JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

माजी अग्निवीरांसाठी मोठी खुशखबर; सरकारी नोकरीत १० टक्के समांतर आरक्षण| Maharashtra Agniveer Bharti 2026

Maharashtra Agniveer Bharti 2026

माजी अग्निवीरांसाठी मोठा निर्णय; सरकारी भरतीत १० टक्के समांतर आरक्षणाचा मार्ग मोकळा!माजी अग्निवीरांना शासकीय सेवेत संधी देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शासनाच्या गट ‘क’मधील गणवेशधारी सेवांच्या भरतीत माजी अग्निवीरांना १० टक्के समांतर आरक्षण देण्यासह त्यांना शासकीय आणि निमशासकीय सेवेत दाखल करून घेण्यासाठी धोरण निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला.या निर्णयामुळे अग्निवीर म्हणून सेवा पूर्ण केलेल्या उमेदवारांना राज्यातील विविध शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याचा मार्ग अधिक स्पष्ट होणार आहे.

देशसेवेची संधी आणि चार वर्षांचे लष्करी प्रशिक्षण देणाऱ्या ‘अग्निपथ’ योजनेची सुरुवात केंद्र सरकारने २०२२ मध्ये केली. भारतीय सशस्त्र दलातील भूदल, नौदल आणि वायुदलात युवकांना संधी देण्यासाठी ही योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत १७.५ ते २१ वर्षे वयोगटातील युवकांची चार वर्षांच्या कालावधीसाठी सैन्य दलात भरती केली जाते.

माजी अग्निवीरांसाठी सरकारी सेवेत आरक्षणाचा मोठा निर्णय; १० टक्के समांतर आरक्षणाला मंत्रिमंडळाची मंजुरी!माजी अग्निवीरांना राज्यातील विविध गणवेशधारी गट ‘क’ सेवांमध्ये संधी मिळावी यासाठी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समिती स्थापन करण्यात आली होती. गृह विभाग, राज्य उत्पादन शुल्क, वन विभाग, नगरविकास विभाग यांसह विविध प्रशासकीय विभागांतील आस्थापनांवरील पदांचा यामध्ये समावेश आहे. या समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे माजी अग्निवीरांसाठीचे धोरण निश्चित करण्यात आले असून, त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

या धोरणानुसार महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या माजी अग्निवीरांसाठी १० टक्के समांतर आरक्षण देण्यात येणार आहे. तसेच, काही पदांसाठी १० टक्क्यांपेक्षा अधिक समांतर आरक्षणाची आवश्यकता भासल्यास, सामाजिक आरक्षण अबाधित ठेवण्याच्या अटीवर ही मर्यादा वाढविण्याचे अधिकार उच्चस्तरीय सचिव समितीला देण्यात आले आहेत.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Agniveer Bharti 2026


‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून सेवेतून बाहेर पडणाऱ्या अग्निवीरांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाची योजना आखली जात असल्याची माहिती समोर आली आहे. सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना रोजगारासाठी भटकंती करावी लागू नये, तसेच त्यांना पुढील रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सरकारकडून विशेष ‘एक्झिट प्लॅन’ तयार करण्यात येत आहे.या योजनेंतर्गत सैन्यसेवेदरम्यान मिळालेले प्रशिक्षण, कौशल्य आणि अनुभव यांचा उपयोग करून अग्निवीरांना सेवा संपल्यानंतर रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे चार वर्षांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारकडून नियोजन सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत भारतीय लष्करात दाखल झालेल्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचा चार वर्षांचा सेवाकाळ जानेवारी २०२७मध्ये पूर्ण होणार आहे. या तुकडीत १९ हजारांहून अधिक अग्निवीरांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या नियमानुसार अग्निवीरांना कार्यमुक्त करण्यात येते. मात्र, त्यापैकी २५ टक्के अग्निवीरांना त्यांच्या कामगिरीच्या आधारे नियमित लष्करी सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याची तरतूद आहे.या पार्श्वभूमीवर नियमित सेवेसाठी निवड प्रक्रिया अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने सेवाकाळ पूर्ण होण्यापूर्वीच परीक्षा घेऊन गुणवत्ता यादी तयार करण्याच्या व्यवस्थेवर भर दिला जात आहे. त्यामुळे पहिल्या तुकडीचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच नियमित सेवेत निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत भारतीय लष्करात दाखल झालेल्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचा चार वर्षांचा सेवाकाळ जानेवारी २०२७मध्ये पूर्ण होणार आहे. या तुकडीत १९ हजारांहून अधिक अग्निवीरांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या नियमानुसार अग्निवीरांना कार्यमुक्त करण्यात येते. मात्र, त्यापैकी २५ टक्के अग्निवीरांना त्यांच्या कामगिरीच्या आधारे नियमित लष्करी सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याची तरतूद आहे.या पार्श्वभूमीवर नियमित सेवेसाठी निवड प्रक्रिया अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने सेवाकाळ पूर्ण होण्यापूर्वीच परीक्षा घेऊन गुणवत्ता यादी तयार करण्याच्या व्यवस्थेवर भर दिला जात आहे. त्यामुळे पहिल्या तुकडीचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच नियमित सेवेत निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

रेल्वेतही रोजगाराच्या संधी

माजी अग्निवीरांसाठी भारतीय रेल्वेमध्येही आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.

  • श्रेणी-१ पदे : १० टक्के समांतर आरक्षण
  • श्रेणी-२ आणि त्यापुढील पदे : ५ टक्क्यांपर्यंत आरक्षण

यामुळे लष्करी सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीरांना सरकारी क्षेत्रातील रोजगाराच्या आणखी संधी उपलब्ध होऊ शकतात.

अग्निवीरांना काय फायदा होणार?

या ‘एक्झिट प्लॅन’मुळे चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होऊ शकते. लष्करी सेवेत मिळालेले प्रशिक्षण, शिस्त आणि अनुभव याचा उपयोग सुरक्षा दल, पोलीस तसेच इतर सरकारी सेवांमध्ये करता येणार आहे.

सेवा संपल्यानंतर रोजगाराच्या संधींबाबत स्पष्टता मिळाल्यास अग्निवीरांना भविष्यातील नियोजन करणेही सोपे होईल. मात्र, विविध विभागांमधील भरती, आरक्षण आणि नियुक्तीची अंतिम प्रक्रिया संबंधित नियम व अधिकृत अधिसूचनांनुसारच निश्चित होणार आहे.

उर्वरित ७५ टक्के अग्निवीरांसाठीही रोजगाराची तयारी

चार वर्षांनंतर नियमित सेवेत सामावून न घेतल्या जाणाऱ्या उर्वरित ७५ टक्के अग्निवीरांच्या पुनर्वसनासाठीही सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माध्यमातून विशेष पोर्टलच्या मदतीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांसह विविध पोलीस दलांमध्ये त्यांच्या भरतीची प्रक्रिया सुलभ करण्याची तयारी सुरू असल्याचे वृत्त आहे. यामध्ये BSF, CRPF, CISF, ITBP आणि आसाम रायफल्स यांसारख्या दलांचा समावेश आहे. त्यामुळे अग्निवीरांना लष्करी सेवा पूर्ण केल्यानंतर इतर सुरक्षा दलांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.


अग्निपथ योजनेअंतर्गत चार वर्षांची यशस्वी सैन्यसेवा पूर्ण करून सेवेतून बाहेर पडणाऱ्या माजी अग्निवीरांसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. माजी अग्निवीरांना राज्यातील शासकीय तसेच निमशासकीय सेवेत पुनर्नियुक्तीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांमध्ये १ हजारहून अधिक पदांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे सैन्यसेवा पूर्ण केलेल्या तरुणांना सरकारी सेवेत प्रवेशाची नवी संधी मिळणार असून, जिल्ह्यातील ५०० हून अधिक अग्निवीरांनाही या निर्णयाचा लाभ घेता येणार आहे.

देशसेवा करून परतलेल्या तरुणांना स्थिर आणि सन्मानजनक रोजगाराची संधी मिळावी, या उद्देशाने राज्य शासनाने माजी अग्निवीरांच्या समायोजनासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अग्निवीरांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी विशेष बाब म्हणून १ हजार अतिरिक्त पदांना मंजुरी देण्यात आली आहे.

या माध्यमातून माजी अग्निवीरांना गृह विभागातील पोलिस दल, कारागृह विभाग, राज्य उत्पादन शुल्क, वन विभाग आणि परिवहन विभागातील गणवेशधारी पदांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. सैन्यातील चार वर्षांच्या कठोर प्रशिक्षणातून विकसित झालेली शिस्त, शारीरिक क्षमता आणि विविध कौशल्यांचा राज्य प्रशासनाला थेट फायदा होईल, असे शासनाचे मत आहे. विशेष म्हणजे, या वाढीव पदांमुळे नियमित पदभरतीवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नसून, अग्निवीरांसाठी स्वतंत्र आणि अतिरिक्त रोजगाराची व्यवस्था म्हणून ही पदे उपलब्ध राहणार आहेत.

Maharashtra Agniveer Bharti 2026


या पदांवर माजी अग्निवीरांना नियुक्ती देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समिती गठित केली आहे. केंद्र सरकारने २०२२ मध्ये अग्निपथ योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत १७.५ ते २१ वर्षे वयोगटातील तरुण-तरुणींना सशस्त्र दलात चार वर्षांसाठी अग्निवीर म्हणून भरती केले जाते. चार वर्षांच्या सेवेनंतर कामगिरी, शिस्त आणि कौशल्यांच्या आधारे २५ टक्के अनिवीरांना कायमस्वरूपी सैन्यदलात संधी दिली जाते, तर उर्वरित ७५ टक्के अग्निवीर सेवामुक्त होतात. सेवाकाळात अग्निवीरांना शिस्त, नेतृत्व, तांत्रिक कौशल्य, आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा तसेच संघटनात्मक कार्यपद्धतीचे प्रशिक्षण मिळते. या कौशल्यांचा शासकीय सेवेत उपयोग व्हावा, यासाठी सेवामुक्त अग्निवीरांना योग्य संधी देण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

या विभागांत मिळू शकते संधी
गृह विभागाच्या अंतर्गत पोलिस शिपाई, चालक पोलिस शिपाई, राज्य पोलिस दल व राज्य राखीव पोलिस दलातील पदे, तसेच महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा आणि नागरी संरक्षण संचालनालयातील अग्निशामक व बचावकर्ता पदांचा संभाव्य संवर्गात समावेश आहे. तसेच वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, नगरविकास विभागांतर्गत महापालिका व नगरपालिकांमधील अग्निशमन व विमोचक पदांचाही विचार केला जाणार नियुक्तीची पद्धत, मुख्य सचिव समितीचे अध्यक्ष गृह, वन, सेवा, वित्त, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव, विधी व न्याय विभागाचे सचिव तसेच संबंधित विभागांचे अधिकारी सदस्य असणार आहेत. माजी सैनिक कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव समितीचे सदस्य सचिव राहणार आहेत. ही समिती विभाग व संवर्गनिहाय अधिसंख्य पदे निश्चित करणे, माजी अग्निवीरांच्या नियुक्तीची कार्यपद्धती ठरवणे आणि या पदांवर नियुक्त झालेल्यांना पुढे नियमित शासकीय किंवा निमशासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी कार्यपद्धती सुचवणार आहे. समितीच्या निर्णयानुसार संबंधित विभाग पदनिर्मितीचे आदेश काढणार आहेत.


 

Maharashtra Agniveer Bharti 2026: अग्निवीर योजनेतून भरती झालेल्या जवानांनी ४ वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर नियमित सैन्य दलात काम करण्याचा त्यांचा मार्ग आणखी सोपा झाला आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलाने अग्निवीरांना कायमस्वरूपी सेवेत कायम ठेवण्याचे प्रमाण वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. सध्याच्या नियमांनुसार ४ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीरांपैकी केवळ २५ टक्क्यांनाच नियमित सेवेत कायम ठेवता येते. परंतु ही मर्यादा वाढवण्याचा आता गांभीर्याने विचार केला जात आहे. रिपोर्टनुसार, नौदलाने अग्निवीरांपैकी जास्तीत जास्त ७५ टक्के जवानांना कायम सेवेत ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे. लष्कर आणि हवाई दलाने ही मर्यादा सध्याच्या २५ टक्क्यांवरून अंदाजे ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या प्रस्तावावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही आणि सध्याच्या नियमांनुसार तिन्ही दलांमध्ये २५ टक्के जवान कायम ठेवण्याची मर्यादा कायम आहे.

सुरुवातीच्या बॅचचा कार्यकाळ यावर्षी पूर्ण होणार
अग्निपथ योजनेअंतर्गत भरती झालेल्या पहिल्या अग्नीवीरांनी २०२३ च्या सुरुवातीला प्रशिक्षण सुरू केले. या सुरुवातीच्या बॅचचा ४ वर्षांचा कार्यकाळ आता या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होणार आहे. सध्याच्या प्रणालीनुसार सर्व अग्निवीरांना प्रथम सेवेतून सेवानिवृत्त केले जाईल आणि त्यानंतर जे अग्निवीर स्वेच्छेने सैन्यात राहणे पसंत करतील, त्यांपैकी ठराविक संख्येच्या अग्निवीरांना गुणवत्तेच्या आधारावर नियमित सैनिक म्हणून पुन्हा सेवेत घेतले जाईल. गेल्या चार वर्षांत अग्निवीरांनी आधुनिक शस्त्रे, नवीन तंत्रज्ञान आणि विविध लष्करी कारवायांमध्ये मोठा अनुभव मिळवला आहे. अशा प्रशिक्षित आणि अनुभवी सैनिकांना मोठ्या संख्येने सैन्यात ठेवणे हे राष्ट्रीय सुरक्षा आणि लष्करी क्षमतेसाठी फायदेशीर ठरेल असा सशस्त्र दलांचा विश्वास आहे. म्हणूनच सैनिकांना सैन्यात कायम ठेवण्याचे प्रमाण वाढवण्याची मागणी होत आहे.


 मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे (एमएलआयआरसी) २७ जूनपासून ३ जुलैपर्यंत अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सेंटरच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर ही भरती होणार आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात व आंध्र प्रदेशातील उमेदवारांना भरतीत सहभागी होता येणार आहे. २८ व २९ जून रोजी महाराष्ट्रातील, तर १ जुलै रोजी कर्नाटकातील उमेदवारांना संधी मिळणार आहे. पहिल्या दिवशी २७ जून रोजी खेळाडूंसाठी शारीरिक चाचणी होणार आहे.

२८ जून रोजी केवळ महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी अग्निवीर जनरल ड्युटी पदासाठी भरती होईल. यामध्ये अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई येथील उमेदवारांना सहभागी होता येईल. तर २९ रोजी नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमधील उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल.

१ जुलै मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, गोवा, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. २ जुलै रोजी ट्रेडस्मन पदासाठी भरती होईल. ३ जुलै रोजी ऑफिस असिस्टंट (क्लर्क), स्टोअरकिपर टेक्निकल या पदांसाठी केवळ मराठा इन्फंट्रीच्या माजी सैनिकांना संधी देण्यात येईल. सर्व पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा ८ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा इन्फंट्रीतर्फे करण्यात आले आहे.

वयोमर्यादा अन् शैक्षणिक पात्रता
अग्निवीर जीडी, ट्रेडस्मन व क्लर्क पदासाठी १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सोल्जर जीडी पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. क्लर्क पदासाठी बारावी उत्तीर्ण तसेच ट्रेडस्मन पदासाठी दहावी व आठवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. खेळाडूंना राज्य तसेच राष्ट्रीयस्तरावरील विजेते प्रमाणपत्र आणावे लागणार आहे.


Maharashtra Agniveer Bharti 2026

Maharashtra Agniveer Bharti 2026: अग्निपथ योजनेअंतर्गत वर्ष २०२७ साठी अग्निवीर भरती प्रक्रियेकरिता अविवाहित पुरुष उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. याबाबतची अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाइन नोंदणीची मुदत १ एप्रिल २०२६ अशी असून, सामाईक प्रवेश परीक्षा जून २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे. पुणे भरती कार्यालय (मुख्यालय) कार्यक्षेत्रातील अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे व सोलापूर जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांनी १ एप्रिल २०२६ पूर्वी ऑनलाइन नोंदणी करून अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

 


Maharashtra Agniveer Bharti 2026

Maharashtra Agniveer Bharti 2026: मुख्यालय भरती क्षेत्र, पुणे यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र राज्यातील सहा जिल्ह्यांतील अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे आणि सोलापूर निवड झालेल्या उमेदवारांसाठी सैन्य अग्निवीर भरती रॅली १० ते १५ फेब्रुवारी या कालावधीत मौलाना अबुल कलाम आझाद क्रीडा स्टेडियम, मुंब्रा, ठाणे येथे आयोजित केली जात आहे.

या भरती रॅलीमध्ये सुमारे ३ हजार १६० निवड झालेले उमेदवार सहभागी होण्याची शक्यता आहे. रॅलीमध्ये १.६ किलोमीटर धावणे, शारीरिक योग्यता चाचण्या, शारीरिक मोजमाप चाचण्या आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश असेल.
वैद्यकीय तपासणीसाठी ठाणे येथे लष्करी डॉक्टरांची एक विशेष टीम देखील तैनात केली जाईल. उमेदवारांनी संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन लष्कराच्या वतीने करण्यात आले आहे.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड