“लाडकी बहीण” योजनेचा एप्रिल हप्ता नाही मिळाला? मे महिन्यात मिळणार का डबल रक्कम? जाणून घ्या सविस्तर! | Ladki Behan: Double Installment?

Ladki Behan: Double Installment?

बहिणींनो, तुम्हाला एप्रिलचा हफ्ता अजून भेटला नाही? मग हि बातमी तुमच्या साठी आहे. सध्या, राज्य सरकारची बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेच्या झोतात आली आहे. एप्रिल महिना संपायला फक्त काही दिवस उरले आहेत, पण अद्यापही एप्रिलचा हप्ता खात्यात आला नाही. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता आहे – “हप्ता कधी येणार?” हा प्रश्न आता प्रत्येकाच्याच ओठांवर आहे. पारपटू राज्य सरकारने आज या बाबत एक मोठं अपडेट दिला आहे. चला तर या बद्दल पूर्ण सविस्तर माहिती बघूया. 

 Ladki Behan: Double Installment?

दोन हप्ते एकत्र येणार का?
सध्या असा अंदाज लावला जातोय की एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते एकत्रच येणार आहेत. म्हणजेच एकाच वेळी ३००० रुपयांचा व्यवहार महिलांच्या खात्यात होण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही यावर अधिकृत घोषणा झालेली नाही.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आदिती तटकरे यांचं मोठं वक्तव्य!
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की, “एप्रिल महिना संपायच्या आत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.” पण एप्रिल संपायला अवघे काही दिवसच राहिले आहेत. त्यामुळे हा हप्ता मेच्या पहिल्या आठवड्यात जाऊ शकतो, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

एकत्र ३००० की दोन टप्पे?
जर हप्ता मेमध्ये गेला, तर महिलांना एकदम ३००० रुपये मिळणार की पुन्हा दोन टप्प्यांमध्ये १५०० + १५०० अशी रक्कम जमा होणार? यावरही सरकारने कोणतीही स्पष्टता दिलेली नाही.

पडताळणीमुळे महिलांचे अर्ज बाद!
दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी सुरु असून, मोठ्या प्रमाणावर अर्ज फेटाळले गेले आहेत. आता अर्ज करणाऱ्या महिलांच्या उत्पन्नाची बारकाईने तपासणी केली जात आहे. त्यामुळे ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांना लाभ मिळणार नाही.

काही योजनेतील लाभार्थींना मिळणार नाही हप्ता!
संजय गांधी निराधार योजना आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी यांना लाडकी बहीण योजनेतून पूर्ण रक्कम मिळणार नाही. संजय गांधी योजनेतील महिलांना हप्ता मिळणार नाही आणि नमो शेतकरी योजनेतील महिलांना फक्त ५०० रुपयेच मिळतील, असं तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

महिलांनी काय लक्षात ठेवावं?
महिलांनी आपला अर्ज योग्यरित्या भरलेला आहे का, आपले उत्पन्न मर्यादेत आहे का, हे तपासून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. अर्ज फेटाळला गेला असल्यास गाव पातळीवरील महिला बालविकास प्रकल्प अधिकारी (CDPO) यांच्याशी संपर्क साधावा.

सरकारी स्पष्टीकरणाची प्रतीक्षा!
सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनलेला हप्ता, हप्ता न आल्यामुळे महिलांमध्ये मोठा गोंधळ आणि चिंता पसरली आहे. एप्रिल-मे एकत्र हप्ता येणार का? याबाबत अधिकृत सरकारी स्पष्टीकरण लवकरच अपेक्षित आहे. तोपर्यंत वाट पाहणं हाच पर्याय आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड