महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’ला राज्यातील महिलांनी मोठा प्रतिसाद दिला असून बुधवार, ७ ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी १ कोटी ४२ लाख अर्ज प्राप्त झाले. त्यांपैकी १ कोटी ३१ लाख अर्ज वैध ठरले असून, यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पादरम्यान ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यातील १८ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे, जनतेमध्ये या योजनेची जोरदार चर्चा आहे. सध्या या योजनेसाठी मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त होत असून, शासनाकडून दाखल अर्जाची युद्धपातळीवर पडताळणी सुरू आहे. योजनेसाठी आतापर्यंत एकूण १ कोटी ४२ लाख अर्ज प्राप्त झाले असून, ही संख्या १७ ऑगस्टपर्यंत १ कोटी ८९ लाखापर्यंत जाण्याचा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. योजनेसाठी पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतून सर्वाधिक अर्ज करण्यात आले आहेत. गडचिरोली, सिंधुदुर्ग, मुंबई जिल्ह्यात सर्वात कमी अर्ज प्राप्त झाले आहेत. योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा एकत्रित ३ हजार रुपयांचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर १७ ऑगस्टला महिलांना मिळण्याची शक्यता आहे.
सर्वाधिक अर्ज दाखल झालेले जिल्हे
■ पुणे – ८ लाख ९७ हजार
■ नाशिक – ७ लाख
■ कोल्हापूर – ६ लाख ५० हजार
■ सोलापूर – ५ लाख ५० हजार
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















