जेईई मेन २०२०: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना जारी
JEE Main 2020 Notification
JEE Main 2020 application correction for UPSC NDA candidates: जे विद्यार्थी जेईई मेन २०२० परीक्षा देणार आहेत, त्यांच्यासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी या संस्थेने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जेईई मेन परीक्षार्थींसाठी एक नोटीस जारी केली आहे. यात परीक्षार्थींना दिल्या जाणाऱ्या एका संधीबद्दलची माहिती आहे.
जे विद्यार्थी यावर्षी जेईई मेन परीक्षा देत आहेत आणि यूपीएससी एनडीए एनए (UPSC NDA NA) परीक्षा देखील देत आहेत त्यांच्यासाठी हे संधी देण्यात आली आहे. मे महिन्यातील जेईई मेन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता सप्टेंबरमध्ये होत आहे आणि जेईई मेन व एनडीए या दोन्ही परीक्षा एकाच वेळी आल्याने क्लॅश होत आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी दोन्ही परीक्षांना बसणार आहेत, त्यांनी एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीला तसे कळवायचे आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नोटीशीत असं म्हटलं आहे की अशा विद्यार्थ्यांसाठी जेईई मेनच्या अर्जांमध्ये दुरुस्ती करण्याची संधी दिली जाईल. जर तुम्ही जेईई मेन आणि यूपीएससी एनडीए दोन्हीसाठी अर्ज केला असेल, तर जेईई मेनच्या अर्जात तशी माहिती नमूद करा. अर्जात सुधारणा करण्यासाठी तुमच्याकडे ३१ जुलै २०२० पर्यंतची मुदत आहे. जेईई मेनच्या संकेतस्थळावर त्याबाबतची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. या संकेतस्थळाची लिंक आम्ही या वृत्ताच्या अखेरीस देत आहोत.
जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर २०२० दरम्यान होणार आहे. यूपीएससी एनडीए एनए परीक्षा ६ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. अर्थात दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा यामुळे गोंधळ उडू शकतो. म्हणूनच जे विद्यार्थी दोन्ही परीक्षा देणार आहेत, त्यांनी तशी माहिती जेईई मेन २०२० परीक्षेच्या अर्जात नमूद करायची आहे.
JEE अधिकृत वेबसाईट – https://jeemain.nta.nic.in/webinfo/public/home.aspx
सोर्स : म. टा.