महाभरती एप्रिल पासून होणार !
Mahabharti 2020 From April 2020 Important Update
Maharashtra MahaBharti 2020 is Expected to Start From April 2020.
महापरीक्षा पोर्टलबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेवून लोकप्रतिनिधींनीही पोर्टल बंदची मागणी लावून धरली. त्यानुसार ठाकरे सरकारने पोर्टल बंद केले, मात्र महाभरती कशी राबवायची, असा प्रश्न नव्याने उपस्थित झाला. त्यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी (ता. 21) महाआयटीच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. आगामी महाभरती प्रक्रिया कशाप्रकारे राबवायची, याबाबत सुस्पष्ट निर्देश काही दिवसांत राज्य सरकार देणार असून त्यानुसार महाडीबीटीने नियोजन करावे, अशा सूचना सचिवांनी दिल्या. महाभरतीसाठी नियुक्त एजन्सीची क्षमता व तांत्रिक पडताळणीचे काम महाआयटीकडे राहणार आहे. तत्पूर्वी, महापरीक्षा पोर्टलकडील विद्यार्थ्यांचा डाटा महाडीबीटीला हस्तांतरीत केला जाणार असून नियुक्त एजन्सीमार्फत राबविल्या जाणाऱ्या परीक्षा व निकालावर महाडीबीटीचे नियंत्रण राहणार आहे. या प्रक्रियेसाठी दीड महिन्यांचा अवधी लागणार असल्याने एप्रिलपासून महाभरतीला सुरवात होईल, अशी शक्यताही महाडीबीटीने व्यक्त केली.
- महाभरतीसाठी आता खासगी एजन्सी
- महाआयटीकडे राहणार नियंत्रणाची जबाबदारी
- एप्रिलपासून रिक्त पदांची भरती
- निविदेच्या माध्यमातून खासगी एजन्सीचे मागविणार प्रस्ताव
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महापरीक्षा पोर्टल बंद ! अधिकृत GR जाहीर !
राज्य सरकारच्या निर्देशानुसार महापरीक्षा पोर्टल बंद झाल्याने आता पोर्टलकडील डाटा महाआयटी व जेईडीकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यातील रिक्त पदांच्या भरतीसाठी खासगी एजन्सीचे निवीदेद्वारे प्रस्ताव मागवून त्यापैकी एक सक्षम एजन्सीची निवडली जाणार आहे. भरती प्रक्रियेची रुपरेषा ठरविणे व एजन्सी नियुक्तीची प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी महाआयटीकडे सोपविण्यात आली आहे.
– अजित पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाआयटी, मुंबई
मेगाभरतीचे आगामी नियोजन
- रिक्त पदांच्या भरतीच्या नियोजनाबाबत लवकरच सुस्पष्ट शासन निर्णय
- महापरीक्षा पोर्टलकडील विद्यार्थ्यांची नोंदणी व अन्य माहिती महाआयटीकडे हस्तांतरीत
- निविदेच्या माध्यमातून खासगी एजन्सीचे मागविणार प्रस्ताव : त्यांची होणार तांत्रिक व क्षमता पडताळणी
- अर्ज मागविणे, परीक्षा घेणे व निकाल लावण्यापर्यंतची जबाबदारी महाडीबीटीकडे राहणार
- सर्व प्रक्रिया दिड महिन्यांत पूर्ण करुन महाभरतीला प्रारंभ करण्याचे सचिवांनी दिले निर्देश
Table of Contents
Sir aamhi me 2019 madhe form bhrle t tyach Kay honar te cansal jhalet ka
Vacancy aahe ka
परीक्षा फिस मिडणार की नाही।।आम्ही फॉर्म भरलं पण पेपर झालं नाही।तर परत एक्साम फ्री कस काय भरणार।
एप्रिल पासून फ्रॉम भरायला सुरवात होणार का,आणि त्यानंतर किती दिवसांनी परीक्षा होईल
Respected sir
Sir mazya electrician ITI zala mi job search kartoy ahe
Mala job bhetala ka