वित्त विभाग महाराष्ट्र अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; ऑफलाईन अर्ज करा !! | Vitt Vibhag Maharashtra Bharti 2026

Finance Department Maharashtra Bharti 2026

Finance Department Maharashtra Bharti 2026: Finance Department Maharashtra is invited applcation from Retired Officer to fill vacant posts of “Debt management expert, legal expert, Ministry of Finance expert”. There are various vacancies to be filled. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can Send their applications to the given mentioned email address before the last date. The last date for submission of the application is the 20th of July 2026. The official website of the Finance Department of Maharashtra is finance.maharashtra.gov.in. For more details about Finance Department Maharashtra Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

वित्त विभाग महाराष्ट्र अंतर्गत “कर्ज व्यवस्थापन तज्ज्ञ, विधी तज्ज्ञ, वित्त मंत्रालय तज्ञ” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. वित्त विभाग महाराष्ट्र भरती २०२६ करीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

वित्त विभाग महाराष्ट्र भरती २०२६

  • पदाचे नावकर्ज व्यवस्थापन तज्ज्ञ, विधी तज्ज्ञ, वित्त मंत्रालय तज्ञ 
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता  – ds. aspire@maharashtra.gov.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जुलै २०२६
  • अधिकृत वेबसाईट – finance.maharashtra.gov.in 

Educational Qualification For Finance Department Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कर्ज व्यवस्थापन तज्ज्ञभारतीय रिझर्व्ह बँक (RBI) अथवा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधून सेवानिवृत्त झालेले तसेच केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या कर्ज व्यवस्थापन क्षेत्रातील किमान १५ वर्षांचा अनुभव असलेले अधिकारी
विधी तज्ज्ञसार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व्यवस्थापन व विनिवेश (BEACON कक्ष) एल. एल. बी. एल. एल. एम. पदवीधारक तसेच कंपनी कायदा, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे पुनर्रचना (Restructuring) व विनिवेश (Divestment) विषयक किमान ५ वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार
वित्त मंत्रालय तज्ञभारत सरकारच्या उप सचिव किंवा त्यावरील स्तरावरील सेवानिवृत्त अधिकारी, ज्यांना भारत सरकारच्या वित्त मंत्रालयासह अन्य केंद्रीय मंत्रालये, निती आयोग इत्यादी संस्थांशी निधीचे व्यवस्थापन करण्यासंबंधी समन्वय साधण्याचा किमान १५ वर्षांचा अनुभव आहे. क्षेत्रनिहाय तज्ज्ञांचे पॅनेल (Sectoral Experts Panel) ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण व सेवा क्षेत्रांसाठी प्रकरणनिहाय (Case-to-Case Basis) तज्ञांचे पॅनेल तयार करण्यात येत आहे. याकरिता शासन संस्था, बहुपक्षीय वित्तीय संस्था (Multilateral Banks), सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs) किंवा CRISIL/ACRA यांसारख्या पतमापन संस्थांमध्ये संबंधित क्षेत्रातील किमान १५ वर्षांचा अनुभव आवश्यक राहील,

How to Apply For Finance Department Application 2026

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०२६ आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For finance.maharashtra.gov.in Application 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/zMwsn
✅ अधिकृत वेबसाईट
finance.maharashtra.gov.in 

 


सध्या महाराष्ट्रातील वित्त विभागात थोडे निराशेचे वातावरण तयार झाले आहे. याचे कारण म्हणजे, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रियेला गेल्या काही वर्षांपासून खीळ बसली आहे. तात्पुरत्या पदोन्नतीही रखडल्या आहेत. सुमारे २७ हन अधिक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. राज्य शासनाच्या सर्व विभागांत या गटातील अधिकारी असल्याने याचा नागरिकांशी संबंधित अनेक कामांवर अप्रत्यक्षरीत्या परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधून असंतोष व्यक्त होत आहे. वित्त व लेखा अधिकारी हे वित्त विभाग, लेखा आणि कोषागार संचालनालय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शैक्षणिक संस्थांसह राज्य शासनाच्या सर्वच विभागांत कार्यरत असतात. त्यांचे कामाचे स्वरुप हे आर्थिक नियोजन, लेखा संकलन, लेखा परीक्षण, कोषागार व्यवस्थापन आणि धोरण अंमलबजावणी यांच्याशी निगडीत आहे. यामुळे या विभागात पुरेशे सक्षम अधिकारी असणे गरजेचे आहे. याचा अप्रत्यक्षपणे विविध घटकांवर परिणाम होत आहे. तसेच रिक्त पदाचा भरणा होण्यासाठी नवीन पदभरती प्रक्रिया सुद्धा राबविणे गरजेचे आहे. सध्या UP सरकार द्वारे याच विभागात नवीन मोठी भरती करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याचा प्रमाणे महाराष्ट्र सुद्धा नवीन भरती झाली पाहिजे. 

Finance Vibhga Bharti Maharashtra

राज्यसेवा परीक्षेत वित्त व लेखा सेवा गट ब संवर्गातील २०२३ मध्ये एकूण ४१ पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. १४ पात्र उमेदवार निवडले. त्यापैकी २७ जागा रिक्तच आहेत. गट ब मधील ५० टक्के पदोनती कोट्यासाठी पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया पुर्ण होत नाही. ज्यामुळे लेखा अधिकारी आणि पुढील पदांवरील पदोन्नत्या थांबल्या आहेत. कायमस्वरूपी पदोन्नती न झाल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक नुकसान नाही. मात्र तरी पदोन्नती न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

 

शासनाने अद्याप तात्पुरत्या पदोन्नतीचा पर्यायही स्वीकारलेला नाही. विशेष बाब म्हणजे, तात्पुरत्या पदोन्नती दिल्याने शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. कारण या पदोन्नतीसाठी वेतनवाढ लागू होत नाही. केवळ जबाबदारी आणि पदनाम बदलते. तात्पुरत्या पदोन्नतीमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल. कामाचा ताण कमी होईल आणि प्रशासकीय कामकाजाला गती मिळू शकणार आहे.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड