विविध योजनांचा लाभ घेण्यात सुसूत्रता अन्याच्या उद्देशाने सरकार अजून एक पाऊल उचलणार आहे Maharashtra Sarkar Yojana Portal 2025 . राज्यातील सर्व विभागांतर्गत सामाजिक महामंडळांकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणीत एकसूत्रता यावी आणि सर्व संवर्गातील लाभार्थ्यांसाठी आता एकच संकेतस्थळ असणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने समिती नियुक्त केली आहे. सर्व सामाजिक महामंडळांच्या लाभार्थ्यांना एकच केंद्रीकृत ऑनलाइन संकेतस्थळाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. राज्यातील विविध विभागांतर्गत अनेक सामाजिक महामंडळे कार्यरत आहेत; तसेच अनेक सामाजिक महामंडळे नव्याने निर्माण करण्यात आली आहेत. राज्यातील सर्व सामाजिक महामंडळांमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये एकसूत्रता असावी; तसेच राज्यातील सर्व संवर्गातील / स्तरांतील लाभार्थ्यांना एकच केंद्रीकृत ऑनलाइन संकेतस्थळ असावे. अशा संकेतस्थळाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, समाजकल्याण समाजव विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, आदिवासी विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे आणि पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार अशी पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. विषयाच्या आवश्यकतेनुसार इतर प्रशासकीय विभागांचे प्रधान सचिव, सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना विशेष निमंत्रित म्हणून बोलवण्यात येईल. याबाबतचे आदेश राज्य सरकारच्या उपसचिव वर्षा देशमुख यांनी प्रसिद्ध केले आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















