JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

लाडकी बहीण योजनेचं नवीन अपडेट- तक्रारी आलेले अर्ज नव्या निकषानुसार बाद ठरणार!

Ladki Bahin Application verification – अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अपात्र असतील. मात्र, ज्यांच्या अर्जाबाबत तक्रारी येतील त्यांच्याच अर्जाची पडताळणी होईल आणि त्यात तथ्य आढळल्यास त्या योजनेसाठी अपात्र ठरतील, असे महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी करून त्यातील महिलांची संख्या कमी केली जाणार असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यात तथ्य नाही. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Ladki Bahin Update 2025 Details

अर्जाची पडताळणी निकष

  • कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न
  • घरात कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन
  • शासकीय नोकरी असताना घेतलेला योजनेचा लाभ
  • इतर शासकीय योजनांचा लाभ
  • विवाहानंतर परराज्यात गेलेल्या लाभार्थी

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अर्जाची पडताळणी केली जाणार नाही अथवा योजनेचे नियमही बदलले जाणार नाहीत, तक्रारी येतील अशा अर्जाची पडताळणी होईल, असे तटकरे म्हणाल्या. सध्या अर्जाची सरसकट छाननी करणार नाही. केवळ स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तक्रार दिलेल्या अर्जाचीच पडताळणी केली जाईल. गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा, हा या मागील हेतू असल्याचे त्या म्हणाल्या. आपण विनातक्रार पडताळणी करणार नाही. मात्र, अडीच लाखांच्या पुढे उत्पन्न गेले असेल, तर ती महिला योजनेसाठी पात्र राहणार नाही. या योजनेच्या हप्त्याची रक्कम २,१०० रुपये करण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेतला जाईल, असेही तटकरे यांनी सांगितले.

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड