Ladki Bahin April Payment Date – लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हफ्ता कधी होणार जमा असा प्रश्न अनेक बहिणींना पडला आहे. यातच एक नवीन महत्वाचा अपडेट समोर आला आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या 2-3 दिवसात सरळ तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे, अशी महत्त्वाची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिली आहे.पुण्यातल्या काही महिलांच्या खात्यांमध्ये तर आता आधीच पैसे जमा होऊ लागलेत. त्यामुळं सर्व बहिणीच्या खात्यात लवकरच १ -२ दिवसात पैसे जमा होतील अशी माहिती समोर आली आहे.

मग तुमच्याही खात्यात हे पैसे आलेत का हे पाहायचंय?
आपल्या खात्यात पैसे आलेत का हे नेमकं कस समजेल हे जाणून घेऊया. तर खाली दिलेले चार अगदी सोप्पे, वेळ वाचवणारे मार्ग वापरा!
१. बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करा
जर तुम्हाला ऑनलाईन काहीतरी बघायची सवय नसेल किंवा खात्यातील रकमेबद्दल खात्री करून घ्यायची असेल, तर बँकेचा अधिकृत कस्टमर केअर नंबर डायल करा.
तुमचं खात्याचं नंबर, नाव आणि काही बेसिक माहिती विचारली जाईल.
त्यानंतर ते तुमच्या खात्याची स्थिती तपासून सांगतील की लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत का.
उदाहरण:
SBI साठी: 1800 1234 किंवा 1800 2100
Bank of Maharashtra साठी: 1800 233 4526
२. बँकेचं अॅप वापरून खात्याचं स्टेटमेंट डाउनलोड करा
जर तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल आणि मोबाईल बँकिंग अॅप तुमच्याकडे असेल, तर हे सर्वात सोपं आणि झपाट्यानं काम करणारं माध्यम आहे.
बँकेचं अॅप उघडा (उदा. YONO, MahaMobile, iMobile, HDFC Mobile App इ.)
तुमच्या खात्याचं स्टेटमेंट चेक करा किंवा डाउनलोड करा
आणि बघा, “Govt Credit”, “DBT” किंवा “Majhi Ladki Bahin Yojana” अशा नावाने कोणतीही क्रेडिट एंट्री दिसतेय का?
३. रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला SMS बघा
तुमचं बँक खातं जर मोबाईल नंबरशी लिंक केलेलं असेल, तर जेव्हाही पैशाची एन्ट्री होते, त्याच क्षणी बँकेकडून एक SMS नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतो.
तुमच्या मोबाईलमधल्या SMS अॅपमध्ये ‘Bank’ किंवा ‘Txn’ शोधा
आणि बघा, काही ‘Credit Alert’, ‘Govt Payment’ वगैरे प्रकारचं मेसेज आलाय का
४. ऑनलाईन जमलं नाही? तर बँकेत प्रत्यक्ष जा आणि विचारून घ्या
जर तुमच्याकडे स्मार्टफोन नसेल, नेटबँकिंग माहित नसेल, किंवा SMSही आलाच नसेल –
तर एकदम सोप्पं आणि खात्रीचं मार्ग म्हणजे थेट बँकेत जाऊन विचारणं.
- बँकेत तुमचं पासबुक घेऊन जा
- किंवा ATM वरून मिनी स्टेटमेंट काढा
- क्लार्क किंवा हेल्प डेस्कवर तुमचं खाते क्रमांक दाखवून विचारू शकता की, “सर, लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत का?”
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















