लाडकी बहीण पुढील हफ्ता कधी येणार, महत्वाचा अपडेट जाहीर!-Ladki Bahin Payment Soon!
Ladki Bahin Payment Soon!
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे! एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे पैसे ८ मार्च, महिला दिनाच्या मुहूर्तावर लाभार्थींना देण्यात आले होते. त्यानंतर आता रामनवमी (६ एप्रिल) च्या पार्श्वभूमीवर, ५ ते १५ एप्रिलदरम्यान एप्रिलचा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजना – महिलांसाठी महत्त्वाची आर्थिक मदत!
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० दिले जात आहेत. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आतापर्यंत मिळाले नऊ हफ्ते, पुढे वाढीव रकमेची चर्चा सुरू!
ही योजना जुलै २०२४ मध्ये सुरू झाली असून, आतापर्यंत जुलै २०२४ ते मार्च २०२५ असे एकूण नऊ हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी सरकारकडून रक्कम २१०० करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अद्याप त्याचा निर्णय झालेला नाही. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर वाढीव रक्कमेचा विचार केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
एप्रिल महिन्यात किती रक्कम मिळेल?
सध्या एप्रिल महिन्याचा हप्ता १५०० रुपयांचाच मिळेल, मात्र २१०० करण्याबाबतच्या चर्चांनी पुन्हा वेग घेतला आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणींनी आता ५ ते १५ एप्रिलदरम्यान खात्यात पैसे येतात का, याकडे लक्ष ठेवावे!