सोमवार पासून १० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरु होणार..! – Maharashtra Shikshak Bharti 2025
Maharashtra Shikshak Bharti 2025
Shikshak Bharti New Update 2025
मित्रांनो, एक आनंदाची बातमी. शिक्षक भरतीच्या परिक्षेत असलेल्या उमेदवारांसाठीच महत्वाचा अपडेट, महाराष्ट्र शिक्षक भरतीचा पुढील दहा हजार पदांची भरती टप्पा सोमवार पासून सुरु होण्याचे संकेत आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात जवळपास १८ ते १९ हजार शिक्षकांची पवित्र पोर्टलमार्फत भरती करण्यात आली आहे, तर दुसऱ्या टप्प्यात दहा हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार असून, ही प्रक्रिया लवकरच सुरू होईल,’ असे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. भुसे म्हणाले, “शिक्षक भरतीसाठी संचमान्यता, पट पडताळणी करण्यात येईल. त्यातून नेमक्या किती जागा रिक्त आहेत, हे समोर येईल. दरम्यान, दुसऱ्या टप्यातील भरती प्रक्रियेत पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेत भरतीपासून वंचित राहिलेल्यांना संधी देण्यात येईल.” दुसऱ्या टप्प्यातील भरतीच्या कार्यवाहीबाबत शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२० नुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कार्यवाही पूर्ण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनांना पोर्टलवर जाहिरात नोंदणी करण्याची सुविधा सोमवारपासून (ता. २०) सुरू होईल. तसेच, या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शालेय शिक्षण विभागातर्फे खासगी अनुदानित व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील एकूण रिक्तपदांपैकी ८० टक्के शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यातील पदभरती ३० जूनपूर्वी केली जाणार आहे. त्यादृष्टीने शालेय शिक्षण विभागाने जवळपास १४ ते १५ हजार शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागितली असून तसा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे खासगी अनुदानित व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील एकूण रिक्तपदांपैकी ८० टक्के शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यातील पदभरती ३० जूनपूर्वी केली जाणार आहे. त्यादृष्टीने शालेय शिक्षण विभागाने जवळपास १४ ते १५ हजार शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागितली असून तसा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ३० हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा केली होती, पण त्यातील २३ हजार शिक्षकांचीच भरती झाली.
झेडपी शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी आवश्यक असून आगामी काळात सेमी इंग्रजीचे वर्ग देखील या शाळांमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, अनेक जिल्हा परिषदांमधील शिक्षकांच्या रोस्टरबद्दल तक्रारी होत्या. त्याची सुनावणी शिक्षण आयुक्तांकडे सुरू होत्या आणि आता त्यातील बहुतेक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे त्या जिल्हा परिषदांमधील एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के शिक्षकांची भरती आता दुसऱ्या टप्प्यात केली जाणार आहे. सध्या पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून त्यासाठी देखील निविदा काढून नव्याने मान्यता किंवा पूर्वीच्याच मक्तेदाराला मुदतवाढ आवश्यक आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला सरकारची मान्यता आवश्यक आहे. नूतन शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘खासगी’तील भरतीवेळी ‘शिक्षण’चा असेल प्रतिनिधी
खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवरूनच एका पदासाठी दहा उमेदवार दिले जाणार आहेत. त्यांच्या मुलाखती घेऊन त्यातील एकाची निवड करण्याचा अधिकार संबंधित संस्थेला असणार आहे. पण, या मुलाखतीवेळी शिक्षण विभागाचा प्रतिनिधी उपस्थिती राहील, असे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे खासगी संस्थांमधील शिक्षक भरतीतील मनमानी किंवा वशिलेबाजीला लगाम बसणार आहे.
कंत्राटी शिक्षक भरतीवर प्रश्नचिन्ह
राज्यातील जिल्हा परिषदांच्या १५ हजारांहून अधिक शाळांची पटसंख्या १ ते २० पर्यंत असून त्यातील पाच हजार शाळांची पटसंख्या १० पेक्षाही कमी आहे. त्या शाळांमध्ये डीएड, बीएडधारक तरुण-तरुणांना कंत्राटी तत्त्वावर घेण्यासंबंधीचा शासन निर्णय तत्कालीन सरकारने घेतला आहे. पण, आता हा निर्णय रद्द होण्याची शक्यता असल्याचे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. रत्नागिरी जिल्हा परिषदेशिवाय अन्य कोणत्याही जिल्हा परिषदांमध्ये कंत्राटी शिक्षक भरती झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
Penting teacher post is not available,..???
विद्यार्थ्या च्य कला गुणा वाव मिलन्यास
कला शिक्षाक याना कधि संधि मिलानार आहे.
shikshak bharti 2024 All Latest Recruitment Advertisements published
CRAFT TEACHER POST AVAILABLE ?
CRAFT TEACHERS POST AVAILABLE ?