लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टला जमा होणार! Ladki Bahin Yojana Pahila Hafta

Ladki Bahin Yojana Pahila Hafta Date

Ladki Bahin Yojana Pahila Hafta

Ladki Bahin Yojana Pahila Hafta: महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत या योजनेसाठी आतापर्यंत १ कोटी ४१ लाख अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी १ कोटी २९ लाख अर्ज वैध ठरविण्यात आले असून पहिल्या टप्प्यात दीड कोटी महिलांना लाभ देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. रक्षाबंधनाचे औचित्य साधून पहिला हफ्ता १७ ऑगस्टला दिला जाईल.  या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टला मिळणार आहे. त्यामुळं रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळणार आहे. आतापर्यंत १ कोटी ४० लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी १ कोटी अर्जांची छानणी सुद्धा पूर्ण झालेली आहे. या योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे १७ ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात वितरीत केले जाणार आहेत. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महत्त्वाचे मुद्दे:

  • रक्षाबंधनापूर्वीच लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरित केला जाईल
  • रक्षाबंधन 197 ऑगस्ट रोजी आहे आणि लाडकी बहिण योजनेचा हप्ता 17 ऑगस्ट रोजी वितरित केला जाईल
  • 17 ऑगस्ट रोजी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे वितरण कार्यक्रम होईल याच्यासाठी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री तसेच पालकमंत्री हजेरी लावतील

Ladki Bahin Yojana First Installment Date

बुधवार दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख निश्चित करण्यात आलेले आहे. 17 ऑगस्ट 2024 रोजी लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता देण्यात येईल.

यापूर्वी हा हप्ता 19 ऑगस्ट 2024 म्हणजे रक्षाबंधनाच्या मुहूर्त वरती देण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली होती. परंतु आता दोन दिवस आधीच या योजनेचे पहिले इन्स्टॉलमेंट देण्यात येईल.

लाडकी बहीण योजना अर्ज
लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटी साठ लाख महिलांनी ऑनलाइन स्वरूपामध्ये अर्ज दाखल केलेले आहे त्याच्यामध्ये एक कोटी सत्तावीस लाख महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत जवळपास 82 टक्के अर्ज हे मंजूर करण्यात आलेले आहे आणि जे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत त्यामध्ये मुख्यतः डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड न करणे आणि अयोग्य बँक खात्याची माहिती ही मुख्य कारणे आहेत.

सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी दीड हजार रुपये देण्यात येणार असल्यामुळे अजूनही लाडकी बहिण योजनेचे अर्ज मोठ्या प्रमाणात केले जात आहे आणि त्यामुळे वेळोवेळी सर्वर मध्ये बदल करून अधिकाधिक महिला या योजनेचा लाभ घेतील अशी व्यवस्था करण्यात येत आहे.

आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊनच ही योजना करण्यात आली आहे अशी टीका विरोधकांच्या माध्यमातून केली जात आहे तसेच या योजनेसाठी पाण्याप्रमाणे पैसा खर्च केला जात आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र वरती कर्ज वाढण्याचा धोका होईल असे विरोधकांचे मत आहे.

परंतु सरकारच्या माध्यमातून लाडकी बहिण योजनेविषयीची भूमिका अत्यंत ठाम आहे आणि या योजनेचा पहिला हप्ता लवकरच देण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली आहे. तसेच या योजनेला विरोध म्हणून करण्यात आलेल्या जनहित याचिकेला हायकोर्टाकडून रद्द करण्यात आलेले आहे त्यामुळे योजना अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली असून आता त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १ कोटी ४० लाख १० हजार २१५ अर्ज ऑनलाईन भरण्यात आले आहेत. त्यापैकी १ कोटी अर्जांची छाननी करण्यात आलेली आहे. त्यात ८३ टक्केहून अधिक अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. तर जवळपास १२ हजार अर्ज अवैध ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड