SSC Hall Ticket 2026
दहावीची परीक्षा महिन्यावर आली असताना परीक्षेचे हॉलतिकीट कधी मिळणार असा प्रश्न विद्यार्थी विचारत होते. यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हॉलतिकीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या मंगळवार दि. २० पासून माध्यमिक शाळांच्या लॉगिनवर हॉलतिकीट उपलब्ध केले जाणार असून, विद्यार्थ्यांना कोणतेही वेगळे शुल्क न देता हॉलतिकीट प्राप्त करून घेता येती, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली आहे.
डॉ. माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालकांना फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचे हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार परीक्षेचे हॉलतिकीट www. mahahsscboard. in या वेबसाईटवर माध्यमिक शाळांच्या लॉगिनमध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील. शाळांनी विद्यार्थ्यांना हॉलतिकीट मोफत प्रिंट करून द्यावीत. हॉलतिकीटच्या प्रिंटवर शाळेच्या मुख्याध्यापकांचा शिक्का आणि स्वाक्षरी असेल. हॉलतिकीटमध्ये विषय व माध्यम बदलले असतील तर त्यांच्या दुरुस्त्या विभागीय मंडळात जाऊन करून घ्यायच्या आहेत. हॉलतिकीटवरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या ऑनलाइन करून घेता येणार आहेत. हॉलतिकीट विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे अशा स्पष्ट सूचना डॉ. माळी यांनी दिल्या आहेत.
SSC Hall Ticket 2025 Download
राज्य मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे हॉलतिकीट येत्या २० जानेवारी २०२५ पासून ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. शाळांनी हॉलतिकिटाचे प्रिंटिंग विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत. हॉलतिकीट राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या वेबसाइटवर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हॉलतिकिटाची प्रिंट काढून मुख्याध्यापकांचा शिक्का घेऊन स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रावरील छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचे छायाचित्र चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी, असेही आदेशात म्हटले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राज्य मंडळातर्फे नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. राज्य मंडळाच्या परिपत्रकानुसार, सर्व विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांनी दहावीच्या परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट काढून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. हॉलतिकीट विद्यार्थ्यांना देताना त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारू नये. तसेच हॉलतिकिटावर मुख्याध्यापक यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. हॉलतिकिटामध्ये विषय किंवा माध्यम बदल असेल तर त्याच्या दुरुस्त्या शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात. हॉलतिकिटावरील फोटो असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा सदोष फोटो चिटकवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. एखाद्या विद्यार्थ्यांकडून हॉलतिकीट गहाळ झाल्यास संबंधित शाळांनी पुन्हा हॉलतिकीट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा मारून विद्यार्थ्यांकडे हॉलतिकीट द्यावे, असेही राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
Download Maha SSC Board Hall Ticket 2025 Link
SSC HALL TICKET 2025 –www.mahahsscboard.in
१. मार्च 2025 मधील इ. १० वी परीक्षेसाठीसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी इ. १० वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत…
२. प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रिंट करून देताना विद्याथ्र्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी,
३. प्रवेशपत्रामध्ये (Hall Ticket) विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत.
४. प्रवेशपत्रावरील (Hall Ticket) फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे.
५. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यास प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.
दहावीचे हॉल मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे. तरी मार्च २०२३ तिकीट आले… मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक शालान्त (इ.१० वी ) प्रमाणपत्र परीक्षेसाठी
६. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधि प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच सर्व माध्यमिक शाळा यांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















