आज GR प्रकाशित- TCS, IBPS सारख्या कंपन्यामार्फतच भरती होणार!
Maharashtra Government Recruitment Exams
Maharashtra Government Bharti Process 2022 will begin soon. The recruitment process will be carried through the well known reputed companies only like IBPS or TSC. The MKCL is now out of this race. More details about this MehaBharti 2022 are given below.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
गैरव्यवहार आणि गोंधळामुळे राज्यातील म्हाडा, टीईटी, आरोग्य विभागाच्या नोकरभरतीच्या परीक्षा वादग्रस्त ठरल्या असतानाच यापुढे नामांकित कंपन्यांमार्फतच नोकरभरती करण्याचे पाऊल राज्य सरकारकडून उचलले जाणार आहे. या कंपन्यांमध्ये टीसीएस, आयबीपीएस या नामांकित कंपन्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारनेही याच कंपन्यांमार्फत परीक्षा घेण्याची घोषणा केली होती. महाविकास आघाडीची ही घोषणा प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी शिंदे-भाजप युतीचे सरकार पावले उचलत आहे. महाविकास आघाडी सरकारने यात MKCL कंपनीचाही समावेश करण्याचे ठरवले होते. हे सरकार मात्र MKCL ला यातून बाहेर ठेवणार आहे. तसेच १७०००+ पदांची पोलीस भरती सुद्धा सुरु आहे, या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपब्लध आहे.
भरती परीक्षांमधील गोंधळ आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी सध्या जिल्हा अथवा तालुकास्तरावरून वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत घेतल्या जाणाऱ्या नोकरभरती परीक्षा बंद करून राज्यस्तरावरून नियुक्त केल्या जाणाऱ्या नामांकित टीसीएस, आयबीपीएस कंपन्यांमार्फतच या परीक्षा घेण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे यापुढे राज्य, जिल्हा अथवा तालुका, अशा कोणत्याही पातळीवरील शासकीय नोकर भरतीची परीक्षा याच कंपन्यांमार्फत घेतल्या जाणार आहेत. या भरती परीक्षा घेण्यासाठी अटी-शर्ती ठरवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. याबाबतचा प्रस्ताव पुढील राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल.
प्रक्रियेतील गैरप्रकार टाळण्यासाठी प्रस्ताव
- राज्यातील आरोग्य सेवा परीक्षा व म्हाडा प्राधिकरणातील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील सरळ सेवा भरती परीक्षा पेपर फुटल्याने शासकीय नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील शेकडो उमेदवारांचे नुकसान झाले.
- शासकीय अधिकारी आणि परीक्षा घेणाऱ्या कंपनीने संगनमताने उमेदवारांकडून हजारो रुपये घेऊन या परीक्षांचे पेपर फोडल्याचे समोर आले आहे.
- त्यामुळेच नामांकित कंपन्यांमार्फत परीक्षा घेतली, तर हे गैरप्रकार टळू शकतात.