शासकीय रुग्णालयांत परिचारिकांची हजारो पदे रिक्त, नवीन पदभरती – Paricharika Bharti 2025
Maharashtra Paricharika Bharti 2025
Maharashtra Nurse Bharti 2025 – राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये गरीब आणि गरजू रुग्ण मोफत उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात दाखल होतात. रुग्णालयात दाखल होण्यापासून डिस्चार्ज मिळेपर्यंत रुग्णसेवेमध्ये डॉक्टरांच्या बरोबरीने परिचारिका महत्वाची भूमिका बजावतात. मात्र, राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील हजारो पदे रिक्त असल्यामुळे रुग्णसेवेवर विपरित परिणाम होत आहे. पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयासह राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये दररोज दीड ते दोन हजार रुग्ण उपचारांसाठी येतात. यापैकी आंतररुग्ण विभागामध्ये दाखल होणा-यांची संख्या सुमारे ८०० ते १००० इतकी असते. प्रत्येक ५ रुग्णांमागे १ परिचारिका असणे अपेक्षित असताना सद्यस्थितीत एक परिचारिकेकडे १५ ते २० रुग्णांची जबाबदारी सोपवल्याचे पहायला मिळत आहे. खासगी रुग्णालयांच्या तुलनेत शासकीय रुग्णालयांमध्ये परिचारिकांकडून उर्मट वर्तन केले जात असल्याच्या तक्रारी बरेचदा रुग्णालय प्रशासनाकडे प्राप्त होत असतात. अशा वेळी परिचारिकांना पूर्णपणे दोषी धरले जाते. मात्र, ‘परिचारिका या रोबो नव्हेत, माणूसच आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील कामाच्या ताणाचा व्यवस्थापनाकडून विचार व्हावा’, अशी मागणी परिचारिका संघटनांकडून सातत्याने केली जात आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात गट-ब, गट-क आणि गट-डया संवर्गामध्ये एकूण ५४,९५४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या ११.३७५ पदे रिक्त आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये एकूण ३५,३४३ पदे रिक्त आहेत. त्यापैकी ९०८८ पदे रिक्त आहेत. यामध्ये परिचारिकांची संख्या लक्षणीय आहे. परिचारिकांची अनेक पदे रिक्त असल्याने उपलब्ध मनुष्यबळावर कामाचा प्रचंड ताण येत आहे. विशेषतः, रात्रीच्या वेळी रुग्णसेवेमध्ये अनेक अडचणी येत असल्याचे परिचारिकांचे म्हणणे आहे. रुग्ण आजारपणामुळे आधीच चिडचिडे, हतबल झालेले असतात. अशा वेळी परिचारिकांकडून वेळेवर प्रतिसाद न मिळाल्यास रुग्ण आणि नातेवाईक यांचा राग अनावर होतो. कोणतीही परिचारिका रुग्णांना जाणीवपूर्वक दुखावत नाही. मात्र, कामाचा भार सोसताना त्यांची काही प्रमाणात चिडचिड होते. परिचारिका वेळच्या वेळी स्वतःमध्ये सुधारणा करतातच; मात्र, शासनाने उपलब्ध मनुष्यबळावरील ताण कमी करण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी भावना शासकीय रुग्णालयातील एका परिचारिकेने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App