माझी लाडकी बहीण योजना, अर्ज प्रक्रिया बंद!-आता पुढे काय, पूर्ण माहिती पहा!

Ladki Bahin Yojana Link Closed

आपल्याला माहीतच आहे लाडकी बहीण योजना सध्या पूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत आतापर्यंत ७ लाख १६ हजार २०५ लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले आहेत. यामधून ६ लाख ९९ हजार ७१६ अर्ज मंजूर केलेले आहेत. तर ७५ हजार २११ लाडक्या बहिणींचे आधार सिडिंग न झाल्याने त्यांचे अद्यापही पैसे जमा झाले नाहीत. याशिवाय १० हजार ३३० अर्ज पडताळणीमध्ये आहेत. अशातच आता मंगळवारी दुपारी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या संपूर्ण प्रक्रियेला ब्रेक लागला आहे.आता या संदर्भातील सर्व पुढील नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Ladki Bahin Yojana Link Closed

त्यामुळे प्रतीक्षेतील  महिला लाभार्थीच्या खात्यात २३ नोव्हेंबरनंतरच अनुदान जमा होणार आहे. सोबतच आता नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. याबाबत राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सचिवांनी बुधवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या घेतलेल्या व्हिसीवरील सभेत सूचना दिलेल्या आहेत, जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये नारीशक्ती अॅपवर ३ लाख ९८ हजार ३४१ महिलांनी अर्ज केले होते. त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या पोर्टलवरून ३ लाख १ हजार ४२ महिलांनी पुन्हा या योजनेकरिता नोंदणी केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ७ लाख १६ हजार ९०५ महिलांनी लाडकी बहीण योजनेकरिता अर्ज केले आहेत. यापैकी आतापर्यंत ६ लाख ९९ हजार ७१६ महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले यापैकी यापैकी ४ हजार ३६३ महिलांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. तर १०,३३० हजारांवर अर्ज पडताळणीमध्ये आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

लाडकी बहीणसाठी नवीन हेल्पलाइन नंबर सुरु, एक फोन वर तक्रार सोडवा! – Ladki Bahin Helpline Number

अशातच जिल्ह्यात अद्यापही ७५ हजार २११ महिलांचे आधारकार्ड १९५१ बँकेला संलग्न नसल्याने त्यांचे अनुदान रखडले आहे. त्यामुळे त्यांचे सिडिंग झाल्यानंतर बैंक प्रक्रियेतील अनुदान त्या लाभार्थीना प्राप्त होईल; परंतु नव्याने अर्ज करणे व पुढील टप्पा याशिवाय त्रुटीत असलेल्या अर्जाची पडताळणी प्रक्रियेला मात्र आचारसंहितेमुळे आता ब्रेक लागला आहे, त्यामुळे सध्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागला आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड