महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठात 𝟔𝟑𝟖𝟑 पदे रिक्त, नवीन पदभरती प्रक्रिया आता…- Krushi Vidyapeeth Bharti 2025
Maharashtra Krushi Vidyapeeth Bharti 2025
Krushi Vidyapeeth Bharti 2025 – As many as 57.48 percent of the seats are vacant in the agricultural universities in the state, which are the foundation of agricultural education and research under Krushi Vidyapeeth Bharti 2025. Due to this, the functioning of the universities has been disrupted and the quality has deteriorated. But there is a lack of interest at the government level to fill these seats. The recruitment process has been stalled as the Maharashtra Council of Agricultural Education and Research has not recommended a structure, sources informed. 55.10 percent of the seats are vacant in Mahatma Phule Agricultural University, Rahuri. 66.16 percent in Vasantrao Naik Marathwada Agricultural University, Parbhani, and 63 percent in Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University, Akola. 40.98 percent of the seats are vacant in Dr. Balasaheb Sawant Konkan Agricultural University, Dapoli under Maharashtra Krushi Vidyapeeth Bharti 2025 .
कृषी शिक्षण आणि संशोधनाचा पाया असलेल्या राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये तब्बल ५७.४८ टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यापीठांचे कामकाज विस्कळीत झाले असून दर्जा खालावला आहे. परंतु या जागा भरण्यासाठी सरकारी पातळीवर अनास्था दिसून येत आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने आकृतिबंधाची शिफारस केलेली नसल्यामुळे भरतीची प्रक्रिया रखडली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात ५५.१० टक्के जागा रिक्त आहेत. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ६६.१६ टक्के, तर अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ६३ टक्के जागा रिक्त आहेत. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात ४०.९८ टक्के जागा रिक्त आहेत.
विद्यापीठांमध्ये अ, क आणि ड वर्गातील जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. तसेच महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सेवाप्रवेश मंडळाचे कामकाज गेल्या पाच महिन्यांपासून अध्यक्ष नसल्यामुळे ठप्प आहे. त्यामुळे अधिष्ठाता, संचालक, सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक आदी उच्च संवर्गातील पदांवरील नियुक्त्याही रखडल्या आहेत. रिक्त पदांमुळे सध्या विद्यापीठांमध्ये ‘प्रभारी’ राज सुरू आहे. राजकीय हस्तक्षेपाने महत्त्वाच्या पदांची ‘प्रभारी’ जबाबदारी मिळविण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांमध्ये नाराजी आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मंत्रालयात याबाबत विचारणा केली असता कृषी परिषदेने आकृतिबंधाची अद्याप शिफारस केली नसल्याचे सांगण्यात आले. तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना रिक्त पदांचा आढावा घेऊन तातडीने आकृतिबंध तयार करून पाठवावा, अशी सूचना परिषदेला केली होती. मात्र, त्याकडे फारशा गांभीयनि पाहिले गेले नाही.