Jivannoti Yojana Details – लाभ घ्या केंद्राची जीवनोन्नती योजना आणि पात्रता
Jivannoti Yojana Details
Jivannoti Yojana Details – भारतातील ग्रामीण भागातील दारिद्र्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करण्यावथ विशेष भर देण्यात आला आहे. म्हणजेच दारिद्र्य निर्मूलन आणि महिला सक्षमीकरण असा दुहेरी उद्देश या योजनेच्या अंमलबजावणीमागे केंद्र सरकारने ठेवला आहे. या अभियानांतर्गत समाजातील गरिबांतील गरीब शोध घेणे, त्यांची संस्था निर्माण करणे. या निर्माण करण्यात आलेल्या संस्थेमार्फत गरिबांना आर्थिक मदतीच्या सेवा पुरविणे, या संस्थांची क्षमतावृद्धी करणे आणि संबंधित गरिबांसाठी उपजिविकेची खात्रीशीर साधने उपलब्ध करून देणे, ही या अभियानाची उद्दिष्टे आहेत.
हे अभियान म्हणजे पूर्वाश्रमीच्या सुवर्ण जयंती ग्रामस्वरोजगार योजनेचे सुधारित प्रारुप आहे. ही ग्रामस्वरोजगार योजना बंद करून, तिचेच रुपांतर ग्रामीण जीवनोन्नती अभियानात करण्यात आलेले आहे. या नव्या अभियानांतर्गत महिलांच्या सक्षमीकरणासाठी आता दशसुत्रीचा अवलंब केला जात आहे. केंद्र सरकारचा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हा विभाग जिल्हा परिषदांच्या कार्यालयात असतो.
योजनेचे पात्रता निकष (Rashtriya Gramin Jivannoti Yojana Eligibility )
– गावनिहाय गरीब व्यक्तींचा लक्ष्य गट स्थापन केला जातो
– या गटांना ग्रामसभेची मान्यता बंधनकारक असते
– किमान दहा व कमाल २० जणांचा लक्ष्य गट असावा लागतो
– दारिद्र्यरेषेखालील व मागासवर्गीय महिलांना प्राधान्य
– गटाची दरमहा बचतीची तयारी असावी
– संस्थांची उभारणी व संस्था बांधणी आवश्यक
– संस्थाचे वर्गीकरण व बळकटीकरण असणे अनिवार्य
– बचत गटांची क्षमताबांधणी व बँक जोडणी पुर्ण असावी
– दशसुत्रीच्या आधारे बचत गटांचे श्रेणीकरण झालेले असावे
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आवश्यक कागदपत्रे (Documents For Jivannoti Yojana)
– विहित नमुन्यातील अर्ज
– निश्र्चित करण्यात आलेल्या लक्ष्य गटाची यादी
– दारिद्र्यरेषेचे प्रमाणपत्र
– मागासवर्गीयांचे जातीचे प्रमाणपत्र
– गटप्रमुखाची दोन छायाचित्रे
How to Apply For Jivannoti Yojana Details – अर्ज कोठे कराल?
याबाबतचा विहित नमुन्यातील अर्ज हा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) कार्यालयात उपलब्ध असतो. यासाठी या विभागाच्यावतीने तालुकानिहाय गट समन्वयक नियुक्त केले आहेत. या गट समन्वयकांच्या माध्यमातून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात अर्ज करावा लागतो.
मी .विकीराज कांबळे.मला जाबॅ पाहिजे आहे.मी कोल्हापूर मध्ये राहतो.
IS THERE ANY VACANCCY CURRENTLY IN UMED ABHIYAN- GRAMIN JIVNNOTI ABHIYAN FOR SATARA DISTRICT?
मला रोज च्या अपडेट द्यावे
No
जितुर येथे गट समन्वयक कोण आहे त्याचा मो ़़नं मिळेल का