा, अकोला) 247 443
27 अमरावती वन्यजीव विभाग (सिपना, गुगामल, मेळघाट, आकोट, अकोला) 136 241
28 अमरावती व.सं., सा.व. अमरावती (अमरावती, बुलढाणा, अकोला) 24 72
29 अमरावती कार्य आयोजना, अमरावती 1 6
30 अमरावती वन प्रशिक्षण संस्था, चिखलदरा 3 15
अमरावती वनवृत्त एकूण 411 777
31 यवतमाळ निर्देशन विभाग, यवतमाळ
32 यवतमाळ वाशिम वनविभाग 18 10
33 यवतमाळ पुसद वनविभाग 26 91
34 यवतमाळ पांढरकवडा वनविभाग 39 88
35 यवतमाळ यवतमाळ वनविभाग 107 175
36 यवतमाळ कार्य आयोजना, यवतमाळ
37 यवतमाळ मूल्यांकन, यवतमाळ
38 यवतमाळ पांढरकवडा वन्यजीव विभाग 13 63
39 यवतमाळ सा.व.वि. वाशिम 5 6
40 यवतमाळ सा.व.वि. यवतमाळ 2 22
यवतमाळ वनवृत्त एकूण 210 455
बाकी जिल्ह्यांकरिता तुम्ही खाली दिलेली अधिकृत PDF बघू शकता

Vanmajoor Bharti Details

वनसेवकांची वरीलप्रमाणे पदे निर्माण केल्यास खालीलप्रमाणे फायदे होणार आहेत. (अ) मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी निर्माण होतील. (ब) नियमित वनसेवक उपलब्ध झाल्याने क्षेत्रीय कर्मचा-यांचे बळकटीकरण होईल व कार्यक्षमा वाढीस येईल. (क) वरीलप्रमाणे वनसेवकांच्या पदनिर्मितीमुळे वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन अधिक प्रभावीपणे करता येईल. वनसेवकांची १२९९१ पदे निर्माण करणेसंदर्भात शासन निर्णयाचा मसूदा यासोबत जोडला आहे. तरी वनसेवकांची १२९९१ पदे निर्माण करण्यात यावी, ही विनंती.
Download Maharashtra Van Sevak Bharti GR

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड