खुशखबर!! – राज्यात डिसेंबरनंतर 25 हजार पदांची मोठी पोलिस भरती!
Maharashtra Police Recruitment
Maharashtra Police Recruitment : Maharashtra Police Bharti – राज्यातील पोलिसांचे वाढलेले काम, तपासाशिवाय पडून असलेली ढीगभर प्रकरणे, कोरोनामुळे झालेला पोलिसांचा मृत्यू, पदोन्नतीने रिक्त झालेल्या जागांमुळे आणि सेवानिवृत्ती व बडतर्फ, निलंबनामुळे राज्यात पोलिस दलातील रिक्त पदांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वर्षाअखेर मोठी पोलिस भरती होण्याची शक्यता गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली. प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या काळातील रिक्त पदांची माहिती तातडीने मागविली आहे. परंतु, मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने भरतीसंदर्भात सरकारने घोषणा केली नसल्याची चर्चा आहे .
रिक्त पदांची माहिती घेऊन प्रशिक्षणाच्या मैदानांची तयारी
Maharashtra Police Recruitment : राज्यात दरवर्षी साधारणपणे सहा हजार पदे रिक्त होतात. 2019 आणि 2020 मध्ये पोलिस भरती झालेली नाही. 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस शिपायांची माहिती मागविली आहे. त्यानुसार मैदाने तयार ठेवून भरतीच्या दृष्टीने तयारी केली जाणार आहे.
– संजयकुमार, अप्पर पोलिस महासंचालक, विशेष प्रशिक्षण
- 12538 पदे – महाराष्ट्र पोलीस भरती 2020-2021
- पोलीस भरती २०२० लेखी परीक्षा महत्वाच्या ट्रिक्स
- पोलीस भरती व्हिडीओ लेक्चर्स-बुद्धिमत्ता चाचणी
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील पोलिस शिपाई आणि चालक पोलिस शिपायांची किती पदे रिक्त आहेत, याची माहिती अप्पर पोलिस महासंचालक कार्यालयास तत्काळ ऑनलाइन सादर करावी, असे आदेश शुक्रवारी (ता. 23) दिले. त्यात सर्व पोलिस आयुक्त (लोहमार्ग- मुंबईसह), पोलिस अधीक्षक (नाशिक ग्रामीण वगळून), पोलिस आयुक्त (बृहन्मुंबई), सर्व समादेशक (राज्य राखीव पोलिस दल गट क्र. एक ते 16) यांच्याकडून रिक्त पदांची माहिती संकलित करण्यात आली आहे. याबद्दल लोहमार्गचे अप्पर पोलिस महासंचालक, एसआरपीएफचे अप्पर पोलिस महासंचालक, पोलिस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र, नागपूर), सर्व परिक्षेत्रीय विशेष पोलिस महानिरीक्षक आणि राज्य राखीव पोलिस बलाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांचा समावेश आहे. भरतीनंतर एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतरच संबंधितांना नियुक्ती दिली जाते. त्यामुळे भरतीचे नियोजन एक वर्षापूर्वीच केले जाते. त्यानुसार मैदाने उपलब्ध करुन भरती प्रक्रिया राबविली जाते. त्यादृष्टीने आता नियोजन सुरु झाले आहे, परंतु मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने भरतीसंदर्भात सरकारने घोषणा केली नसल्याची चर्चा आहे.
ठळक बाबी…
- आगामी दोन वर्षांची एकत्रित राबविली जाणार भरती प्रक्रिया
- आरक्षणनिहाय माहिती काढण्याचे काम सुरु असल्याची सूत्रांची माहिती
- कोरोनामुळे मृत्यू, सेवानिवृत्ती, निलंबन, बडतर्फी, पदोन्नतीमुळे रिक्त झाली पदे
- भरतीच्या अनुषंगाने प्रशिक्षणचे अप्पर पोलिस महासंचालकांनी मागविली पोलिस शिपाई व चालक शिपायांची माहिती
- 2019 आणि 2020 मध्ये भरती न झाल्याने साडेबारा हजार जागा झाल्या रिक्त
- डिसेंबर 2020 नंतर सुमारे 25 हजार रिक्त पदांची राबविली जाणार नवी पदभरती
सोर्स : सकाळ