Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MAH BEd CET 2020 Result: परीक्षांचे निकाल लवकरच

MAH BEd CET Result

MAH BEd CET 2020 Result: बीएड, इएलसीटी परीक्षांचे निकाल लवकरच

MAH BEd CET 2020 Result: महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे घेण्यात आलेल्या बीएड सीईटी आणि बीएड इएलसीटी २०२० परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर केले जाणार आहेत. अधिकृत संकेतस्थळावरील अपडेटनुसार, हे निकाल ९ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार होते. मात्र, सीईटी कक्षाने अद्याप निकालाच्या बाबतीत कोणतीही अधिकृत सूचना उपलब्ध केलेली नाही.

MAH BEd CET Result : निकाल जाहीर झाल्यानंतर ही परीक्षा दिलेले उमेदवार mahacet.org वर भेट देऊ शकतील. पुढील पद्धतीने निकाल तपासता येऊ शकेल.

  • – निकाल जारी झाल्यानंतर उमेदवार सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ mahacet.org वर जा. – होमपेजवर MAH BEd CET 2020 Result या लिंकवर क्लिक करा.
  • – आता एक नवं पेज उघडेल. येथे उमेदवारांनी आपले क्रिडेन्शिअल भरा आणि सबमिट करा.
  • – आता तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • – निकाल तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटही काढून ठेव शकता.

निकाल जाहीर होतात उमेदवारांचे काऊन्सेलिंग सुरू होईल. या समुपदेशन फेरीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिले जातील. बीएड कॉमन एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच बीएड सीईटी आणि बीएड इएलसीटी २०२० या परीक्षा २१, २२ आणि २३ ऑक्टोबर २०२० रोजी झाल्या होत्या. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाल्या होत्या. बीएड सीईटीसाठी प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये होती. बीएड इएलसीटीसाठी केवळ इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका होती. बीएड सीईटीसाठी एकूण १०० प्रश्नांसाठी ९० मिनिटांचा कालावधी होता. या परीक्षेत नकारात्मक गुणांकन नव्हते. तर बीएड इएलसीटीसाठी एकून ५० प्रश्न विचारण्यात आले. प्रत्येक योग्य उत्तराला १ गुण होता. रीडिंग कॉम्प्रिहेंशन, ग्रामर, फोनेटिक्स, फिगर्स ऑफ स्पीच, सेंटेंस फॉर्मेशन आदी विषयांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

सोर्स  म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड