Mahanagarpalika Bharti 2026
राज्यातील महापालिका, नगरपरिषद व नगर पंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी रिक्त पदांमुळे प्रशासनावर ताण निर्माण झाल्याचा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुढे आला. आमदार सुलभा गायकवाड यांनी हा प्रश्न उपस्थित करत रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली. अपुऱ्या मनुष्यबळामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण होत असून विकासकामांवर त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
राज्यात अनेक ठिकाणी लोकनियुक्त पदाधिकारी कार्यरत असले तरी त्यांना सहाय्यक कर्मचारी अपुरे असल्याने कामकाज प्रभावीपणे पार पाडणे कठीण होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावर उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी शासनाकडून आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे आश्वासन सभागृहात दिले.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने नागरिक व लोकप्रतिनिधींना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना पीएफ व ग्रॅच्युइटी वेळेत मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचेही सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
नोकरीत स्थानिकांना प्राधान्य द्या’
राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार नवीन आकृतीबंध तयार करून त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, तसेच रिक्त पदांची भरती करताना स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणीही गायकवाड यांनी केली. यावर सरकारकडून सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
Mahanagarpalika Bharti 2026
निवडणुकीच्यानंतर महापालिकेत नोकरभरतीची तयारी सुरु होणार आहे. पुढील तीन ते चार महिन्यात अत्यावश्यक अशा २२४ पदांवर भरती केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेतील अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढत आहे. रिक्त पदांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून महापालिकेचा कारभार हाकला जात आहे. रिक्त पदांपैकी अत्यावश्यक पदांवर भरती करण्याची परवानगी महापालिकेने राज्य शासनाकडे मागीतली होती. त्याला हिरवा कंदील मिळाल्यावर पहिल्या टप्प्यात सुमारे १४७ पदांवर भरती करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील २२४ जागांसाठी शासनाने परवानगी दिली. या जागांवर भरती करण्यासाठी सुमारे दीड वर्षांपासून पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत.
पदांचे रोस्टर (बिंदू नामावली) ठरवण्यात बराच कालावधी निघून गेला. रोस्टर निश्चित झाल्यावर पालिकेने नोकरभरतीसाठी आयबीपीएस या शासनमान्य संस्थेची नियुक्ती केली. या संस्थेच्या माध्यमातून परीक्षा घेऊन पात्र उमेदवारांना नोकरी करण्याची संधी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला.
त्यानुसार संस्थेशी संपर्क करून पुढील प्रक्रिया ठरवण्यात आली. दरम्यानच्या काळात निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे भरती प्रक्रियेला पुन्हा ब्रेक लागला. आचारसंहिता संपल्यानंतर नोकरभरतीची प्रक्रिया लगेचच सुरू केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार पालिकेच्या आस्थापना विभागाने नोकरभरतीच्या अनुशंगाने जाहिरात तयार करुन ती आयबीपीएस या संस्थेला प्रसिद्ध करण्यासाठी पाठवली आहे. जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात ही जाहिरात संस्थेकडून प्रसिद्ध केली जाईल. जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर इच्छुकांना त्या त्या पदासाठी अर्ज करण्यासाठी एक महिन्याचा अवधी दिला जाणार आहे. या कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन लेखी परीक्षेची तयारी करण्यात येणार आहे
Mahanagarpalika Bharti 2025
निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे महापालिकेतील नोकरभरती लटकली आहे. आता पार निवडणुकीची प्रक्रिया पडल्यानंतर नोकरभरतीला मुहूर्त लागेल असे मानले जात आहे. त्यामुळे नोकरभरती पदाधिकारी, नगरसेवकांचा वरचष्मा असेल अशी चर्चा सुरू झाली आहे. महापालिकेतील अधिकारी कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे पालिकेचा कारभार कंत्राटींच्या भरवशावर सुरू आहे. सुमारे अडीच हजार कंत्राटी कर्मचारी पालिकेत काम करतात. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये रिक्त झालेल्या संभाजीतसर माहातयरपालिका छत्रपती संभाजी पदांवर नोकरभरती करण्याचा प्रस्ताव महापालिकेने शासनाला पाठवला होता. परंतु शासनाने अत्यावश्यक सेवेतील पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली. त्यात पहिल्या टप्प्यात ११४ पदे भरण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील २२४ पदांना देखील शासनाने मान्यता दिली. शासनाची मान्यता मिळाल्यावर महापालिकेने नोकरभरतीची तयारी सुरू केली. पदांची वर्गवारी करुन त्यांची बिंदुनामावली करण्यासाठीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवणार आला. सुमारे दीड वर्षानंतर बिंदुनामावली निश्चित करून त्याचा तपशील विभागीय आयुक्त कार्यालयाकडून महापालिकेला पाठवण्यात आला.
बिंदूनामावली निश्चित झाल्यावर महापालिकेने नोकरभरतीसाठी आयबीपीएस या एजन्सीची नियुक्ती केली. या एजन्सीला नोकरभरतीची जाहिरात तयार करण्याची सूचना करण्यात आली. सुमारे महिनाभरापूर्वी पालिकेने त्या एजन्सीला जाहिरात तयार करण्याबद्दल सांगितले होते पण निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी एजन्सीकडून जाहिरात तयार करण्यात आली नाही.
आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिरात प्रसिध्द करुन लगेचच नोकरभरती करण्याचे पालिका प्रशासनाचे नियोजन यामुळे कोलमडले. महापालिकेच्या निवडणुकीनंतरच नोकरभरती होईल हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नोकरभरतीत पदाधिकारी, नगरसेवकांचा हस्तक्षेप होईल अशी चर्चाही सुरू झाली आहे. २२४ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची केवळ लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि गुणवत्तेनुसार नियुक्ती दिली जाणार आहे, त्यामुळे नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाला काही अर्थ राहील का असा प्रश्नदेखील विचारला जात आहे.
Mahanagarpalika Bharti 2025
पुणे जिल्ह्यात नागरीकरणाचा वेग आणि लोकसंख्येची वाढ लक्षात घेता चाकण, हिंजवडी आणि फुरसुंगी येथे तीन नवीन महापालिका स्थापन करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. शुक्रवारी (८ ऑगस्ट) सकाळी चाकण औद्योगिक परिसराच्या दौऱ्यात त्यांनी हा मुद्दा मांडला. दौऱ्यावेळी आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील, पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखरसिंह, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे तसेच संबंधित अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
“कोणाला आवडो किंवा न आवडो, परंतु चाकण आणि परिसरासाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करणे अपरिहार्य आहे,” असे पवार यांनी स्पष्ट केले. सध्या जिल्ह्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोनच महापालिका आहेत; मात्र वाकवस्ती, वाघोली, मांजरी, फुरसुंगी, उरुळी देवाची आणि हिंजवडीसारख्या झपाट्याने वाढणाऱ्या भागांसाठी स्वतंत्र पालिकेची आवश्यकता भासत आहे.
पवार यांनी सांगितले की, चाकण महापालिकेसाठी प्रस्ताव तयार असून, मंजुरी मिळाल्यानंतर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने पुढील प्रक्रिया राबवली जाईल.
Mahanagarpalika Bharti 2025
Mahanagar Palika Bharti 2025 – Maharashtra Mahanagar Palika Bharti 2025 latest update is published by the State Government. As per the latest news update received, recruitment process for around 22,000 vacancies will begin soon. This will a great opportunity for the job aspirants of Maharashtra. Also there are around 55000 vacancies are there under the Nagar Parishad of Maharashtra. So, Maharashtra Mahanagar Palika Bharti 2025 will begin soon for large number of vacancies.
नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यातील (Megabharati) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यभरातील २८ महापालिकांमध्ये मोठी नोकरभरती राबवली जाणार आहे. यामध्ये एकूण रिक्त ४८,६८० पदांपैकी विविध प्रकारच्या २२,३८१ पदांवर भरती होणार हे जवळजवळ निश्चित आहे. यामध्ये ब, क, ड वर्गातील पदांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. महाराष्ट्रातील विविध महानगर पालिकांमधील 22,831 पदे भरण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नगरविकास विभागाने हा शासन निर्णय जारी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी घेतलेल्या महापालिका आयुक्त आणि मुख्याधिकारी यांच्या परिषदेत महानगरपालिकांतील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, महापालिकांना आस्थापनेवरील खर्च 35 टक्क्यांपेक्षा जास्त करता येत नाही. आताच (Megabharati) बहुतेक महापालिकांचा आस्थापनेवरील खर्च 35 टक्क्यांपेक्षा जास्त होतो आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊनही रिक्त पदांवर भरती करता येणे शक्य होत नव्हते. राज्यातील लाखो विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. राज्यासह केंद्र शासनाकडून करण्यात येणाऱ्या भरतीसाठी हे परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. गेल्या दोन वर्षांत शासनाकडून हजारो पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली असून, या काळात सर्वाधिक संधी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळाली आहे. आता महाराष्ट्र शासनाकडून हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, त्यासाठी ५ महिन्यांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. यामध्ये महापालिकेतील २२,३८१ पदांचा समावेश आहे. रिक्त पदांपैकी ४५ टक्के पदांची भरती केली जाणार असून, त्यासंदर्भातील माहिती संबंधित विभागाकडून संकलित करण्यात आली आहे.
Mahanagarpalika Bharti 2025 Post Details Expected

आगामी काळात ५ महिन्यांमध्ये हजारो पदे भरली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने पोलीस, वनरक्षक, वनसेवक, आरोग्य विभाग, तलाठी, ग्रामसेवक, नगर परिषद यासह विविध विभागांचा समावेश आहे. त्याचबरोबर राज्य शासनाकडून महापालिकेतील रिक्त पदांची माहिती मागवण्यात आली आहे. यामध्ये १ लाख २० हजार ५६६ मंजूर पदे असून, त्यापैकी ६६,४९६ पदे भरली आहेत, तर रिक्त ४८,६८० पदांपैकी २२,३८१ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरळसेवा, एमपीएससी परीक्षेची वर्षानुवर्षे तयारी करत असलेल्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेच्या निमित्ताने पुन्हा एक मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















