महाट्रान्स्को आणि नोएडा मेट्रोत नोकरीची संधी!-Job Opportunity in Mahatransco & Noida Metro!
Job Opportunity in Mahatransco & Noida Metro!
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. कंपनीच्या ७ परिमंडल कार्यालयांत – अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे आणि वाशी येथे भरती होणार आहे.
महाट्रान्स्कोमध्ये निम्नस्तर लिपिक पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण २६० पदे रिक्त आहेत. इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या नोकरीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. अर्ज प्रक्रिया १० मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. ही नोकरी कायमस्वरूपी मिळण्याची संधी आहे.
महाट्रान्स्कोमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे वाणिज्य शाखेतील पदवी आणि एमएससीआयटी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी ६०० रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी ३०० रुपये आहे.
भरतीसंबंधी अधिक माहिती mahatransco.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली जाणार आहे.
नोएडा मेट्रोत नोकरी
सध्या नोएडा मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. जनरल मॅनेजर पदासाठी ही भरती होणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मार्च २०२५ आहे. निवड झालेल्या उमेदवारांना १ लाख ते २.८ लाख रुपये प्रति महिना पगार मिळेल. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.