मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ताचा अपडेट जाहीर, या तारखेच्या दरम्यान जमा होणार! | Ladki Bahin June 2025 Installment Soon!
Ladki Bahin Installment Soon!
राज्यातील हजारो महिलांना आधार देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता आणखी एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. या योजने अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. आता या योजनेचा बारावा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याबाबत महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या वेळास मे महिन्याचा हफ्ता मिळण्यास उशीर झाला होता, परंतु आता जून महिन्याचा हफ्ता कधी मिळणार हा प्रश्न बहिणींना पडला आहे. त्यात अणे नवीन नवीन बातम्या प्रकाशित होत असल्याने काही प्रमाणात चिंता सिद्ध वाढली आहे. परंतु आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे येथे आपल्याला मिळणार आहेत, तेव्हा लाडक्या बहिणींनो निश्चिन्त रहा!!
मे महिन्याचा हप्ता वेळेवर; आता जूनकडे नजरा!
मे महिन्याचा अकरावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात यशस्वीपणे जमा करण्यात आला होता. त्याआधी एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता मेच्या सुरुवातीला दिला गेला होता. यामुळे महिलांनी जून महिन्याचा हप्ता देखील वेळेवर मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे. मात्र यावेळी बारावा हप्ता अद्याप जमा न झाल्याने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
वट पौर्णिमेच्या मुहूर्तावर दोन हप्त्यांची चर्चा फसवी ठरली?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर महिलांच्या खात्यात एकाचवेळी अकरावा व बारावा हप्ता जमा होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण प्रत्यक्षात महिलांच्या खात्यात फक्त अकरावाच हप्ता जमा झाला. यामुळे महिलांमध्ये नाराजीचं वातावरण तयार झालं.
नवीन अपडेट – १५ ते २० जूनदरम्यान हप्ता जमा होण्याची शक्यता
आता एका नव्या माहितीच्या आधारे असं कळतंय की लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता १५ ते २० जून २०२५ दरम्यान मिळू शकतो. यामुळे महिलांनी थोडं धैर्य बाळगून वाट पाहण्याची गरज आहे. अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरीही योजना यथावकाश सुरूच आहे आणि हप्ते थांबलेले नाहीत.
अजून अधिकृत घोषणा नाही, पण भरवसा कायम!
सद्यस्थितीत महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत घोषणा झाली नसली, तरी सामाजिक न्याय विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार योजना सुरू असून हप्ते वेळोवेळी दिले जात आहेत. जूनचा हप्ता मिळण्यास उशीर होतो आहे, मात्र जुलैपूर्वी तो जमा होण्याची शक्यता मजबूत आहे.
योजनेचे फायदे कोणाला मिळतात?
या योजनेचा लाभ २१ ते ६५ वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना मिळतो. ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिलाच पात्र ठरतात. याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच मिळतो.
अपात्रतेच्या अटी जाणून घ्या!
महिलांनी लक्षात घ्यावं की ज्यांच्याकडे ट्रॅक्टर वगळता चारचाकी वाहन आहे, ज्या महिला सरकारी नोकरीत आहेत, किंवा ज्या महिलांना इतर लाभार्थी योजना (जसे की शेतकरी सन्मान, सवर्ण आरक्षण योजना इत्यादी) मिळत आहेत, त्या योजनेसाठी अपात्र ठरतात.
सरकारचा महिलांसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे सरकारचं एक अभिनव आणि गरजूंना थेट मदत करणारे पाऊल आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना सन्मानाने जगता यावं, स्वयंपूर्ण व्हावं, यासाठी ही योजना एक सक्षम आधारस्तंभ ठरत आहे. हप्ता मिळण्यास काही वेळ लागला तरी योजना बंद झाली नाही, हे सर्वात मोठं समाधानकारक आहे.