खुशखबर! आता लाडक्या बहिणींनाही मिळणार घरकुल योजनेचा लाभ! – Ladki Bahin Gharkul Yojana

ladki bahin gharkul yojana

महाराष्ट्रातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे. त्यातही लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. लाडक्या बहिणींना १३ लाखांपेक्षा अधिक घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. एका वर्षात २० लाखांपेक्षा अधिक घरे मिळणार आहेत, अशी घोषणा केंद्रीय ग्रामविकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. त्यामुळे सरकार लाडक्या बहिणींच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचे दिसत आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आज आनंदाचा दिवस आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारने साडेसहा लाख घरे मंजूर केली होती. मात्र, आता यात वाढ करून तब्बल १३ लाख घरे मंजूर करण्यात आली आहेत.

ladki bahin gharkul yojana
यावर्षी गरिबांसाठी २० लाख घरे देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. मोदी सरकारने महाराष्ट्राला दिलेली ही मोठी भेट आहे. आतापर्यंत कोणत्याच राज्याला एका दिवसात या योजनेचा इतका लाभ मिळाला नाही. या योजनेसाठी २६ लाख अर्ज आले होते. त्यापैकी २० लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित अर्जदारांना आपण पुढील वर्षी घरे देऊ, अशी घोषणाही करण्यात आली आहे. यात ज्यांना खरेच गरज आहे अशांनाच घरे देण्यात येणार आहेत. तसेच नव्या सर्वेक्षणातून कोणीही बेघर राहणार नाही. बेघर लोकांना पुढील पाच वर्षांत घरे देण्याचा संकल्प मोदी सरकारने केला आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत. या योजनेचा लाभ आता लाडक्या बहिणींनाही मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. तसेच महायुती सरकार लाडक्या बहिणींसाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचेही दिसून येत आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड