लाडक्या बहिणीसाठी आतापर्यंत १७ हजार कोटी वितरित, २०२४-२०२५ साठी लाडकी बहीण..
Ladki bahin yojana updates news
विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला महिलांनी अर्थात लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. या लाडकी बहीण योजनेसाठी महायुतीने आतापर्यंत अर्थात ६ महिन्यांत सुमारे १७ हजार कोटी रुपये वितरित केल्याची बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. राज्यात सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पामधून लाडकी बहीण योजनेसाठी किती कोटींचा निधी खर्च झाला, अशी माहिती वॉचडॉग फाऊंडेशनचे ट्रस्टी तथा माहिती अधिकार कार्यकर्ता अॅड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी महिला व बाल विकास विभाग यांच्याकडे अर्ज केला होता, त्या अर्जाला उत्तर देताना महिला व बाल विकास विभागाने त्यांना ही माहिती दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर राज्यात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अमलात आणली. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्यात येत आहेत. महायुती सरकारने २०२४- २०२५ साठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली. हेही पैसे कमी पडतील म्हणून पुरवणी मागणीनुसार सन २०२४-२०२५ साठी लाडकी बहीण योजनेसाठी आणखी २५ हजार कोटी अशाप्रकारे एकूण ३५ हजार कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद केली आहे. यामुळे भविष्यात राज्यातील विकास कामांना खीळ बसण्याची भीती गॉडफ्रे पिमेंटा यांनी व्यक्त केली. करदात्यांच्या पैशांतून सरकार अशाप्रकारे उधळपट्टी करत असेल तर ती सर्वसामान्य नागरिकांची लूट आहे. प्रत्येक वर्षी आम्ही सरकारला कर भरतो. आणि आमच्या या करांचा सरकार असा दुरुपयोग करत असेल तर आम्ही कर भरावा की नाही, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे, असे गॉडफ्रे पिमेंटा म्हणाले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
लाडक्या बहिणींच्या नावाने महायुतीने निवडणुकीआधी केलेली उधळपट्टी ही जगजाहीर आहे. या निमित्ताने राज्यातील तिजोरी रिकामी करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे आता निवडून आल्यानंतर महायुती सरकारने राज्यातील जनतेला दिलेली आश्वासने कशी पूर्ण होतील, याकडे आता आमचे लक्ष राहणार आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.