MAH MBA CET Result 2024
MAH MBA CET Result 2024 : Maharashtra CET Cell has announced the results of MAH MBA CET exam on Wednesday. As per the court order, the results of the remaining students have been declared while retaining the results of the petitioner students. Further details are as follows:-
एमएएच एमबीए सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर –
महाराष्ट्र सीईटी सेलने शुक्रवारी एमएएच एमबीए सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवत उर्वरित विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राज्यभरातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल सीईटी सेल कक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. तब्बल दोन महिने निकाल जाहीर झाला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अखेर बुधवारी हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
प्रवेश परीक्षा कक्षामार्फत ९ ते ११ मार्च राज्य व राज्याबाहेरील १७८ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी १ लाख ५२ हजार ९९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ३८ हजार ६८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यंदा प्रथमच सीईटी सेलच्या वतीने परीक्षांसंदर्भात आक्षेप नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. यामध्ये ४१५ विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवले होते. त्यापैकी (युनिक) आक्षेप ९९ होते. सर्व आक्षेपांचे निराकरण करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्याच्या लॉगइनमध्ये गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, सीईटी सेलच्या वतीने १३ परीक्षा आतापर्यंत झाल्या आहेत. यापैकी १० अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये बी एड, एमएड, बीपीएड, एमपीएड, लॉ पाच वर्ष आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर झालेला आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















