लातूर महापालिकेतील नोकरभरतीचा मार्ग मोकळा! – Latur Mahanagarpalika Bharti 2024

Latur Mahanagarpalika Bharti 2024

Latur Mahanagarpalika Bharti 2024

लातूर महापालिकेच्या भरती प्रक्रियेस औद्योगिक न्यायालयाने दिलेला स्थगन आदेश खंडपीठाने उठविला आहे. न्या. आर. एम. जोशी यांच्या खंडपीठाने शंभरापेक्षा जास्त जागांची भरती प्रक्रिया राबविण्यास परवानगी दिली आहे. भरती प्रक्रियेस कंत्राटी कर्मचारी असलेल्या याचिकाकर्त्यांनी आव्हान दिले होते. फायर आणि चालक पदासाठी संबंधितांनी अर्ज केलेले आहे. संबंधितांच्या हद्दीपर्यंत नियुक्ती आदेश निर्गमित करू नये, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहेत. लातूर महापालिकेने २० डिसेंबर २०१३ च्या मंजूर आकृतीबंधाप्रमाणे भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. शंभरपेक्षा जास्त विविध पदांसाठी २० डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. लातूर मनपात कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या रामकृष्ण कातले आणि अन्य अकरा जणांनी तसेच आनंद कांबळे आणि अन्य सात जणांनी लातूरच्या औद्योगिक न्यायालयात भरती प्रक्रियेस स्थगिती द्यावी, अशी विनंती केली. याचिकाकर्त्यांचा फायर आणि चालक पदासंबंधी आक्षेप होता. कंत्राटी पद्धतीने फायरमन आणि चालक म्हणून कार्यरत होते. आपणास भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जावे, अशी त्यांची मागणी होती. या भरती संदर्भातील पूर्ण अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप व निवड पद्धती येथे बघा. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभरती अँप डाउनलोड करावी.

 

औद्योगिक न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर यांनी खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठाने संबंधितांना सेवेतून कमी करण्यात येऊ नये, असे आदेश दिले होते. त्यानंतर लातूर येथील औद्योगिक न्यायालयात संबंधितांनी रितसर अर्ज सादर केला होता. भरती प्रक्रियेत स्थगिती देण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली होती. औद्योगिक न्यायालयाने संबंधित याचिकाकर्त्यांच्या पदापुरती भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती. लातूर मनपाच्या वतीने अॅड. सुहास उरगुंडे यांनी १३ याचिका खंडपीठात दाखल करून औद्योगिक न्यायालयाच्या निर्णय रद्द करण्याची विनंती केली. संबंधित कर्मचारी कंत्राटी असल्याचे अॅड. उरगुंडे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. संबंधितांना लातूर मनपाने नियुक्ती दिलेली नाही. याचिकाकर्ते मनपाचे कर्मचारी नाहीत. एकदा विनंती अर्ज फेटाळल्यानंतर पुन्हा दाखल केलेला विनंती अर्ज ग्राह्य धरता येणार नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर खंडपीठाने मनपाला भरती प्रक्रिया राबविण्यास परवानगी बहाल केली.

 


 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सध्या आपल्याला माहीतच असेल, लातूर महापालिकेच्या वतीने विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी गुरुवारी (ता. २२ फेब्रुवारी २०२४) विविध अठरा केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. यात काही पदांसाठी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रश्न विचारल्याने उमेदवारही चकीत झाले. ही परीक्षा मराठी व इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांतून घेणे अपेक्षित असताना काही पदांसाठी केवळ इंग्रजी माध्यमातूनच परीक्षा घेण्यात आल्याने उमेदवारांत नाराजी आहे.

महापालिका स्थापनेला एक तप झाला, तरी पदभरती केली जात नव्हती. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने आकृतिबंधच मंजूर केला जात नव्हता. पण, राज्य शासनाने अत्यावश्यक पदे भरण्यासाठी महापालिकेला काही महिन्यांपूर्वी परवानगी दिली. त्यानुसार आता टीसीएस कंपनीच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षा घेऊन ही पदभरती केली जात आहे. वेगवेगळ्या पदांसाठी गुरुवारी अठरा परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा झाली. हजारो उमेदवारांनी ही परीक्षा दिली. राज्यात मराठी भाषेला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे कोणतीही पदभरती करताना मराठी व इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांतून परीक्षा घेतल्या जात आहेत. पण, येथे मात्र काही पदांकरिता केवळ इंग्रजी माध्यमातूनच परीक्षा घेण्यात आल्याने उमेदवारांमध्ये नाराजी आहे. या परीक्षेकरिता पोर्टलवर अभ्यासक्रम देण्यात आला होता. पण, आज झालेल्या काही पदांसाठीच्या परीक्षेत या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रश्न विचारण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यामुळे उमेदवारांनी ते प्रश्न तसेच सोडून देण्याची वेळ आली.

 


Latur Mahanagarpalika Bharti 2024: Advertisement is being published to fill up the vacant posts of Category-A, Category-C, Category-C in the establishment of Latur City Municipal Corporation through direct service entry. The posts in the advertisement are Administrative, Technical, Legal, Environmental Engineering Services, Medical Services, Engineering Services, Semi Medical Services and Fire Services. Total vacancies published by Latur Municipal Coprportaion is 80. The application period for 80 posts in Category-A, Category-C, Category-C as on December 22, 2023 is from Friday December 22, 2023 at 4.00 PM to Sunday January 21, 2024 at 11.59 PM. Interested candidates should apply online at www.mclatur.org by Sunday 14th January, 2024 at 11.59 PM. The following are the details of the vacancies as per the above advertisement.

सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की, ८० पद भरती अर्ज करण्याची तारीख १४/०१/२०२४ वरून २१/०१/२०२४ रोजी रात्री ११:५९ पर्यंत वाढविण्यात आली आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

लातूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील श्रेणी-अ, श्रेणी-चव श्रेणी -क  या संवर्गातील 80 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. हि भरती प्रक्रिया TCS द्वारे  राबविण्यात येणार आहे. या भरतीची जाहिरात आज प्रकाशित झाली आहे . या भरतीचे ऑनलाईन अर्ज २२ डिसेंबर २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 आहे. 

लातूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील श्रेणी-अ, श्रेणी-चव श्रेणी -क मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात क्र.१ दि. २२ डिसेंबर, २०२३ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय, तांत्रिक, विधी, पर्यावरण अभियांत्रिकी सेवा, वैद्यकीय सेवा, अभियांत्रिकी सेवा, निम वैद्यकीय सेवा व अग्निशमन सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे, तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात क्र.१ दि. २२ डिसेंबर, २०२३ नुसार श्रेणी-अ, श्रेणी-चव श्रेणी -क मधील ८० पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दि. २२ डिसेंबर, २०२३ शुक्रवार दुपारी ४.०० वाजेपासून ते दि. १४ जानेवारी, २०२४ रविवार रात्री ११.५९ पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mclatur.org या संकेतस्थळावर दि. १४ जानेवारी, २०२४ रविवार रात्री ११.५९ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

लातूर महानगरपालिका भरती परीक्षेच्या तारखा जाहीर, प्रवेशपत्र “या” तारखेपासून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध । Latur Mahanagarpalika Admit Card Link

  • पदाचे नावश्रेणी-अ, श्रेणी-चव श्रेणी -क
  • पदसंख्या80 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – १९ वर्ष
    • खुल्या प्रवर्गासाठी कमाल – ३८ वर्षे
    • मागासवर्गीयांसाठी – ४३ वर्षे
    • दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत – ४५ वर्षा पर्यंत
    • पात्र खेळाडुंच्या बाबतीत – ४३ वर्षा पर्यंत
    • अनाथ उमेदवारांच्या बाबतीत – ४३ वर्षा पर्यंत
  • अर्ज शुल्क
    • अमागास :- रु.१०००/-
    • मागासवर्गीय / आ.दु.घ./अनाथ / दिव्यांग :- रु./-९००
    • उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतीरीक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरीक्त असतील.
    • परीक्षा शुल्क ना-परतावा (Non Refundable) आहे.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख21 जानेवारी 2024

MC Latur Bharti 2024

MC Latur Bharti 2024

Latur MC Vacancy 2024

All the candidates are informed that the date of application for 80 post recruitment has been extended from 14/01/2024 to 21/01/2024 at 11:59 PM.

Name Of Post Vacancy
पर्यावरण अभियांत्रिकी सेवा श्रेणी-१ 1
तांत्रिक सेवा श्रेणी-१ 1
वैद्यकीय सेवा श्रेणी-२ 1
अभियांत्रिकी सेवा श्रेणी-२ 2
विधी सेवा श्रेणी -२ 1
अग्निशमन सेवा श्रेणी-२ 1
अभियांत्रिकी सेवा श्रेणी-३ 4
अभियांत्रिकी सेवा श्रेणी-३ 4
अभियांत्रिकी सेवा श्रेणी-३ 1
प्रशासकीय सेवा श्रेणी-३ 2
निम वैद्यकीय सेवा श्रेणी-३ 1
प्रशासकीय सेवा श्रेणी-३ 4
प्रशासकीय सेवा श्रेणी-३ 4
अग्निशमन सेवा श्रेणी-३ 9
प्रशासकीय सेवा श्रेणी-३ 10
अग्निशमन सेवा श्रेणी-३ 30
तांत्रिक सेवा श्रेणी-३ 4

Latur Mahanagarpalika Vacancy 2024

Latur Mahanagarpalika Vacancy 2024

Education Qualification Required For Latur Mahanagarpalika Mega Bharti 2023

Name Of Post Educational Details
पर्यावरण अभियांत्रिकी सेवा श्रेणी-१ अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पर्यावरण अभियांत्रिकी शाखेची पदवी.
ब) पर्यावरण क्षेत्रातील किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
ड) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
तांत्रिक सेवा श्रेणी-१ अ) संगणक विषयासह वी.ई/बी.टेक/एम.सी.ए. पदवी.
व) प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा सेंटर अॅडमिनीस्ट्रेशन, नेटवर्कीगमधील किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
ड) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
वैद्यकीय सेवा श्रेणी-२ अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस.). ब) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अधिनियम अंतर्गत नोंदणी आवश्यक.
क) शासकीय/निमशासकीय/स्थानिक
स्वराज्य संस्था/खाजगी
रुग्णालयातील संबंधित विषयातील कामकाजाचा किमान ३ वर्षाचा
अनुभव आवश्यक.
ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
इ) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
अभियांत्रिकी सेवा श्रेणी-२ अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची
पदवी.
ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
क) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा
O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
विधी सेवा श्रेणी -२ अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधि शाखेची पदवी.
व) उच्च न्यायालय किंवा त्यांचे अधिपत्याखालील इतर न्यायालयांमध्ये किमान ३ वर्षे अधिवक्ता/वकील म्हणून कामाचा अनुभव आवश्यक. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.ड) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
अग्निशमन सेवा श्रेणी-२ अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.आ) राष्ट्रीय अग्निशामन सेवा महाविद्यालय, नागपुर येथुन B.E.Fire Engineering उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांच्याकडील Station Officer & Instructor पाठ्यक्रम (अग्निशमन अभियांत्रिकी मधील प्रगत पदविका) उत्तीर्ण असावा किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन यांचा १ वर्ष कालावधीचा उप स्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा किंवा The Institution of Fire Engineers (U.K.) किंवा (India) या संस्थेकडून Grade-1 ही पदवी प्राप्त केलेली असावी,
इ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
ई) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
अभियांत्रिकी सेवा श्रेणी-३ अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी.
ब) नेमणुकीनंतर ३ वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.
क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
अभियांत्रिकी सेवा श्रेणी-३
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
3)MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
अभियांत्रिकी सेवा श्रेणी-३ अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची
पदवी.ब) नेमणुकीनंतर ३ वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण
होणे आवश्यक.
क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
ड)MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
अभियांत्रिकी सेवा श्रेणी-३ अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी शाखेची पदवी.
ब) नेमणुकीनंतर ३ वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.
क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
ड)MS-CIT किवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
प्रशासकीय सेवा श्रेणी-३ अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
क) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
निम वैद्यकीय सेवा श्रेणी-३ अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण. ब) सांविधानिक विद्यापीठातून बी. फार्म. (B.Pharm) पदवी उत्तीर्णक) महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी अॅक्ट, १९४८ (८ ऑफ १९४८) नुसार वेध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक. ड) संबंधित विषयाच्या कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक. इ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
फ) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
प्रशासकीय सेवा श्रेणी-३ अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
क) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
प्रशासकीय सेवा श्रेणी-३ अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. ब) शासकीय/निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील कर विषयाशी संबंधित कामकाजाचा किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
3) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
अग्निशमन सेवा श्रेणी-३ अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण.
ब) राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठयक्रम पूर्ण.
क) वैध जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक.
ड) जड वाहन चालक म्हणून किमान ३ वर्षे काम केल्याचा अनुभव आवश्यक.
१४
अग्निशमन सेवा श्रेणी-३
चालक – यंत्रचालक
इ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
फ) शारीरिक पात्रताः-
१. उंची किमान १६५ सें.मी. (महिला उमेदवारांची उंची किमान १६२ सें.मी.)
२. छाती- साधारण ८१ सें.मी. फुगवून-५ सें.मी. जास्त ( महिला उमेदवारांसाठी लागू नाही.)
३. वजन- किमान ५० कि.ग्रॅ.
४. दृष्टी- चांगली. (विना चष्म्याने दृष्टी – ६/६ तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली) 3) उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा अधिक असू नये.
प्रशासकीय सेवा श्रेणी-३ अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवीव) मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे व इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
ड) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
अग्निशमन सेवा श्रेणी-३ अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण.
व) राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठयक्रम पूर्ण. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
ड) शारीरिक पात्रताः-
१. उंची किमान १६५ सें.मी. (महिला उमेदवारांची उंची किमान १६२ सें.मी.)
१६
अग्निशमन सेवा श्रेणी-३
फायरमन
२. छाती- साधारण ८१ सें.मी. फुगवून-५ सें.मी. जास्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही.)
३. वजन- किमान ५० कि.ग्रॅ.
४. दृष्टी- चांगली. (विना चष्म्याने दृष्टी ६/६ तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली)
इ) वयोमर्यादा:-
उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा अधिक असू नये. (माजी सैनिक वगळून) फ) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
तांत्रिक सेवा श्रेणी-३ अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शांलात प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C) उत्तीर्ण.ब) शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पंप ऑपरेटर या विषयाचा
अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
ड) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.

Salary Details For Latur City Municipal Corpotaion Recruitment 2023

Name Of Post Salary
पर्यावरण अभियांत्रिकी सेवा श्रेणी-१ S-२० ५६१००-१७७५००
तांत्रिक सेवा श्रेणी-१ S-१५ ४१८००-१३२३००
वैद्यकीय सेवा श्रेणी-२ S-१५ ४१८००-१३२३००
अभियांत्रिकी सेवा श्रेणी-२ S-१५ ४१८००-१३२३००
विधी सेवा श्रेणी -२ S-१५ ४१८००-१३२३००
अग्निशमन सेवा श्रेणी-२ S-१५ ४१८००-१३२३००
अभियांत्रिकी सेवा श्रेणी-३ S-१४ ३८६००-१२२८००
अभियांत्रिकी सेवा श्रेणी-३ S-१४ ३८६००-१२२८००
अभियांत्रिकी सेवा श्रेणी-३ S-१४ ३८६००-१२२८००
प्रशासकीय सेवा श्रेणी-३ S-१४ ३८६००-१२२८००
निम वैद्यकीय सेवा श्रेणी-३ S-१३ ३५४००-११२४००
प्रशासकीय सेवा श्रेणी-३ S-१३ ३५४००-११२४००
प्रशासकीय सेवा श्रेणी-३ S-१० २९२००-९२३००
अग्निशमन सेवा श्रेणी-३ S-६ १९९००-६३२००
प्रशासकीय सेवा श्रेणी-३ S-६ १९९००-६३२००
अग्निशमन सेवा श्रेणी-३ S-५ १८०००-५६९००
तांत्रिक सेवा श्रेणी-३ S-१ १५०००-४७६००

How To Apply For Latur Mahanagarpalika Application 2024

  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज  करावा.
  • उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Latur Municipal Corporation Bharti 2024 : Application and Exam Schedule

Latur Municipal Corporation Bharti 2024

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For https://mclatur.org/ Bharti 2024

???? सिलॅबस व एक्साम पॅटर्न
पूर्ण माहिती वाचा 
???? PDF जाहिरात
https://shorturl.at/mBEIR
???? ऑनलाईन अर्ज करा  https://shorturl.at/kHJ34
✅ अधिकृत वेबसाईट
https://mclatur.org/

Latur Mahanagarpalika Online Registration 2023

Please check Corrigendum/Addendum in The General Links for additional vacancies

Read the below instructions carefully, before filling up the form:

  1. Candidate has to fill in the below mentioned details to receive the User ID and Password.
  2. Candidate will receive the User ID and Password on the registered email address and or on the registered mobile number. Overseas candidates will receive both User ID and Password on registered email address.
  3. Candidate can login with the User ID and Password to complete the application form for Govt Form.
  4. Candidate must provide Correct Name, Date of Birth, Mobile Number and Email Address as these details cannot be changed once the registration is completed.

Latur Mahanagarpalika Bharti 2023 – Result 

Latur Mahanagarpalika Bharti 2022: Latur Municipal Corporation has declared the Full Time/ Part Time – Medical Officer, Lab Technician & Staff Nurse Recruitment Selection and Waiting List. Click on the below link to download the list.

लातूर महानगरपालिका अंतर्गत पूर्ण वेळ / अर्धवेळ – वैद्यकीय अधिकारी, लॅब तंत्रज्ञ आणि स्टाफ नर्स पदभरतीची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Latur Mahanagarpalika Bharti 2023

यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3VfoPIJ
यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3VfoPIJ
यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3VfoPIJ

Latur Mahanagarpalika Bharti 2023

Latur Mahanagarpalika Bharti 2023: Latur Municipal Corporation recruits Eligible candidates every year for the posts of Medical Officer, Staff Nurse, Lab Technician, Etc. SSC, HSC, and Graduate Pass-outs have plenty of scopes to build up a Career in Latur Mahanagarpalika. This year for 2023 (Latur Mahanagarpalika Recruitment 2023) will soon publish the relevant section of advertising. The official website for Latur Municipal Corporation is www.amtcorp.org.

Latur Mahanagarpalika Recruitment 2023

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही लातूर महानगरपालिका भरती 2023 (Latur Mahanagarpalika Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. लातूर महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स आणि इतर पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MC Latur Bharti 2023 | MC Latur Recruitment 2023 

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिक (अर्धवेळ), इत्यादी
  • पदसंख्या – —
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – लातूर
  • वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण
    • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
    • राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग – रु. 150/-
    • राखीव प्रवर्ग – रु. 100/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.
  • अधिकृत वेबसाईट – www.mclatur.org

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…


Previous Update –

Latur Mahanagarpalika Bharti 2022 – Result 

Latur Mahanagarpalika Bharti 2022: Latur Municipal Corporation has declared the Medical Officer Recruitment selection & waiting list. Click on the below link to download the list.

लातूर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदभरतीची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत लातूर महानगरपालिका येथील रिक्त पुर्णवेळ वैदयकिय अधिकारी या पदासाठी उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर या कार्यालयामार्फत गुणवत्ता यादीप्रमाणे पात्र उमेदवारांच्या मुलाखती दि.२९.११.२०२२ रोजी उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर, आरोग्य संकुल, तिसरा मजला, बार्शी रोड, नविन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी, लातूर ४१३५१२” या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार जास्तीत जास्तीत गुण प्राप्त असणाऱ्या उमेदवारांची खालिल प्रमाणे निवड करण्यात आलेली आहे.

यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3VfoPIJ

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Onkar patil says

    Latur mahanagarpalika exam date kadhi release hoil

  2. MahaBharti says

    Latur Mahanagarpalika Exam Dates are out

  3. MahaBharti says

    Latur Mahanagarpalika Bharti 2024 Published

  4. MahaBharti says

    Latest Recruitment 2022

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड