खुशखबरी! महाराष्ट्र लॉजिस्टिक मधून ५ लाख रोजगार, नागपुरात नॅशनल हब | Logistics Jobs in Maharashtra
Logistics Jobs in Maharashtra
Logistics Jobs in Maharashtra For Freshers
Logistics Jobs in Maharashtra: महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण- २०२४ ला राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली. या धोरणामुळे राज्यात सुमारे ५ लाख इतकी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे. त्यातून सुमारे ३० हजार ५७३ कोटी उत्पन्न मिळेल असे अपेक्षित आहे. हे धोरण पुढील १० वर्षांतील विकासाला समोर ठेवून तयार करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत राज्यात २०२९ पर्यंत १० हजार एकराहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी टार्टी, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृतच्या धर्तीवर ‘अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था’ची (एमआरटीआय) स्थापना करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला. विधानसभा निवडणूक आलेली असताना अल्पसंख्याक समाज विशेषतः मुस्लिम समाजाला दिलासा देणार निर्णय सरकारने घेतला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नागपुरात नॅशनल हब
नागपूर- वर्धा नॅशनल मेगा लॉजिस्टिक हब हे पंधराशे एकरवर उभारण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. छत्रपती संभाजीनगर-जालना, ठाणे-भिवंडी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे- पुरंदर व पालघर- वाढवण या ५ ठिकाणी प्रत्येकी ५०० एकरवर राज्य लॉजिस्टिक हबसाठी २,५०० कोटींची तरतूद करण्यात येईल.
६ कोटी २५ लाखांच्या खर्चास मान्यता
अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी एकूण ११ पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या संस्थेच्या आस्थापनेवरील पदांचे वेतन, कार्यालयीन खर्च, मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी, प्रशिक्षणासाठी एकूण ६ कोटी २५ लाख रुपयांच्या खर्चासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
Comments are closed.