लाडकी बहीण योजनेतील पैसे कापू नका, राज्य सरकारने बँकांना दिली तंबी! – Ladki Bahin Yojana On Bank Deduction
ladki bahin yojana On bank Deduction
कमी रक्कम शिल्लक असणे, थकीत कर्ज असलेल्या खात्यातून रक्कम न काढता येणे अशा स्वरूपाच्या तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांबाबत महिला व बालविकास विभागाने बँकांसाठी नव्याने निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार बँकांनी या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यातून कोणतीही रक्कम कापू नये, असे स्पष्ट निर्देश विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी सर्व बँकांना दिले आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेतंर्गत जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र, ही रक्कम लाभार्थ्यांना खात्यातून न काढता येणे, कर्जाच्या थकीत हप्त्यांमध्ये ही जमा झालेली वळती करून घेणे, असे प्रकार उघड झाले आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
त्यामुळे महिला लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचे चित्र राज्यात अनेक ठिकाणी असल्याने तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे या रकमेतून कोणत्याही प्रकारे पैसे कापू नका, अशी सूचना महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी सर्व बँकांना केली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
लाडक्या बहिण योजनेची निवड यादी प्रसिद्ध, येथे चेक करा!
महत्वाचे!– किती महिलांच्या खात्यात आले लाडकी बहीण योजनेचे पैसे? इतरांच्या खात्यात कधी येणार,…
तसेच गोठविलेले खाते तत्काळ सुरू करा योजनेंतर्गत जमा झालेली रक्कम कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजित केली जाऊ नये. ही रक्कम विशिष्ठ उद्देशासाठी असून, ती इतर समायोजनासाठी वापरता येणार नाही. कोणत्याही कर्जाच्या थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देऊ नये. काही लाभार्थ्यांकडे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बैंक खाते गोठविण्यात आले असल्यास बँक खाते तत्काळ सुरू करण्यात यावे, अशा सूचना राज्यस्तरीय बैंकर्स समिती, बँक ऑफ महाराष्ट्र, तसेच मुंबई वगळून सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना दिल्या आहेत.
Table of Contents
Comments are closed.