Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नोकरभरती

Job Openings in Gramin Region

Job Openings in Gramin Region – एफएमसीजी कंपन्या आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांनी देशाच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नोकरभरती करण्यास सुरुवात केली आहे. गेले दोन ते अडीच महिने या क्षेत्रांमध्ये करोनामुळे सुस्ती आली होती. मात्र, आता परिस्थिती हळूहळू का होईना पूर्वपदावर येत आहे. नोकरभरतीसाठी मदत करणाऱ्या कंपन्या रँडस्टँड इंडिया आणि टीमलीजच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एफएमसीजी कंपन्यांनी आता ग्रामीण भागात लक्ष केंद्रित केले आहे.

 

विक्री, वितरणासाठी मागणी अधिक

रँडस्टँड इंडियाच्या यशाब गिरी यांच्या मते गेल्या महिनाभरात देशातील बहुसंख्य भागातील लॉकडाउन मागे घेण्यात आल्याने एफएमसीजी कंपन्यांनी नोकरभरतीला सुरुवात केली आहे. एफएमसीजी कंपन्यांकडून ग्रामीण भागासाठी मोठ्या प्रमाणात विक्री आणि वितरणाशी संबंधित लोकांची मागणी करण्यात येत आहे. टीमलीजच्या सुदीप सेन यांच्या मते कंपन्या नोकरभरती करताना छोट्या शहरांच्या आणि ग्रामीण भागांच्या गरजा समजण्याचा प्रयत्न करीत आहेत. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रिन्हर्स मायग्रेशन आणि मनरेगा अंतर्गत रोजगार देण्यात झालेल्या वाढीमुळे एफएमसीजी कंपन्यांनी ग्रामीण भागातील नोकरभरतीसाठी प्रयत्न चालवले आहेत.

8 हजार पोलिस पदांची भरती लवकरच सुरु होणार

ग्रामीण भागात वाढणार रोजगार

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयआय) आकडेवारीनुसार ग्रामीण भागात रोजगार वाढल्यामुळे २१ जूनला संपलेल्या आठवड्यात बेरोजगारीचा दर घसरून ७.३ टक्क्यांवर आला आहे. याच कालावधीत शहरी भागातील बेरोजगारीचा दर ११.२ टक्क्यांवर आला आहे. या संकेतांमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपन्यांच्या विक्रीतही वाढ होण्याची शक्यता आहे. एफएमसीजी कंपन्यांची एक तृतीयांश आणि वाहन उद्योगांची २० टक्के विक्री ग्रामीण भागात होते.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

17 Comments
  1. Ramesh gaikwad says

    Veterinary fild job ahe ka. My. Education LSS. +BA. Nanded.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड