MAHADGIPR Bharti Result 2026 – The recruitment process for 42 important posts in Group ‘A’ and ‘B’ categories in the Directorate General of Information and Public Relations of the state government has been virtually delayed due to the slow pace of the Maharashtra Public Service Commission. The examination was conducted two and a half years after the advertisement was published in 2026. Now, with the results of MAHADGIPR Bharti Result is also delayed, the fate of thousands of candidates is in doubt.
MAHADGIPR Recruitment Result 2026 – राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील गट ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीतील ४२ महत्त्वाच्या पदांसाठीची भरतीप्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संथगतीमुळे अक्षरशः रेंगाळली आहे. २०२२ मध्ये जाहिरात प्रसिद्ध होऊन तब्बल अडीच वर्षांनंतर परीक्षा घेण्यात आली. आता निकालही रखडल्याने हजारो उमेदवारांचे भवितव्य अधांतरी सापडले आहेत.

माहिती व जनसंपर्क विभागात उपसंचालक (माहिती), वरिष्ठ साहाय्यक संचालक (माहिती), जिल्हा माहिती अधिकारी, वरिष्ठ उपसंपादक, जनसंपर्क अधिकारी (गट-अ) आणि साहाय्यक संचालक (माहिती), अधिपरीक्षक, माहिती अधिकारी (गट-ब), अशा एकूण ४२ पदांसाठी आयोगाने ३० डिसेंबर २०२२ रोजी जाहिरात क्रमांक १२९/२०२२, १३०/२०२२ आणि १३१/२०२२ नुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा होऊन निकाल लवकर लागेल, या अपेक्षेने अर्ज भरले होते, जेणेकरून वर्षभरात प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यांना शासकीय सेवेत रुजू होण्याची संधी मिळेल, असा दृष्टिकोन यामागे होता; परंतु उमेदवारांच्या या आशेवर पाणी फेरले आहे. जाहिरात प्रसिद्ध होऊन दोन वर्षे चार महिन्यांचा कालावधी झाला. १० मे २०२५ रोजी या सर्व पदांसाठीची संयुक्तिक ऑनलाइन परीक्षा मुंबईतील एकाच केंद्रावर घेण्यात आली. परीक्षा पूर्ण होऊन महिना उलटला, तरीही लोकसेवा आयोगाकडून परीक्षेच्या निकालाचा पत्ता नाही.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















