खुशखबर! ‘राज्यातील केंद्रप्रमुख पदोन्नतीचा मार्ग मोकळा’;अधिसूचना आली, पात्र शिक्षकांना दिलासा! – Kendra Pramukh Bharti 2025
Kendra Pramukh News 2025
Maharashtra Kendra Pramukh Bharti Updates 2025
राज्यातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षण विभागांकडील पर्यवेक्षीय यंत्रणेतील महत्त्वाचा दुवा असलेली केंद्र प्रमुख पदाची असंख्य पदे रिक्त आहेत. ग्रामविकास व शालेय शिक्षण विभागाकडून वेळोवेळी काढलेल्या सरकारी सरकारी निर्णय व परिपत्रकांमुळे ही पदे भरण्यामध्ये एकवाक्यता येत नव्हती. परिणामी राज्यभर ही पदे रिक्त राहिली होती. आता दीर्घकाळ रिक्त असलेली केंद्रप्रमुख पदे भरण्यासाठी एकसंध धोरण निश्चित झाल्यामुळे प्राथमिक शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने १८ जुलै रोजी अधिसूचना जाहीर केली आहे. त्यात केंद्रप्रमुख या पदासाठी मुख्याध्यापक व प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त असलेल्या शिक्षकांना पात्र ठरवले आहे. राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये पदवीधर व बी. एड. अर्हता प्राप्त शिक्षक कार्यरत आहेत. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत अध्यापन करतात आणि त्यांचे पदनाम ”प्राथमिक शिक्षक” असे आहे.
या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेची माहिती येथे तपासा...!! सर्व अपडेट्स आम्ही या टेलिग्राम वर प्रकाशित करत राहू, तेव्हा लगेच जॉईन करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मात्र, सरकारच्या अधिसूचनेत फक्त ”प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक)” या पदनामावर भर देण्यात आला आहे. दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने निर्गत केलेल्या सरकारी निर्णय व परिपत्रकांमुळे पदोन्नती प्रक्रियेमध्ये स्पष्टता येण्याऐवजी अधिक गुंतागुंत निर्माण झाली होती. काही जिल्हा परिषदांमध्ये फक्त सेवाज्येष्ठतेद्वारे तर सोलापूर जिल्हा परिषदेने विषयनिहाय वर्गीकरण करून पदोन्नती दिली होती.
लवकर पदोन्नतीची अपेक्षा
सोलापूर जिल्हा परिषदेने १६ आॅक्टोबर २०२३ रोजी विषयनिहाय वर्गीकरण करुन पदोन्नती दिली होती. त्यातूनही सहा वर्षे विषय शिक्षक म्हणून सेवेचा अनुभव असलेले विज्ञान – गणित विषयांचे पदवीधर शिक्षक न मिळाल्याने जवळपास २० पदे रिक्त राहिली होती. यासंबंधी अनेक शिक्षक वेगवेगळे मुद्दे घेऊन न्यायालयातही गेले असून एकूण सहा याचिका दाखल झाल्या आहेत. न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे मागील दीड – दोन वर्षांपासून सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेली पदेदेखील भरता आली नव्हती. मात्र, या अधिसूचनेमुळे धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये एकसूत्रीपणा येण्यासाठी मदत होणार असल्याने पात्र शिक्षकांना लवकर पदोन्नती मिळण्याची अपेक्षा आहे.
अधिसूचनेची ठळक वैशिष्ट्ये
- केंद्र प्रमुख पदावरील नियुक्ती ही पदोन्नती आणि निवडीद्वारे अनुक्रमे ५० – ५० टक्के या प्रमाणात होईल.
- प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) म्हणून किमान सहा वर्षांची अखंड सेवा आवश्यक.
- ज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नती होईल.
- निवड स्पर्धा परीक्षेद्वारे गुणवत्तेवर आधारित असेल.
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अनिवार्य; दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेली व्यक्ती अपात्र ठरेल.
- नियुक्तीच्या जिल्ह्यात कार्यरत राहील. इतर जिल्ह्यांत बदली, प्रतिनियुक्ती मिळणार नाही.
नवीन अधिसूचनेचा परिणाम
– राज्यभरात केंद्रप्रमुख पदे भरतीसाठी मार्ग मोकळा
– पात्र शिक्षकांसाठी पदोन्नतीची संधी
– प्रक्रियेत एकसूत्रीपणा आणि स्पष्टता
– न्यायालयीन वाद टाळण्यास मदत
केंद्रप्रमुख पदोन्नतीप्रकरणी न्यायालयात सहा याचिका दाखल आहेत. न्यायालयाने केंद्रप्रमुख पदोन्नतीस स्थगिती दिली आहे. त्यामुळे सध्या पदोन्नती देता येणार नाही. न्यायालयीन आदेशानुसार निर्णय घेण्यात येईल.
कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
सोलापूर जिल्ह्याची आकडेवारी
-
- एकूण मंजूर पदे १९९
- कार्यरत पदे १४९
- रिक्त पदे ५०
Kendra Pramukh Bharti 2023: On 27th September, 2023, the qualification of the said examination has been revised and for the appointment of the primary teachers in all the Zilla Parishads of the state of Maharashtra to the post of Cluster Head of the Center through the Departmental Limited Competitive Examination, the examination “Kendrapramukh Departmental Limited Competitive Examination 2023” will be organized online and the date of the examination will be announced on the website as soon as possible.
However, from the eligible candidates through online system on the website www.mscepune.in can apply from 01/12/2023 to 08/12/2023. An online application form and fee payment should be processed by 23.59 hrs. Candidates who have already successfully filled the application form online with all the qualifications along with proper fee need not apply again.
दि २७ सप्टेंबर, २०२३ अन्वये सदर परीक्षेच्या अर्हतेबाबत सुधारणा करण्यात आली असून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३” या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार असून परीक्षेचा दिनांक यथावकाश संकेतस्थळावर कळविण्यात येईल. तरी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीव्दारे www.mscepune.in या संकेतस्थळावर दि. ०१/१२/२०२३ ते दि. ०८/१२/२०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र व शुल्क भरण्याची कार्यवाही करावी. यापूर्वी सर्व पात्रतेसह यशस्वीरीत्या ऑनलाईन पध्दतीने योग्य शुल्कासह आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना पन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
Application process for Kendra Pramukh Recruitment 2023 has resumed. Interested and eligible candidates can submit their applications online from 01 December 2023 to 08 December 2023. Maharashtra State Education Department had announced Kendra Pramukh Recruitment 2023 in June 2023 for the recruitment of total 2384 Kendra Pramukh posts in various districts of Maharashtra.
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा – 2023 आवेदनपत्र भरताना येणार्या अडचणी साठी [email protected] या ईमेल वरती संपर्क साधावा .
How To Apply For Maharashtra Kendra Pramukh Bharti 2023
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करतांना उमेदवाराने स्वत:चा शालार्थ आयडी अचूकपणे नमूद करणे अनिवार्य आहे.
- ऑनलाईन पध्दतीने परीक्षा परिषदेस सादर केलेल्या अर्जाच्या प्रतीसह अर्ज केल्याबाबतची माहिती उमेदवाराने स्वतः आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेस कळविणे आवश्यक आहे.
- सदर लिंक अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक ०८/१२/२०२३ रोजी पर्यंत सुरु राहील.
- त्यानंतर सदर लिंक बंद केल्या जाईल. त्यामुळे विहित मुदतीत अर्ज सादर करण्याची जबाबदारी ही उमेदवारांची राहील.
- ऑनलाईन अर्ज करण्याची लिक खाली दिलेली आहे, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.
- विहीत पध्दतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी
Important Date For MSCE Cluster Head Bharti 2023
Maharashtra Kendra Pramukh Vacancy 2023 Dates |
||
कार्यक्रम | जुन्या तारखा | नव्या तारखा |
केंद्रप्रमुख भरती 2023 अधिसूचना | 05 जून 2023 | |
केंद्रप्रमुख भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 06 जून 2023 | 01 डिसेंबर 2023 |
केंद्रप्रमुख भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 जून 2023 | 08 डिसेंबर 2023 |
केंद्रप्रमुख भरती परीक्षा 2023 | जून 2023 च्या शेवटच्या आठवड्यात | Will Be announced soon |
Important Events | Dates | REOPEN |
---|---|---|
Commencement of on-line registration of application | 06/06/2023 | 01/12/2023 |
Closure of registration of application | 15/06/2023 | 08/12/2023 |
Closure for editing application details | 15/06/2023 | 08/12/2023 |
Last date for printing your application | 30/06/2023 | 23/12/2023 |
Online Fee Payment | 06/06/2023 to 15/06/2023 | 01/12/2023 to 08/12/2023 |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For MSCE Kendra Pramukh Application 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/qHPZ2 |
???? ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/xzCHR |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.mscepune.in |
Educational Qualification For Maharashtra Shikshak Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
केंद्रप्रमुख | 1. फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
2. जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए. / बी. कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. किंवा 1. प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून ३ वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. 2. विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष राहील. |
Salary Details For MSEC Pune Bharti
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
केंद्रप्रमुख | Rs.41,800/- to Rs.1,32,300/- |
How To Apply For Maharashtra Shikshak Jobs
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करतांना उमेदवाराने स्वत:चा शालार्थ आयडी अचूकपणे नमूद करणे अनिवार्य आहे.
- ऑनलाईन पध्दतीने परीक्षा परिषदेस सादर केलेल्या अर्जाच्या प्रतीसह अर्ज केल्याबाबतची माहिती उमेदवाराने स्वतः आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेस कळविणे आवश्यक आहे.
- त्यानंतर सदर लिंक बंद केल्या जाईल. त्यामुळे विहित मुदतीत अर्ज सादर करण्याची जबाबदारी ही उमेदवारांची राहील.
- ऑनलाईन अर्ज करण्याची लिक खाली दिलेली आहे, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.
- विहीत पध्दतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी
Exam Pattern – परीक्षेचे स्वरूप:-
- परीक्षेचे टप्पे :– एक – लेखी परीक्षा
- परीक्षेचे स्वरूप:- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
- प्रश्नपत्रिका :– एक
- एकुण गुण:– २०० लेखी परीक्षेची योजना व सविस्तर अभ्यासक्रम: – परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. सदर 200 गुणांची राहील व त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील. परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे घटक व गुणांकन राहील :-
Selection Process For Maharashtra State Examination Council Pune Recruitment
- लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल
- जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही
- भरती प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस यादी / निवड यादी तयार करतांना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांचे क्रमांकन / प्राधान्य क्रमवारी सा.प्र.वि. शासन निर्णय दि. ०५/१०/२०१५, शासन पूरकपत्र दि. ०२/१२/२०१७ तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार निश्चित करण्यात येईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी
Maharashtra Shikshak Vacancy details
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Maharashtra State Examination Council
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/adwHJ |
???? ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/orK37 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.mscepune.in |
Table of Contents
केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा कधी होणार आहे सर्व जण वाट पाहत आहे ती लवकर घ्यावी ही विनंती
Finally recruitment for center head posts in all zilla parishads has started, apply immediately; Know complete information