खुशखबर – भारतातील महिलांसाठी रोजगाराची मोठी संधी होणार उपलब्ध!!

LinkedIn & UN Women Jobs

LinkedIn & UN Women Jobs 

LinkedIn & UN Women Jobs : Good News!! Linkdin UN Women to create jobs for women in India. LinkedIn on Wednesday announced a partnership with UN Women to advance women’s economic empowerment in the Asia Pacific, beginning with India. With this partnership, LinkedIn and UN Women will work together to close the digital divide between men and women. The project which will be launched as a pilot-project in Maharashtra, will cultivate the digital, soft, and employability skills of over 2,000 women, claims LinkedIn in its press release. Further details are as follows:-

LinkedIn, UN Women Join Hands to Empower Indian Women Digitally and Make Them Job Ready

लिंक्‍डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक नेटवर्कने आज मोठी घोषणा केली आहे. लिंक्‍डइन महिलांना आर्थिकदृष्‍ट्या सक्षम करण्‍यासाठी लैंगिक समानतेशी समर्पित युनायटेड नेशन्‍स कंपनी यूएन विमेनसोबतच्‍या तीन वर्षाच्‍या प्रादेशिक सहयोगामध्‍ये ५००,००० डॉलर्सची (३.८८ कोटी रूपये) गुंतवणूक करणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • विशेष बाब म्हणजे या प्रकल्‍पाला भारतातील महाराष्‍ट्रामधून सुरूवात होईल.
 • हा प्रकल्‍प २,००० महिलांच्‍या डिजिटल, सॉफ्ट व रोजगारक्षम कौशल्‍यांना निपुण करेल आणि त्‍यांना रोजगार मेळावे, मार्गदर्शन सत्रे व पीअर-टू-पीअर नेटवर्क्‍सच्‍या माध्‍यमातून करिअर घडवण्‍याची संधी देईल.
 • इतकंच नाही तर, हा सहयोग महिलांना डिजिटली अपस्किल करण्‍यासोबत रोजगारांची अधिक उपलब्‍धता देईल आणि औपचारिक अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये पूर्णपणे सहभाग घेण्‍यास सक्षम करेल.
 • आशिया-पॅसिफिक प्रदेशातील लैंगिक-संबंधित तंत्रज्ञान धोरणनिर्मितीचे निराकरण करणे हे आशियामध्‍ये महत्त्वाचे आहे.
 • ५४.६ टक्‍के पुरूषांच्‍या तुलनेत ४१.३ टक्‍के महिलांना इंटरनेट उपलब्‍ध होते.
 • यामधून ३२ टक्‍के लैंगिक पोकळी दिसून येते. इंटरनॅशनल टेलिकम्‍युनिकेशन्‍स युनियन (आयटीयू)च्‍या मते, २०१३ ते २०१७ दरम्‍यान आशियामधील लैंगिक पोकळी १७ टक्‍क्‍यांवरून २४ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचली.
 • महिला आणि मुलींना अनेकदा शिक्षण किंवा पुरूष व मुलांप्रमाणे शिक्षण मिळत नाही.
 • कधी-कधी त्‍यांना कमी डिजिटल कौशल्‍ये, साक्षरता आणि परिणामत: वाढत्‍या डिजिटल युगामध्‍ये कमी आर्थिक संधी मिळतात.

LinkedIn, UN Women to Create Jobs for Women in India

खरेतर, कोविड-१९ च्‍या विषम प्रभावामुळे गेल्‍या दोन वर्षांमध्‍ये महिला व मुलींसाठी या संधीमधील पोकळीमध्‍ये वाढ झाली आहे. या सहयोगासह लिंक्‍डइन व यूएन विमेन ही पोकळी भरून काढण्‍यासाठी एकत्र काम करेल. त्‍यांचा प्रदेश व जगाला कर्मचारीवर्गामध्‍ये सुधारित लैंगिक समानता संपादित करण्‍यास मदत करण्‍याचा मनसुबा आहे. या सहयोगाला विमेन्‍स एम्‍पॉवरमेंट प्रिन्सिपल्‍स (डब्‍ल्‍यूईपी)चे मार्गदर्शन मिळेल. डब्‍ल्‍यूईपी हा प्रभावी, कृतीशील तत्त्वांचा संच आहे, जो व्‍यवसायांना कार्यस्‍थळी, बाजारपेठेत आणि समुदायामध्‍ये लैंगिक समानता व महिला सक्षमीकरणाला कशाप्रकारे चालना द्यावी याबाबत मार्गदर्शन करतो.

“अधिकाधिक व्‍यवसाय व व्‍यावसायिक लैंगिक समान कार्यस्‍थळांचे लाभदायी परिणाम ओळखू लागले असल्‍याने आम्‍हाला महिलांना आजच्‍या डिजिटल युगामध्‍ये अधिक रोजगारक्षम व उद्योजक बनण्‍यास मदत करण्‍याची अद्वितीय संधी मिळाली आहे. आम्‍हाला यूएन विमेनसोबत सहयोग करत महिलांचे अपस्किलिंग व आर्थिक सक्षमीकरणामध्‍ये गंतवणूक करण्‍याच्‍या माध्‍यमातून प्रदेशाच्‍या कर्मचारीवर्गामध्‍ये महिला प्रतिनिधित्‍व व व्‍यावसायिक विविधता सुधारण्‍याप्रती सहयोगाने काम करण्‍याचा आनंद होत आहे. महिलांना योग्‍य कौशल्‍ये व संसाधने देत आम्‍ही अधिक समान व सर्वसमावेशक टॅलेण्‍ट क्षेत्र निर्माण करण्‍याची आशा करतो,” असे लिंक्‍डइनचे भारतातील कंट्री मॅनेजर आशुतोष गुप्‍ता (Ashutosh Gupta, India Country Manager, LinkedIn) म्‍हणाले.

 • यूएन विमेन आणि लिंक्‍डइन सहयोगींना महिलांच्‍या आर्थिक सक्षमीकरणासह पाठिंबा देण्‍याचे आवाहन करण्‍यासाठी लिंक्‍डइन व्‍यासपीठ व संस्‍थात्‍मक कौशल्‍यांचा लाभ घेतील.
 • सहयोगाने ते संयुक्‍त सल्‍लामसलत मोहिमा व इव्‍हेण्‍ट्स राबवतील, तसेच त्‍यांच्‍या संबंधित नेटवर्क्‍समधील प्रमुख सहयोगींना कार्यस्‍थळामध्‍ये पुरूष व महिलांसाठी व्‍यापक समान संधी व निष्‍पत्ती संपादित करण्‍याचे आवाहन करतील.
 • तसेच यूएन विमेन त्‍यांच्‍या सहयोगांचा लाभ घेत तरूण महिलांना उद्योगांमध्‍ये सुलभ संधी देईल, जेथे त्यांचे लिंक्‍डइन व्‍यासपीठ ऑपरेट करण्‍यावर आणि कनेक्‍शन्‍स निर्माण करण्‍यावर लक्ष केंद्रित आहे.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड