मराठा विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रासाठी आणखी दोन महिने – Jaticha Dakhla Documents – Caste Certificate Document List in Marathi
Jaticha Dakhla Documents - Caste Certificate Document List in Marathi
Jaticha Dakhla Documents : सीईटीद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमात ईडब्ल्यूएस कोट्यातील आरक्षित जागांवर प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आवश्यक जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दोन महिन्यांचा अतिरिक्त कालावधी देण्यात येईल, असे आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत दिले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, सीईटीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस कोट्यातून अर्ज केले होते. तोपर्यंत मराठा समाजाला एसईबीसी म्हणजेच आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण दिले गेले नव्हते. परंतु, राज्यातील सुमारे १८०० विद्यार्थ्यांपैकी सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी नंतर एसईबीसी प्रमाणपत्र मिळविले. उर्वरित विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देऊन प्रवेशासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांना प्रवेश देण्यात आलेला नाही. यावर पाटील म्हणाले, जानेवारी महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. तर मराठा आरक्षण मार्चमध्ये देण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस कोटा प्रमाणपत्र सादर केले आहे, त्यांनी केंद्र सरकारने दिलेले प्रमाणपत्र सादर केले आहे. जातीय आरक्षण मिळाल्यावर ईडब्ल्यूएस आरक्षण आपोआप संपते, असा नियम आहे. यामुळे त्यांना सीईटी प्रवेश प्रक्रियेपासून दूर राहावे लागले. यापूर्वीही विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रमाणपत्रासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. परंतु कायद्याचे आकलन नसल्याने या विद्यार्थ्यांनी एसईबीसी प्रमाणपत्र सादर केले नाही..
घरूनच ऑनलाईन Caste Certificate कस काढायच पूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्र, कसा कराल अर्ज!
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Jaticha Dakhla Documents – Caste Certificate Document List in Marathi – These documents are usually required for verification purposes to prove one’s caste for obtaining a caste certificate in Maharashtra. However, the specific requirements might vary slightly depending on the issuing authority and the purpose for which the caste certificate is being obtained. It’s advisable to check with the local authorities or the concerned department for the most accurate and up-to-date information.
महाराष्ट्रात किंवा देशातील कोणत्याही राज्यामध्ये शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास जातीचे प्रमाणपत्र सादर करावं लागतं. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ते निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना जातीचे प्रमाणपत्र हे महत्वाचे कागदपत्र मानले जाते. शालेय शिक्षण सुरु असताना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. हे प्रमाणपत्र महाविद्यालीन विद्यार्थी, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आवश्यक असते. जातीचे प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेल्या आपले सरकार पोर्टलवर देखील उपलब्ध होते. तुम्हाला जो पर्याय सोपा वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही हे प्रमाणपत्र मिळवू शकता. आपले सरकारच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही प्रमाणपत्र मिळवू शकता. या बद्दलची पूर्ण माहिती आम्ही खाली दिलेली आहे.
दहावी- बारावीच्या निकालानंतर आता पुढील व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र (जात वैधता प्रमाणपत्र) आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास १०० ते १५० विद्यार्थ्यांचे अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्राप्त होत आहेत.
मुदतीची वाट न पाहता विद्यार्थ्यांची गरज पाहून त्या अर्जांवर समितीकडून दोन ते तीन आठवड्यात निर्णय घेतला जात आहे.
बारावीनंतर विद्यार्थी अभियांत्रिकी, फार्मसी, नर्सिंग, मेडिकलसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. दहावीनंतर काही विद्यार्थी पॉलिटेक्निकला जातात. अशावेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांच्याकडील जात प्रमाणपत्राची पडताळणी प्रमाणपत्र (जात वैधता प्रमाणपत्र तथा व्हॅलिडीटी) द्यावे लागते.
ऐनवेळी ते प्रमाणपत्र न मिळाल्याने विद्यार्थ्याला त्याच्या आवडीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नाही. पण, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून विद्यार्थ्यांना वेळेत दाखले दिले जात आहेत. मात्र, विद्यार्थ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव समितीकडे वेळेत सादर करणे आवश्यक असल्याचे समितीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अर्जातील त्रुटींची पूर्तता काही दिवसांत करावी, असेही त्यांचे आवाहन आहे.
दरम्यान, संशयित प्रकरणात समितीचे अधिकारी संबंधित शासकीय विभागांकडून मूळ कागदपत्रांची मागणी करतात तर काही प्रकरणात दक्षता पथकाकडून गृहचौकशी देखील केली जाते, असेही समितीच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
असे द्यावे लागतील पुरावे
- एससी : १९५० पूर्वीचा जातीची नोंद असलेला पुरावा
- व्हीजेएनटी (अ, ब, क, ड) : १९६१ पूर्वीचे जातीचा पुरावा
- ओबीसी, एसबीसी, एसईबीसी : १९६७ पूर्वीचे पुरावे
विद्यार्थ्यांनी तातडीने परिपूर्ण कागदपत्रांसह करावेत अर्ज
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीच अर्ज करावेत. प्रमाणपत्र देण्याचा कालावधी जरी ४५ ते ६० दिवसांचा असला, तरीदेखील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कोणतीही अडचण येणार नाही, यादृष्टीने त्यांच्या अर्जांवर दररोज कार्यवाही केली जात आहे. विद्यार्थ्यांनी योग्य पुराव्यानिशी ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज करावेत, त्रुटी असल्यास त्याची तातडीने पूर्तता करावी.
– सचिन कवले, सदस्य सचिव, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सोलापूर
विद्यार्थ्यांनी हे आवर्जून लक्षात ठेवावे…
- विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी सुरवातीला ‘बार्टी’च्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा.
- ऑनलाइन अर्ज भरल्याची प्रिंट व आवश्यक कागदपत्रांसह तो प्रस्ताव ऑफलाइन पद्धतीने सात रस्ता येथील समितीच्या कार्यालयात द्यावा.
- विद्यार्थ्यांनी स्वतःचा अचूक मोबाईल क्रमांक व ई-मेल ॲड्रेस अर्जासोबत द्यावा, जेणेकरून अर्जाच्या त्रुटींची माहिती त्यावर समजू शकेल.
-
परिपूर्ण प्रस्ताव सादर केलेल्या विद्यार्थ्यांची ‘व्हॅलिडिटी’ त्याच्या ई-मेलवर ऑनलाइन पद्धतीने देखील पाठविली जाईल.
Caste certificate is a documentary proof which certifies that an individual belongs to a particular caste. Caste certificate is an essential document through which the citizens of Maharashtra state can avail the various kinds of benefits. In this article, we look at the guidelines for obtaining caste certificate in Maharashtra.
Cast certificate documents in Marathi
Cast certificate documents in marathi are given below. Candiates can check the list of documents given below. The list of document is required for applying Caste Certificate Application process.
जातीचे प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे
ओळखीचा पुरावा: पॅन कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी एक कागदपत्रं
पत्ता दर्शवणारा पुरावा :पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पाणी बील, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, वीज बील, घरफळा पावती, सातबारा किंवा 8 अ उतारा, यापैकी एक कागदपत्रं
जातीचा पुरावा दर्शवणारी आवश्यक कागदपत्रे
- जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी ज्याचे प्रमाणपत्र काढायचे आहे त्याचे जात दर्शवणारे कागदपत्र आवश्यक असते. अर्जदार, त्याचे वडील अथवा आजोबांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा,
- अर्जदार अथवा अर्जदाराच्या वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला लागतो. हे उपलब्ध नसल्यास इतर कागदपत्रांपैकी एक कागदपत्रं सादर करावे लागते.
- वडील अथवा जवळच्या नातेवाईकाचा जन्म नोंदवहीचा उतारा
- वडील अथवा जवळच्या नातेवाईकाच्या जात/समाजाचा उल्लेख असणारा शासकीय सेवा नोंदवहीचा उतारा
- सामाजिक न्याय विभागाने जारी केलेले जात प्रमाणित करणारे कागदपत्र-अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकासाठी छाननी समितीने जारी केलेले वैधता प्रमाणपत्र
- ग्राम पंचायत नोंद अथवा महसूल नोंदीची प्रत
- जात अधिसूचित होण्याच्या तारखेपूर्वीच्या निवासाचे साधारण ठिकाण आणि जातीसंदर्भातील कागदोपत्री पुरावे
- सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले अन्य संबंधित कागदोपत्री पुरावे
जात प्रमाणपत्र काढताना एखादे कागदपत्र नसल्यास त्याऐवजी कोणते कागदपत्रं जोडायचे याची यादी आपले सरकार आणि शासनाच्या वेबसाईटवर मिळू शकते. किंवा नजीकच्या सेतू कार्यालयात संपर्क करा. आपले सरकार पोर्टलवर एकूण 52 प्रकारच्या कागदपत्रांची यादी देण्यात आली आहे त्यापैकी एक कागदपत्र सादर करावं लागते.
आपले सरकार पोर्टल वर जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती पाहण्यासाठी क्लिक करा
लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे
वडिलांच्या जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यास नातेवाईकाचे जात प्रमाणपत्र आणि नातेवाईकासोबतच्या नात्याचा तपशील देणारे वंशावळीचे शपथपत्र जोडावे लागते.
स्वंयघोषणापत्र
जात प्रमाणपत्र स्वंयघोषणापत्र भरु द्यावं लागते. हे सर्वांसाठी अनिवार्य असून अर्जासोबत भरुन द्यावं लागतं.
आपले सरकार पोर्टलवर किंवा तहसीलदार कार्यालयात वरील सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर 21 दिवसांच्या कालावधीमध्ये तुमचा अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रं अपलोड केलेली असतील मंजूर होईल आणि तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र मिळून जाईल.
Caste certificate Aaple Sarkar
आपले सरकारवरुन अर्ज कसा करायचा?
आपले सरकारवर नवीन वापरकर्ता नोंदणी या लिंकवरुन नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून तुमचं लॉगीन तयार करुन घ्या. लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्डवर विविध विभाग पाहायला मिळतील त्यातून तुम्ही महसूल विभाग निवडा. त्यातून पुढे महसूल सेवा निवडा. तिथून जातीचे प्रमाणपत्र हा पर्याय निवडा. पुढे ओपन होणाऱ्या विंडोमध्ये आवश्यक कागदपत्रांची यादी वाचून घ्या, त्याप्रमाणं ती तयार ठेवा कारण ती वेबसाईटवर अपलोड करावे लागते. तिथुन पुढील वेबसाईटवर जाऊन वैयक्तिक माहिती, पत्ता, किती वर्षांपासून त्या पत्त्यावर राहतो ती माहिती सादर करावी. 18 वर्षांपेक्षा कमी असणाऱ्या व्यक्तीचं प्रमाणपत्र काढायचं असेल तर लाभार्थ्याची माहिती तिथे माहिती सादर करावी. अपलोड करायची असलेली कागदपत्रे 75 केबी ते 500 केबीच्या दरम्यान असावीत.सर्व कागदपत्रे अपलोड करा. फोटो आणि सही देखील अपलोड करावेत. यानंतर अर्ज सादर करावा आणि अर्जाचं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरावा. जी पावती मिळेल ती सेव्ह करुन ठेवावी.
21 दिवसांमध्ये प्रमाणपत्र
आपले सरकारवरुन अर्ज सादर केल्यानंतर 21 दिवसांपर्यंत आपल्याला जात प्रमाणपत्र मिळेल. काही अडचणीमुळे प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास 15 दिवसानंतर आपले सरकारच्या वेबसाईटवर लॉगीन करुन अपील अर्ज सादर करु शकता.
List of Documents Required For Caste Certificate
To obtain caste certificate in Maharashtra, submit the following documents along with the application:
- Application form
- Residence proof
- Copy of birth certificate
- Copy of ration card
- Copy of income certificate
- Copy of voter ID card or electoral roll
- Aadhaar Card
- Photograph
List of cast certificate documents in marathi
Following is the List of Documents required for cast certificate 2024. Go through the following article carefully. You can submit your Cast certificate Application from following given links.
- आधार कार्ड (Aadhar Card)
- जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate)
- स्कूल / कॉलेज / शैक्षणिक संस्थेचे अनुभव प्रमाणपत्र (School/College/Educational Institution’s Experience Certificate)
- राहण्याचे प्रमाणपत्र (Residential Certificate)
- शेतकरी पुरावा (Farmer Certificate)
- जातीचे सर्टिफिकेटचे नमुना (Sample of Caste Certificate – if applicable)
- व्यक्तिचे पासवर्ड आणि आधार क्रमांक (Individual’s Passport and Aadhar Number)
Proof of Identity (किमान -1)
Proof of Address (किमान -1)
Other Documents (किमान -1)
Mandatory Documents(सर्व अनिवार्य)
(OBC) ओबीसी कास्ट सर्टिफिकेट डॉक्यूमेंट लिस्ट मराठी | OBC Caste Certificate document in Marathi
(ST) एसटी कास्ट सर्टिफिकेट डॉक्यूमेंट लिस्ट मराठी | ST Caste Certificate document in Marathi
(SC) एससी कास्ट सर्टिफिकेट डॉक्यूमेंट लिस्ट मराठी | SC Caste Certificate document in Marathi
(NT) एनटी कास्ट सर्टिफिकेट डॉक्यूमेंट लिस्ट मराठी | NT Caste Certificate document in Marathi
(SBC) एसबीसी कास्ट सर्टिफिकेट डॉक्यूमेंट लिस्ट मराठी | SBC Caste Certificate document in Marathi
कुणबी मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- उमेदवाराची ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड)
- पत्त्याचा पुरावा (सातबारा,रेशन कार्ड)
- वयाचा पुरावा (जन्माचा दाखला)
- शाळा सोडल्याचा दाखला
- बोनाफाईड सर्टिफिकेट
- उत्पन्नाचा दाखला
- वडिलांचा किंवा आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला
- हक्क पत्र नोंद
- वंशावळ
Table of Contents
Comments are closed.