लाडकी बहीण योजनेचे बँक खात्यात पैसे आले नाही? ‘इथे’ नोंदवा आपली तक्रार, अर्ज होईल फटाफट मंजूर!
Ladki bahin application form rejection
आपल्याला माहीतच आहे, पूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या आर्थिक वर्षात योजनेसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.या योजनेच्या अतंर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, काही महिलांच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीयेत. अशा परिस्थितीत नेमके काय करावे? तक्रार कुठे करावी? असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात येत आहेत. जाणून घेऊयात याबाबत अधिक माहिती. तसेच या संदर्भातील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या व्हट्सअँप चॅनल ला या लिंक वरून लगेच जॉईन करा.
4500 रुपये मिळणार
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आतापर्यंत राज्यात 1 कोटी बहिणींच्या खात्यात 3 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. बहुतांश महिलांच्या खात्यावर योजनेचे दोन हप्ते जमा झाले आहेत. या योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या लाडक्या बहिणी समाधानी झाल्या आहेत. तर काही महिलांनी उशिरा अर्ज दाखल केल्याने त्यांच्या अर्जांची पडताळणी आणि छाननी करण्यात येत आहे. ही छाननी 31 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर ज्या महिलांना अद्याप पैसे मिळाले नाहीत अशा पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात जून, जुलै आणि ऑगस्ट अशा एकूण तीन महिन्यांचे एकूण 4500 रुपये देण्यात येणार आहेत.
फॉर्म भरल्यानंतरही पैसे न आल्यास काय करावे?
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारीशक्ती दूत या मोबाईल अॅपवरुन ज्यांनी स्वतःचे किंवा अन्य लाभार्थीचे अर्ज केले असतील अशा सर्व 1) महिला 2) समूह संसाधन व्यक्ती 3) बचत गट अध्यक्ष 4) बचतगट सचिव 5) गृहिणी 6) अंगणवाडी सेविका/मदतनीस 7) ग्रामसेवक 8) वॉर्ड अधिकारी 9) सेतू 10) बालवाडी सेविका 11) आशा सेविका 12) पर्यवेक्षिका (मुख्यसेविका) 13) CMM2 14) मदतकक्ष प्रमुख यांना आवाहन करण्यात आले आहे की, नारीशक्ती दूत अॅप मधील आपल्या प्रोफाईलला लॉगीन करुन यापूर्वी केलेले अर्ज या टॅगवर क्लिक करुन आपल्याद्वारे सबमिट केलेले संपूर्ण अर्जाची यादी पाहू शकता. त्यामुळे Approved, Disapproved, Pending, Rejected असे शेरे आणि लाभार्थीचे नाव, मोबाईल नंबर सुद्धा पाहता येतील.
सर्व संबंधितांनी Disapproved असलेल्या सर्व लाभार्थ्यांना संपर्क करुन अंशतः अर्ज रद्द होण्याचे कारण View Reason या टॅबवर बघून त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन Edit Form टॅबवर जाऊन यापूर्वी केलेल्या नोंदी चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करुन Form Submit करावा, यामध्ये फक्त Form एकदाच Edit करता येईल, याची नोंद घ्यावी.
हेल्पलाईन टोल फ्री नंबर काय?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अधिक माहितीसाठी महिला व बाल विकासाच्या माहिती साठी या लिंक वर क्लिक करा येथे तुम्हाला मदतकेंद्र विषयी पूर्ण माहिती आणि मदत करणारे फोन नंबर्स दिलेले आहे. या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधून आपली तक्रार दाखल करु शकता. तसेच आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता.
कुठे तक्रार करावी?
तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनचा नंबर 98617 17171 हा आहे. या क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप करुन आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता. या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क केल्यास तुम्हाला खालील प्रश्न विचारण्यात येतील. या लिंक वर या बद्दल पूर्ण माहिती दिली आहे.
- सर्वप्रथम तुम्हाला आपली भाषा निवडण्याचा पर्याय येईल.
- पुढे जाण्यापूर्वी कृपया तुमचा विभाग निवडा.
- कृपया तुमचा जिल्हा निवडा
- पुढे जाण्यासाठी कृपया तुमचा मतदारसंघ निवडा
- कृपया तुमचे वय निवडा
- योजनेची निवड करा
- मग तुम्ही लाडकी बहीण योजना निवडल्यास तुम्हाला “जर तुम्हाला अर्ज भरण्यात काही अडचण येत असेल, तर खालील ‘मदत’ या बटणावर क्लिक करून आमच्याशी संपर्क साधा. मदत लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल.” असा मेसेज येईल.
Comments are closed.