जमीन आणि शेती विषयक महत्वाची कामे सध्या रिक्त पदांमुळे खोळंबली आहेत. त्या मुळे, जमीन संबंधित बाबींमध्ये जनतेला दिलासा देण्याच्या उद्देशाने राज्य सरकार लवकरच महसूल विभागात रिक्त पदे भरण्याची तयारी करत आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत अंतर्गत नायब तहसीलदार, लेखपाल आणि महसूल लिपिक (Lekhpal Bharti 2025) अशा एकूण ९६४० पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी संबंधित आयोगांना प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. या भरतींमध्ये सर्वात जास्त संख्या लेखपाल या पदाची आहे, जे एकूण ७५३१ पदांवर भरती केले जाईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार, महसूल परिषदेने ही रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नायब तहसीलदारांच्या एकूण १२३४ पदांपैकी ३५३ रिक्त पदांवर भरतीसाठी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याच वेळी, लेखपालच्या एकूण ३०८३७ पदांपैकी ७५३१ रिक्त पदांवर भरतीसाठी उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोगाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्या मुळे आता उमेदवारांना या भरतीची प्रतीक्षा आहे. निश्चितच या मुळे मोठ्या संख्येने रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहे. याचा पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्रात सुद्धा अशीच मोठी तलाठी भरती रावबाबावी हि मागणी आता जोर धरत आहे. या महाराष्ट्र लेखा विभाग भरती २०२५ संदर्भातील अपडेट आणि १५ मे २०२५ रोजी प्रकाशित नवीन अपडेट या लिंक वर उपलब्ध आहे.

महसूल लिपिक पदांबद्दल बोलायचे झाले तर, एकूण १०४०६ पदांपैकी ५७१२ पदे भरली आहेत, तर ४६९४ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांपैकी २९३८ पदे पदोन्नतीद्वारे आणि १७५६ पदे थेट भरतीद्वारे भरली जातील. ही थेट भरती पदे भरण्याचा प्रस्ताव उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोगाकडेही पाठवण्यात आला आहे. या भरती लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होतील या मुळे राज्यात सध्या आनंदाचे वातावरण आहे. आता महत्वाचे म्हणजे हि भरती कधी पासून सुरु होते हे बघण्यासारखे आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















