ITI प्रवेशला आज अखेरची मुदत! – Extension for Date of Application for ITI Admission

Extension for Date of Application for ITI Admission

Extension for Date of Application for ITI Admission:  शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी ६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष प्रवेश ८ ते १२ सप्टेंबर या कालावधीत होतील, अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून देण्यात आली. ६ सप्टेंबर सायं. ५ ची मुदत आहे. कार्यवाही ७ ला सायं. पाच पर्यंत असेल.

 


आयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; नवाब मलिक यांची माहिती

चालू शैक्षणिक वर्षाकरीता सध्या सुरु असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री श्री. नवाब मलिक यांनी दिली. ही मुदत उद्या २१ ऑगस्ट रोजी संपणार होती. त्यास आता मुदतवाढ देण्यात येत आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ITI Admission 2020

सन 2015 ते सन 2019 या प्रवेशसत्रात प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या सरासरी 2.25 पट अर्ज प्राप्त झाले होते. तथापि, चालू वर्षी कोव्हीड – 19 च्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत उपलब्ध जागांच्या फक्त 1.45 पट अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत इच्छा असतानाही कौशल्य प्रशिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

१ लाख ४५ हजार जागांसाठी आतापर्यंत 2 लाख 55 हजार अर्ज

आयटीआय प्रवेशप्रक्रीया १ ऑगस्टपासून सुरू आहे. राज्यातील ४१७ शासकीय व ५६९ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ८४ व्यवसाय अभ्यासक्रमांच्या एकूण ६ हजार ८६८ तुकड्यांमधून एकूण १ लाख ४५ हजार ६३२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यापैकी अमरावती विभागात 17 हजार 984, औरंगाबाद विभागात 19 हजार 244, मुंबई विभागात 19 हजार 948, नागपूर विभागात 28 हजार 136, नाशिक विभागात 29 हजार 500, पुणे विभागात 30 हजार 820 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यासाठी 19 ऑगस्टपर्यंत 2 लाख 55 हजार 803 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 2 लाख 21 हजार 585 विद्यार्थ्यांनी शुल्क अदा कलेले असून त्यापैकी 2 लाख 07 हजार 285 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठीचे विकल्पही भरले आहेत. यावरून नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 48 हजार 518 विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण केली नसल्याचे निर्दशनास येते. प्रवेश अर्ज मोबाईल व्दारे देखिल भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

दुर्गम व ग्रामिण भागात जेथे इंटरनेट जोडणीत अडचणी आहेत तेथील विद्यार्थी स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अथवा अन्यत्र प्रवेश अर्ज भरण्यासाठी जात असतात. तथापि, काही भागात स्थानिक लॉकडाऊन असल्याने प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. तसेच एकुण उपलब्ध जागांच्या तुलनेत प्राप्त प्रवेश अर्ज अधिक असले तरी काही विशिष्ट व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी वा काही तालुक्यांत उपलब्ध जागांच्या तुलनेत कमी विकल्प प्राप्त झाल्याचे देखिल निदर्शनास आले आहे. नियमित प्रशिक्षण सुरू होण्यासाठी अवकाश असल्याने प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रवेश प्रोत्साहन अभियान

आयटीआय प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांना सर्व माहिती उपलब्ध व्हावी यासाठी विभागामार्फत प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आयटीआय संस्थेत दररोज समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येत आहेत. दुर्गम व ग्रामिण भागास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कर्मचारी भेट देऊन लॅपटॉपव्दारे इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेत आहेत. तसेच ज्या भागातून कमी अर्ज प्राप्त झाले आहेत त्या भागात प्रवेश अर्ज भरण्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती मंत्री श्री. मलिक यांनी दिली.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचण आल्यास त्यांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीची किंवा प्रादेशिक विभागनिहाय नेमून दिलेल्या कॉलसेंटरची मदत घ्यावी. तसेच आवश्यकता भासल्यास नजिकच्या आयटीआय संस्थेशी संपर्क साधून विहित मुदतीत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची दक्षता घ्यावी. कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वत:चे जिवनमान उंचावण्यासाठी उपलब्ध संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. मलिक यांनी केले आहे.


ITI Admission 2020 – Extension for Date of Application for ITI Admission : आयटीआय प्रवेशांना मुदतवाढ देण्यात आली आहे…२१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार….

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक आयटीआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

ITI Admission 2020

राज्यातील खासगी आणि सरकारी आयटीआयमध्ये जागांसाठी प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू झाली. अर्ज भरण्याची मुदत १४ ऑगस्टपर्यंत होती. या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली असून, सुधारित वेळापत्रक आयटीआयने जाहीर केले आहे. या प्रवेशाची प्राथमिक गुणवत्ता यादी २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना २६ ऑगस्टपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत हरकती नोंदविता येणार आहे.

प्रवेशाची पहिली फेरी ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर होईल. या यादीतील विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणार आहे. दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांना १ ते ५ सप्टेंबर या कालावधीत संस्थानिहाय प्राधान्यक्रम सादर करावे लागतील. या फेरीची यादी ९ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता जाहीर होईल.

तिसऱ्या फेरीसाठी १० ते १५ सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम सादर करावे लागतील. १८ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता निवडयादी संकेतस्थळावर जाहीर होईल. विद्यार्थ्यांना १९ ते २३ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश घेता येणार आहे.

चौथ्या फेरीसाठी १९ ते २४ सप्टेंबरदरम्यान प्राधान्य भरता येतील. या प्रवेशाची यादी २८ सप्टेंबरला जाहीर होईल. विद्यार्थ्यांना २९ ते ३ ऑक्‍टोबर या कालावधीत प्रवेश निश्‍चित करावा लागेल. प्रवेश प्रक्रिया समाप्तीनंतर रिक्त राहणाऱ्या जागा भरण्यासाठी ५ ऑक्‍टोबरपासून जिल्हास्तरावर समुपदेशन फेरी राबविण्यात येईल.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

9 Comments
  1. Kamlakarpadwal says

    मला तर वाटतंय सर कदाचित काही च ठिकाणी problem आहे आज भारतातल्या सगळ्या लोकांन कडे मोबाईल आहेत आणि हे सत्य आहे आणि ज्याला खरच शिकायची इच्छा असल तर मागेच घेतले असते addmission मला तर असं वाटतंय तारीख वाढवायची गरज नाही चुकलं असल माफ करा.

  2. chaitanya shinde says

    aapal college government aahe ka

  3. Keshav says

    सर मला आयटीआय करायचे आहे

  4. विक्रम कुंभार says

    Sir या वर्षी कॉलेज चालू होईल का।।

  5. Pankaj patait says

    सर मला आय टी आय करायचे आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड