JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये शासकीय मेगाभरती!- पोलिसांसह ७८ हजार पदांची होणार भरती

Maharashtra State Government Bharti 2022

Maharashtra State Government Bharti 2022 : The recruitment of 78,000 vacancies in Various departments of the state government is planned to be completed by the state government soon. Various departments of Maharashtra will conduct a recruitment process for large number of numbers soon. :-

 

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर शिंदे-फडणवीस सरकारने तब्बल ७८ हजार २५७ पदांची भरती करण्याचा प्लॅन तयार केला आहे. त्यासंदर्भात सोमवारी (ता. २९) सामान्य प्रशासन विभागाची बैठक झाली. गृह विभागातील सात हजार २३१ पदांचाही त्यात समावेश असून ही भरती प्रक्रिया साधारणत: १५ सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली.

राज्य सरकारच्या एकूण २९ प्रमुख विभागाअंतर्गत तब्बल सव्वादोन लाख पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून १०० टक्के पदांची पुढील दोन महिन्यांत भरती होणार आहे. त्याअनुषंगाने संबंधित विभागांनी १५ दिवसांत आयोगाकडे मागणीपत्रे पाठवावीत, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. त्यातून जवळपास ११ हजार २६ पदांची भरती होईल. दुसरीकडे शासनाच्या महत्त्वाच्या विभागांमधील रिक्त पदांची संख्या वाढल्याने प्रशासनावरील ताण वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिसांची संख्या कमी झाल्याने पोलिस यंत्रणांवरील ताणदेखील वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील दीड ते दोन महिन्यांत सरकारकडून ६७ हजार २३१ पदांची भरती होईल, असेही वरिष्ठ सूत्रांनी यावेळी सांगितले. पावसाळी अधिवेशात विधानपरिषदेत बोलताना राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी राज्याच्या शासकीय विभागामधील रिक्त पदांची माहिती देत असतानाच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्य सरकार ७५ हजार पदांची भरती करेल, असे स्पष्ट केले होते. त्याचवेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोलिसांची सात हजार २३१ पदांची भरती लवकरच होईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार आता मेगाभरतीचे नियोजन युध्दपातळीवर सुरु झाले आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

मेगाभरतीचे संभाव्य नियोजन…

  • पोलिस पदभरती : ७२३१
  • ‘एमपीएससी’मार्फत भरती: ११,०२६
  • गट ‘ब, क व ड’ची पदभरती : ६०,०००
  • भरती प्रक्रियेला सुरवात : १५ सप्टेंबर नंतर

 

डिसेंबरनंतर २५ ते ५० हजार पदभरतीचा दुसरा टप्पा

राज्यातील जिल्हा परिषदा, महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा दिवाळीत होण्याची दाट शक्यता आहे. शासकीय पदभरतीची साडेपाच-सहा वर्षांपासून वाट पाहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरूणांसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून मेगाभरतीचे युध्दपातळीवर नियोजन सुरु आहे.

कृषी, महसूल, आरोग्य, पशुसंवर्धन, गृह, राज्य उत्पादन शुल्क, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास या विभागांसह जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांमधील रिक्तपदांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे डिसेंबरनंतर २५ ते ५० हजार पदभरतीचा दुसरा टप्पा जाहीर होऊ शकतो, असेही सूत्रांनी सांगितले.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड