सीईटीच्या प्रश्नांवर २३२ विद्यार्थ्यांनी तब्बल १ हजार ४०० आक्षेप नोंदवले। Maha CET Objection Tracker Link

Maha CET Objection Tracker Link

Maha CET Objection Filling 2024

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांवर २३२ विद्यार्थ्यांनी तब्बल १ हजार ४०० आक्षेप नोंदवले आहेत. यातील ४७ आक्षेपांमध्ये तथ्य असल्याचे आढळले आहे. त्यामुळे या प्रश्नांचे पूर्ण गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी २२ एप्रिल ते १६ मेदरम्यान एमएचटी सीईटीची परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये पीसीबी गटाची परीक्षा २२ ते ३० एप्रिल २०२४ दरम्यान तर पीसीएम गटाची परीक्षा २ ते १६ मे २०२४ दरम्यान घेण्यात आली होती. या दोन्ही परीक्षांची उत्तर तालिका आणि सोडविलेली प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या लॉगीन आयडीवर प्रसिद्ध केली होती. प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न आणि उत्तर तालिका यांच्यावर आक्षेप असल्यास विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर जाऊन प्रति आक्षेप एक हजार रुपये भरून ते नोंदवावेत, असे आवाहन सीईटीने केले होते. त्यानुसार २३२ विद्यार्थ्यांनी एकूण १ हजार ४२५ आक्षेप नोंदवले होते. यापैकी पीसीएम गटामध्ये सर्वाधिक २२७ विद्यार्थ्यांनी १ हजार ४०८ आक्षेप नोंदवले, तर पीसीबी गटामध्ये ५ विद्यार्थ्यांनी १५ आक्षेप नोंदवले होते. सर्वाधिक आक्षेप गणित (६८६) विषयातील प्रश्नांवर नोंदवण्यात आले होते.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

४७ आक्षेपांमध्ये तथ्य
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीच्या परीक्षेचे ३० सत्र घेण्यात आले होते. या ३० सत्रांमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांचे ५ हजार १०० प्रश्न निवडण्यात आले होते. यातील ४७ प्रश्नांवरील आक्षेपांमध्ये तथ्य आढळले आहे

1 MHT CET 2024-25 Notice : MHT-CET-2024 Objection Tracking  29/05/2024 Download

Maha CET Objection Tracker Link

Maha CET Objection Tracker Link: Good News For CET Appearing candidates. “OBJECTION TRACKER” will be made available to the candidates in their login for the first time for the Academic Year 2024-25 to track the objections on the questions and answers given by them in the Common Entrance Test

राज्यात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेदरम्यान विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरसूची, यावर आक्षेप आणि हरकती नोंदविण्यासाठी आता ‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) पहिल्यांदाच अशा प्रकारची सुविधा विकसित केली असून ती यंदा पहिल्यांदाच खुली करण्यात आली आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सीईटी सेलमार्फत विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांच्या दरम्यान विचारण्यात आलेले प्रश्न आणि प्रश्नपत्रिकेची उत्तरसूची यावर विद्यार्थ्यांना आणि पालकांना आक्षेप, हरकती नोंदविता येतात. त्यासाठी आता ‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे आक्षेप, हरकती नोंदविण्यासाठी परीक्षानिहाय स्वतंत्र कालावधी देण्यात येईल. त्या कालावधीची माहिती अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करणार असल्याचे सीईटी सेलने सांगितले आहे.

Maha CET Objection Link 2024 | सीईटी परीक्षेत आता ‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ची सुविधा; काय आहे वैशिष्ट्ये जाणून घ्या 

Maha CET Objection Link 2024

‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ची सुविधा शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सुरू

‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ची सुविधा शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सुरू करण्यात येत आहे. या यंत्रणेच्या सहाय्याने संबंधित आक्षेप, हरकत नोंदविणाऱ्यांना आक्षेपांवर काय कार्यवाही झाली, याची माहिती देखील तपासता येणार आहे. या हरकती नोंदविण्यासाठी संबंधित उमेदवारांना शुल्कही द्यावे लागणार आहे. या यंत्रणेअंतर्गत विविध प्रवेश परीक्षांच्या सीईटी परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांवर आणि उत्तरसूचींवर आक्षेप आणि हरकती नोंदविण्याचे वेळापत्रक दिले आहे. या संदर्भातील वेळापत्रक आणि तपशील सीईटी सेलने ‘https://cetcell.mahacet.org’ या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला आहे. प्रवेश परीक्षेसाठी अर्जाची नोंदणी करताना वापरलेल्या लॉगिनद्वारेच आक्षेप-हरकती नोंदविता येणार आहेत, असेही सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ सुविधेची वैशिष्ट्ये :

परीक्षार्थीला संबंधित परीक्षेतील पेपरमध्ये विचारलेल्या प्रश्नावर आणि त्यांच्या उत्तरावर आक्षेप असल्यास तो या यंत्रणेद्वारे नोंदविता येणार संबंधित परीक्षार्थीच्या अर्ज नोंदणीसाठी वापरलेल्या ई-मेल आणि लॉगिंनमधूनच या सुविधेचा वापर शक्य संबंधित उमेदवाराला प्रति प्रश्न/प्रति हरकत किंवा आक्षेपासाठी एक हजार रुपयांचे शुल्क ऑनलाइन द्यावे लागणार


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड