शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्जावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश! | Maha DBT Scholarship Application 2025

Maha DBT Scholarship Application 2025

Maha DBT Scholarship Latest Update

 

आताच प्राप्त नवीन माहिती नुसार महाडीबीटी (MahaDBT) संकेतस्थळावर तंत्रशिक्षण विभागाच्या तीन शिष्यवृत्ती योजनांचे तब्बल १९ हजार ३३ अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळावी यासाठी तंत्रशिक्षण विभागाने सर्व महाविद्यालयांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

Maha DBT Scholarship Application 2025

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

परिपत्रकाद्वारे सूचना जाहीर
पुणे विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव यांनी यासंदर्भात अधिकृत परिपत्रक काढले आहे. या अंतर्गत, अर्ज वेळेत निकाली न काढल्यास जबाबदारी महाविद्यालयांच्या प्राचार्यांवर टाकण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज प्रलंबित
तंत्रशिक्षण विभागाच्या तीन प्रमुख शिष्यवृत्ती योजनांतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनांमध्ये—
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (७,८०१ अर्ज प्रलंबित)
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाहभत्ता योजना (१०,८१० अर्ज प्रलंबित)
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम शिष्यवृत्ती योजना (४२२ अर्ज प्रलंबित)

अर्ज प्रक्रियेत अडथळे का?
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये अर्ज सादर केल्यानंतर, त्याची पडताळणी करून तो महाडीबीटी पोर्टलवर अपलोड केला जातो. मात्र, अनेक अर्ज महाविद्यालय स्तरावरच थांबले असून त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास विलंब होत आहे.

संस्थांची दिरंगाई विद्यार्थ्यांसाठी अडचणीचे
अनेक महाविद्यालयांनी अद्याप अर्ज महाडीबीटी प्रणालीत पुढे पाठवलेले नाहीत. परिणामी, विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. तंत्रशिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने पाहून त्वरीत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तातडीने अर्ज निकाली काढण्याचा आदेश
महाविद्यालयांनी सर्व अर्ज तपासून महाडीबीटी संकेतस्थळावर त्वरित सादर करावेत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. संस्थांनी कुठलीही दिरंगाई न करता अर्ज प्रक्रियेला वेग द्यावा, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.

प्राचार्यांची जबाबदारी निश्चित
जर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास विलंब झाला किंवा ते वंचित राहिले, तर याला संपूर्णपणे संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार असतील. त्यामुळे महाविद्यालयांनी तातडीने प्रलंबित अर्ज निकाली काढावेत, असे तंत्रशिक्षण विभागाने बजावले आहे.

 


Maha DBT Scholarship Application 2025 : सामाजिक कल्याण आयुक्तांनी माहिती दिली आहे की 2018-19 ते 2023-24 या काळात ज्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही, असे विद्यार्थी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. पूर्व-मैट्रिक आणि पोस्ट-मैट्रिक शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी एक चांगली बातमी आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या शिष्यवृत्ती योजना अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत, मात्र विविध कारणांमुळे ज्यांचे अर्ज नाकारले गेले होते, ते विद्यार्थी आता शिष्यवृत्ती मिळवू शकतात आणि त्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत ऑफलाइन अर्ज करावा लागेल. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

2017 पासून, लाभार्थी विद्यार्थ्यांच्या आधार-लिंक्ड बँक खात्यात थेट बँक ट्रान्सफर (DBT) द्वारे शिष्यवृत्ती रक्कम जमा केली जाते. तथापि, 2018-19 ते 2023-24 दरम्यान अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज विविध कारणांमुळे नाकारले गेले.

आधार नोंदणी नसल्यामुळे, तांत्रिक अडचणी किंवा उत्पन्न मर्यादा, जात पडताळणी प्रमाणपत्राचा अभाव यामुळे अनेक विद्यार्थी अर्ज करू शकले नाहीत. तसेच, महाडीबीटीवर महाविद्यालयांनी वेळेत शुल्क निश्चित न केल्यामुळे किंवा नियमित व पूरक परीक्षेच्या निकालात उशीर झाल्यामुळे अनेक अर्ज नाकारले गेले. सामाजिक कल्याण विभागाने गरीब इच्छुक विद्यार्थ्यांना नुकसान होण्यापासून वाचविण्यासाठी एक संधी दिली आहे. या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या माध्यमातून सहाय्यक सामाजिक कल्याण आयुक्त कार्यालयात 30 नोव्हेंबरपूर्वी ऑफलाइन अर्ज सादर करायचे आहेत. या अर्जांची जिल्हावार सहाय्यक सामाजिक कल्याण कार्यालयाकडून तपासणी केली जाईल आणि 31 जानेवारी 2025 पर्यंत सामाजिक कल्याण आयुक्तांकडे पाठवली जाईल.

प्रत्येक अर्ज तपासण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्याची जबाबदारी असेल, जेणेकरून विद्यार्थ्याने यापूर्वी शिष्यवृत्ती किंवा शुल्क माफीसाठी अर्ज केला नाही हे निश्चित होईल. तथापि, कोणीही चुकीचा कृत्य केल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी प्राचार्यांवर असेल असे सामाजिक कल्याण आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

2018-19 ते 2023-24 दरम्यान शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येईल आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून कागदपत्रे सादर केल्यास त्यांना शिष्यवृत्ती मिळू शकते.


Maha DBT Offline Application Form PDF

Maha DBT Scholarship Application : राज्य सरकारच्या महाडीबीटी संकेतस्थळावरील मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित राहिलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. या  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

Documents required for MahaDBT Scholarship 

MahaDBT Registration Process 2025

 

Following is the list of required documents for MahaDBT Application form 2024.  All the documents required are listed below:

  • Aadhar Card
  • School/College Leaving Certificate
  • Cap allotment letter
  • College fee receipt
  • Marksheet of SSC (10th std)
  • Marksheet of HSC (12th)
  • Previous Year Marksheet
  • All semester Marksheets
  • Cast Certificate
  • Income Certificate of current financial year (from Tehsildar)
  • Bank Passbook
  • Self Declaration
  • Domicile Certificate
  • Rashan Card
  • Hostel Certificate (If Required)
  • Gap Certificate (If Required)
  • Handicap Certificate (If Required)

 

Helpline Number For MahaDBT Scholarship

For any query or assistance please call to given helpline number 022-49150800

How to Apply Maha DBT Scholarship 

  • mahaDBT पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन आयडी, पासवर्ड तयार करा.
  • पोर्टलवर लॉग इन व्हा.
  •  तुमचे प्रोफाइल तयार करा.
  • ज्या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहात त्यासाठी अर्ज करा

संकेतस्थळ – https://mahadbt.maharashtra.gov.in

???? अर्ज करा



Maha DBT Portal For Various Scheme 

Maha DBT Scholarship Application  : Social Justice Minister Dhananjay Munde has announced an extension to apply for various schemes on the MahaDBT portal. Students who applied in the year but had errors have also been given an extension till January 31 to rectify the errors or rectify the application. Further details are as follows:-

About 4.70 lakh students belonging to Scheduled Castes and Neo-Buddhists avail the above facilities through DBT portal every year. This year, the deadline to apply or renew the application was January.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

9 Comments
  1. MahaBharti says

    Maha DBT Scholarship लिंक

  2. sharad rajusing jadhav says

    Arj bharayche aahe

  3. MahaBharti says

    New Information

  4. Shivraj yallappa chaugule says

    I have not received any scholarship

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड