दुर्गम क्षेत्रातील पदे शिक्षक भरतीतून भरणार?

Maharashtra Teachers Recruitment 2023

Maharashtra Teachers Recruitment 2023 – All the schools in the district are functioning smoothly and the government has started the recruitment process for teachers. Therefore, to fill the posts in remote areas, the government has the option of recruiting new teachers without transferring the senior teachers and filling up the posts in remote areas. So no one will be inconvenienced. Those currently in remote areas will be accommodated in the shifted locations. The senior teachers will remain in their existing talukas and the posts in remote areas will not be affected by the educational process of the students.

 

गेले तीन महिने राज्यातील प्राथमिक शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेतील पाच टप्पे पूर्ण झाले असून, शेवटचा टप्पा राहिलेला आहे. यामध्ये अवघड क्षेत्रातील रिक्त शाळांमध्ये शिक्षकांची नेमणूक करणे अनिवार्य आहे. याकरिता प्रशासनाने सुगम क्षेत्रात दहा वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांची वास्तव सेवाज्येष्ठतेनुसार यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीतील बहुतांश शिक्षक हे सेवाज्येष्ठ आहेत. अनेकजण व्याधींनी त्रस्त आहेत. नवीन धोरणाविषयी शिक्षकांना पुरेशी माहिती नसल्याने व शासनाकडून उशिरा मार्गदर्शन प्राप्त झाल्याचा फटका सेवाज्येष्ठ शिक्षकांना बसला आहे. त्यामुळे यावर्षी दुर्गम रत्नागिरी भागात करण्यात येणाऱ्या बदल्या रद्द करून नवीन शिक्षकभरतीतून या रिक्त जागा भरण्यात याव्यात, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षकसंघाचे अध्यक्ष यांनी निवेदनाद्वारे ग्रामविकास मंत्र्याकडे केली आहे.

 

संवर्ग एकमधील शिक्षकांना ऑनलाइन बदलीमध्ये सवलत देण्यात आली होती. त्यानुसार विद्यमान शाळेमध्ये तीन वर्षे पूर्ण झाली आहेत, असे शिक्षक स्वेच्छेने बदली घेऊ शकत होते. ज्यांना बदली हवी आहे त्यांनी बदलीचा लाभ घेतला; परंतु ज्यांना बदली नको होती अशा शिक्षकांनी बदलीपात्र नसल्यामुळे बदलीस होकार अथवा नकार दिला नाही. नियमानुसार त्यांनी केलेली कृती योग्य होती; परंतु दुर्गम क्षेत्रातील बदलीसाठी प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये संवर्ग एकमध्ये समाविष्ट असणाऱ्या व बदलीपात्र नसल्यामुळे बदलीस नकार न दिलेल्या अनेक शिक्षकांचा समावेश करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शासनाने शिक्षकांच्या बदलीसाठी संगणकीय प्रणालीचा वापर केला आहे. बदलीप्रक्रियेत पारदर्शकता आणणे हा त्यामागे हेतू होता. नवीन धोरणाविषयी पुरेशी माहिती नसल्याने व शासनाने उशिरा मार्गदर्शक सूचना दिल्याने बदलीप्रक्रियेमध्ये वयोवृद्ध झालेले सेवाज्येष्ठ शिक्षक हे भरडले जात आहेत. त्यामुळे शिक्षक बांधवांमध्ये संताप निर्माण झाला आहे. सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय होऊ नये याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची लवकरच संघटनेचे पदाधिकारी भेट घेणार आहेत, अशी माहिती.रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, प्रवीण काटकर यांनी दिली आहे.

दुर्गम भागातील पदे भरावीत
बदली झालेल्या शिक्षकांना एप्रिल २०२३ पर्यंत कार्यमुक्त केले जाणार नाही, असे शासनाने जाहीर केले आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील सर्व शाळांचे कामकाज सुरळीत चालू आहे तसेच शासनाने शिक्षकभरती प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामुळे दुर्गम भागातील पदे भरण्याकरिता सेवाज्येष्ठ शिक्षकांची बदली न करता नवीन भरती करावी व दुर्गम भागातील पदे भरावीत, असाही पर्याय शासनाकडे उपलब्ध आहे. त्यामुळे कोणाचीही गैरसोय होणार नाही. सद्यःस्थितीत जे दुर्गम भागात आहेत ते बदली झालेल्या ठिकाणी रूजू होतील. सेवाज्येष्ठ शिक्षक त्यांच्या विद्यमान तालुक्यातच राहतील व दुर्गम भागातील पदे भरती प्रक्रियेने भरली गेल्याने तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.


Maharashtra Teachers Recruitment : Teacher recruitment in the state has been postponed due to the cancellation of the Maratha reservation given by the state government to the Maratha community in education and recruitment.

महत्त्वाचे – राज्यातील शिक्षक भरती लांबणीवर!! सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारनं मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरभरतीमध्ये दिलेलं मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे राज्यातील शिक्षक भरती लांबणीवर पडली आहे. राज्य सरकाचे नवे आदेश आल्याशिवाय शिक्षक भरतीची प्रक्रिया केली जाणार नाही अशी माहिती आहे. दुसरीकडे राज्य सरकारच्या लेखा व कोषागार विभागातील लिपीक आणि लेखापाल भरतीवर देखील परिणाम होणार आहे.

3 हजार शिक्षकांची भरती प्रस्तावित

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर शिक्षक भरतीला ब्रेक लागलेला आहे. राज्य शासनाचे आदेश आल्याशिवाय शिक्षक भरती होणार नाही. मे आणि एप्रिल महिन्यात राज्यातील 3 हजार शिक्षकांची भरती प्रस्तावित होती. मात्र, मराठा आरक्षण रद झाल्याने भरती प्रक्रीया कधी होणार यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

पवित्र पोर्टलमध्येही तांत्रिक अडचणी 

शिक्षक भरती होणाऱ्या पवित्र पोर्टलमध्येच तांत्रिक अडथळे मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत. शिक्षण संचालनालयाने तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे. भाजप आणि शिवसेनेचं सरकार असताना शिक्षक भरती प्रक्रियेसाठी पवित्र पोर्टल तयार करण्यात आलं होतं.


महत्त्वाचे -लवकरच होणार प्राध्यापकांची भरती सुरु

Maharashtra Teachers Recruitment 2021 : राज्यातील 42 लाख विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी साडेतीन लाख प्राध्यापक आहेत. साडेपाच हजार महाविद्यालयांबरोबरच अनेक विद्यापीठांमधील प्राध्यापकांची पदे रिक्‍त आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून रिक्‍तपदांची माहिती संकलित केली जात आहे. आगामी काळात लवकरच त्यासंदर्भात मोठा निर्णय होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोलापुरात दिली.

कोरोनामुळे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घ्यावी लागली. त्यावेळी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी ऑनलाइन सर्व्हर हॅक झाल्याबद्दल सायबर सेलकडे तक्रार देणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी तक्रार न देताच परीक्षा घेतल्या. मुंबई विद्यापीठाने सायबर सेलकडे तक्रार दिली असून त्याची चौकशी सुरु आहे. दरम्यान, त्यावेळी ज्या-ज्या विद्यापीठांनी ऑनलाइन परीक्षेसंदर्भात तक्रारी नोंदविल्या आणि त्यांनी पुढे काय कार्यवाही केली, याच्या पडताळणीसाठी फॅक्‍ट फाईंडिंग समिती नियुक्‍त केली आहे. त्यात उपसचिव, उच्च शिक्षण विभागाचे संचालक, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक, आयटीचे सचिव आणि सायबर तज्ज्ञांचा समावेश असून तक्रारीनंतरही काहीच न करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.




महाविद्यालयांमधील प्राचार्यांची पदे रिक्‍त

महाविद्यालयांमधील प्राध्यापकांबरोबरच काही महाविद्यालयांमधील प्राचार्यांची पदे रिक्‍त होती. या पार्श्‍वभूमीवर राज्यभरातील 260 प्राचार्यांच्या भरतीस राज्य सरकारने मंजुरी दिली असून त्याची प्रक्रिया आता सुरु झाली आहे. तर विविध विद्यापीठांमधील 48 संविधानिक पदभरतीलाही मान्यता दिल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले. विद्यापीठातील एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. आता प्रत्येक विद्यापीठांमध्ये विद्यार्थी तक्रार निवारण केंद्र सुरु करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यात ‘युपीएससी’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याचाही निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या मागणीनुसार सोलापुरातही हे केंद्र लवकरच सुरु होईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

विद्यापीठाअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या बदलीचा विचार

राज्यातील 13 अकृषिक विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करता येतील का, यादृष्टीने सरकारचे नियोजन सुरु आहे. तत्पूर्वी, कोंडवाना विद्यापीठ, नागपूर, रामटेक, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी त्यासंदर्भात निवेदने दिली आहेत. आता नांदेड येथील कर्मचाऱ्यांची काय भूमिका आहे, हे लवकरच स्पष्ट होईल. त्यानंतर सर्वच विद्यापीठांकडून प्राप्त निवेदनांचा विचार करुन कर्मचाऱ्यांच्या बहुमतानुसार अंतर्गत बदल्याचा निर्णय आगामी शैक्षणिक वर्षात घेतला जाईल, असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.


Maharashtra Teachers Recruitment 2020 : कोरोना संकटात ही कंपनी 20 हजार महिलांना देणार रोजगार, दीड लाखांपर्यंत पगार

कोरोना संकटाच्या काळात पदवीधर आणि पदव्युत्तर महिलांसाठी एक चांगली बातमी आहे. एडटेक स्टार्टअप व्हाइटहॅट जुनियर (WhiteHat Jr)ने म्हटले आहे की, ते आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतातील महिला शिक्षकांची संख्या वाढवित आहेत. कंपनी प्लॅटफॉर्मवर दररोज 220 शिक्षकांना जोडत आहे. आतापर्यंत त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 7,000 पेक्षा जास्त शिक्षक कार्यरत आहे. वर्षाच्या अखेरीस 20,000 शिक्षकांची भरती करण्याची त्यांची योजना आहे, अर्थात यावर्षी आणखी 13,000 शिक्षकांची भरती करण्याची कंपनीचा मानस आहे. या संदर्भातील पुढील अपडेट आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करू. तेव्हा महाभरती ला नियमित भेट देत रहा.

Maharashtra Teachers Recruitment 2020

अनेक देशांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढतीच

व्हाइटहॅट जुनियरला अलीकडेच बीजू(Byju’s) यांनी विकत घेतले होते. व्हाइटहॅट ज्युनियर म्हणाले की, त्यांचे भारत (India), अमेरिका (US), कॅनडा (Canada), ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामुळे प्लॅटफॉर्मवर अधिक शिक्षकांची आवश्यकता आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, त्याच्या प्लॅटफॉर्मवर शिक्षकांची संख्या वाढत आहे. कंपनीने म्हटले आहे की, कोरोना संकटामुळे डिजिटल शिक्षण आणि शिक्षणाच्या पद्धतींमध्ये नवीन प्रयोग करण्यात येत आहेत.

पालक ऑनलाइन शिकण्यास पूर्णपणे पाठिंबा देत आहेत

व्हाइटहॅट ज्युनियरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी करण बजाज म्हणाले की, पालकांनीही ऑनलाइन शिक्षण घेतले आहे. मुलांच्या शिक्षणाच्या या नवीन दृष्टिकोनास पालक पूर्णपणे पाठिंबा देत आहेत. सध्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मशी संबंधित 84 टक्के शिक्षकांचे वय 35 वर्षांपेक्षा कमी आहे. ते घरी मुलांना शिकवत आहेत आणि दरमहा सरासरी 50,000 ते 1.5 लाख रुपये कमवत आहेत. बहुतेक शिक्षकांकडे पदव्युत्तर पदवी आहेत. या कंपनीची स्थापना 2018 मध्ये झाली होती.

WhatsApp
हि बातमी आपल्या सर्व मित्रांना शेयर करायला विसरू नका. 

सोर्स : लोकमत





Maharashtra Teachers Recruitment 2020 : तीन वर्षांपूर्वी घोषित केलेली आणि वर्षभरापूर्वी प्रत्यक्ष पवित्र प्रणालीमार्फत सुरू झालेली शिक्षक भरती न्यायालयीन कचाट्यातून सुटल्यावरही कोरोनामुळे अडखळली होती. मात्र आता पुन्हा ही प्रक्रिया ‘अनलॉक’ झाली असून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी शाळांचे प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा पोर्टलवर सुरू करण्यात आली आहे.

Maharashtra Teachers Recruitment 2020 : गेल्या वर्षी ९ आॅगस्टला राज्य शासनाने पवित्र पोर्टलद्वारे मुलाखतीशिवाय नियुक्ती द्यावयाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तर ५ सप्टेंबरला ऐन शिक्षक दिनी हजारो उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्तीपत्रेही प्रदान केले. मात्र त्यानंतर मुलाखतीसह नियुक्तीचा पर्याय निवडलेल्या उमेदवारांची निवड यादी प्रलंबित राहिली. त्यानंतर झालेला सत्ताबदल, न्यायालयीन प्रकरणे यामुळे पुढची प्रक्रिया रखडली होती. त्यातच कोरोना संकटामुळे वित्त विभागाने ४ मे रोजीच्या निर्णयानुसार भरती प्रक्रियेवर बंदी आणली.

Maharashtra Teachers Recruitment 2020

परंतु आता ठप्प पडलेल्या पवित्र पोर्टलला पुन्हा एकदा गती आली असून गुरुवारी उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ३१ आॅगस्ट ही अखेरची मुदत देण्यात आली आहे.
त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही शिक्षक दिनीच उमेदवारांना गोड बातमी कळण्याची दाट शक्यता आहे. रयत संकल्प डीएड, बीएड संघटनेचे राज्याध्यक्ष परमेश्वर इंगोले पाटील यांनीही याला दुजोरा दिला आहे.

कोणी भरावे प्राधान्यक्रम

  • आता माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक पदासाठी प्राधान्यक्रम देता येईल.
  • ज्यांना यापूर्वी ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्याने उच्च माध्यमिकचे प्राधान्यक्रम आले नव्हते, परंतु त्यांनी पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण केली, त्यांना प्राधान्यक्रम भरता येईल.
  • तसेच माध्यमिक गटासाठी पदवीला ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्याने ज्यांना प्राधान्यक्रम आले नव्हते, त्यांनाही आता मुलाखतीसह पदाचे प्राधान्यक्रम भरता येणार आहे.
  • ज्यांनी यापूर्वीच मुलाखतीसह संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केले, त्यांना प्राधान्यक्रम देण्याची गरज नाही.

प्राथमिक शिक्षकांच्या १५६० जागा आता रिक्त आहेत. तर एकूण जाहीर केलेल्या १२ हजार १४० जागांपैकी पाच हजार ८२२ जागा अजून भरणे बाकी आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

37 Comments
  1. Pournima says

    I am pursuing bsc in biotechnology 2nd year can I apply this form

  2. Ravina phapal says

    Maj Bsc graduate aahe please mala job hava aahe mala ya addchi mahiti havi aahe.

  3. Snehal kulkarni says

    Kdi honar ahe form link and updates share kra

  4. Mira kisan Gambhire says

    Teacher

  5. [email protected] says

    BA 47%mark but apply karu shakte ks

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड