वैद्यकीय, जेईईच्या तयारीसाठी 100 टक्के स्कॉलरशिप!!
Maharashtra Scholarship 2022
Scholarship 2022 Application
Maharashtra Scholarship 2022 : Lalit Tutorials has organized a Scholarship Examination for the students who are appearing for the Class X examinations and dream of making a future in the field of Medicine and Engineering. Further details are as follows:-
दहावीची परीक्षा देत असलेल्या, वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडविण्याचे स्वप्न पाहत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ललित टयूटोरिअल्सने स्कॉलरशिप परीक्षेचे आयोजन केले आहे. ११ वी, १२ वी, नीट (वैद्यकीय) व जेईई (अभियांत्रिकी)पूर्वपरीक्षांच्या तयारीसाठी एलटीएसई स्कॉलरशिप परीक्षा ९, १०, १५ आणि १७ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी www.lalittutorials.com या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रवेश परीक्स्षा ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने होईल. गुणांच्या आधारे कॅप्सूल बॅचमध्ये १०० टक्क्यांमध्ये स्कॉलरशिप व प्रवेश देण्यात येतील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Scholarship Exam Quality List
Maharashtra Scholarship 2022 : Scholarship examinations are conducted by the State Examination Council for the students of class V and VIII. This year, the fifth examination was held on 12th August. The quality list of the results of this exam went viral throughout the day on Thursday. Further details are as follows:-
Std Fifth Scholarship Fake Result Viral
राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. यंदा १२ ऑगस्ट रोजी पाचवीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या निकालाची गुणवत्ता यादी गुरुवारी दिवसभर व्हायरल झाली.
या यादीच्या आधारे विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचे तसेच, शाळांचे आभार मानणारे फोनही सुरू झाले. मात्र शाळांच्या मुख्याध्यापकांनी सावध पवित्रा घेत अद्याप आमच्याकडे अशी कोणीतीही यादी आली नसल्याचे सांगत पालकांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. राज्य परीक्षा परिषदेने वेबसाइटवर अद्याप अधिकृत निकाल जाहीर झाला नसल्याचे दुपारी स्पष्ट केले. मग ही यादी व्हायरल कुठून झाली असा प्रश्न उपस्थित झाला. या परीक्षेचा तात्पुरता निकाल २४ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला होता. यावर हरकत नोंदविण्याची मुदत संपल्यानंतर आता अंतिम निकालाची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे पेपरफुटीनंतर आता निकालही फुटू लागल्याची चर्चा दिवसभर सोशल मीडियावर रंगली होती.
We have not published this list, said Dattatraya Jagtap, president of the examination council. Preparations are in the final stages and results will be announced on Monday or Tuesday. The list is not official and parents, students and schools should not believe it, he said.
Interim Results Of Maharashtra State Scholarship Exam
Maharashtra Scholarship 2022 : Interim results of the 5th and 8th Scholarship examinations conducted by the Maharashtra State Examination Council have been announced. As the result of Pimpri-Chinchwad city has decreased in this, the Mission Scholarship Program has been undertaken by the Education Department.
Mission Scholarship Of The Department Of Education
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर झाला. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल घटल्याने शिक्षण विभागातर्फे मिशन शिष्यवृत्ती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
The result of class V of Pimpri-Chinchwad Municipal School is 5.1 percent and the result of class VIII is 6.6 percent. As this result is not satisfactory, the Department of Education has undertaken a ‘Mission Scholarship’ program to enhance the quality of the students’ scholarship examinations, said Smita Goud, Administration Officer-in-Charge.
यावर्षी इयत्ता पाचवीच्या एक हजार ३०७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एक हजार ८९ विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये फक्त ५६ विद्यार्थी पात्र ठरले. इयत्ता आठवीच्या ५१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४०५ विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी फक्त २७ विद्यार्थी पात्र ठरले. ही आकडेवारी समाधानकारक नसल्याने प्रभारी प्रशासन अधिकारी स्मिता गौड यांनी मुख्याध्यापकांची बैठक घेतली.
शिक्षक प्रशिक्षणास सुरुवात
मिशन शिष्यवृत्ती कार्यक्रम जाहीर करून मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या. यामध्ये महापालिकेच्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्यांला शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट करावे; तसेच एकूण विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतील यासाठी प्रयत्न करावेत; १० टक्के विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण सोमवार (२० डिसेंबर) पासून सुरू करण्यात आले आहे.
Mission Scholarship Of The Department Of Education
- या कार्यक्रमांतर्गत महापालिका शाळातील पाचवी आणि आठवी इयत्तेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयार करण्यात येईल.
- तसेच यासाठी शिक्षकांचे चार दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे.
- महाराष्ट्र राज्यातील शिष्यवृत्तीत तज्ज्ञ असलेली ८ मंडळी यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देत आहेत.
- महापालिकेचे ३५० हून अधिक मुख्याध्यापक, शिक्षक याचे प्रशिक्षण घेत आहेत.
- तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यास ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- फेब्रुवारी महिन्यात विद्यार्थ्य़ांच्या ३ सराव चाचण्या महापालिकेच्या वतीने घेण्यात येतील.
सध्या २०२२ च्या शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. तर २० फेब्रुवारी २०२२ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेचा फॉर्म भरण्याची ३१ डिसेंबर २०२१ ही अंतिम तारीख आहे.
Looking at the results of the scholarship examination, it was seen that there is a bit of depression in this regard. Scholarship examination is a great option to check the quality of study of the students and to create a competitive examination among the students. Therefore, the purpose behind this is that all students should take the exam. The Mission Scholarship Program was started for this purpose, said Smita Goud, Administration Officer-in-Charge.
Maharashtra Scholarship 2022
Maharashtra Scholarship 2022 : The fifth and eighth scholarship examinations will be held on February 20, 2022. The application process has begun. Students will be able to fill up these applications till 31st December. Further details are as follows:-
पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा २० फेब्रुवारी, २०२२ मध्ये ही परीक्षा होणार आहे. अर्जप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ३१ डिसेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना हे अर्ज भरता येतील. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती, पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती , शासकीय विद्यानिकेतन प्रवेश, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रे परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. १ डिसेंबरपासून हे अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. या परीक्षेत प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा चार विषयांची परीक्षा होईल. सकाळी ११ ते ३ या वेळेत ही परीक्षा होईल. या परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या जातील. महाराष्ट्राचे रहिवासी असलेले आणि पाचवी किंवा आठवीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी या परीक्षेकरिता पात्र राहतील. एकूण सात माध्यमे आणि सात सेमीमाध्यमे यांच्यात ही परीक्षा देता येईल. याबाबतची संपूर्ण माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
Table of Contents