राज्यात आठ वर्षांपासून रखडलेली 125 उपजिल्हाधिकाऱ्यांची पदोन्नती अखेर मंजूर करण्यात आली आहे. महसूल विभागाने या अधिकाऱ्यांना निवड श्रेणी पदावर पदोन्नती दिली असून, यामुळे राज्यभरातील महसूल अधिकाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पदोन्नतीचे आदेश दिले असून, लवकरच 80 अतिरिक्त जिल्हाधिकारी पदे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी राज्यसेवेतील 23 अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) बढती देण्यात आली होती. 1954 च्या नियमानुसार या अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती. राज्यातील महसूल प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
IAS पदावर बढती मिळालेले अधिकारी:
- संजय ज्ञानदेव पवार
- नंदकुमार चैतराम भेडसे
- सुनील बजाजीराव महिंद्रकर
- रवींद्र जीवाजीराव खेबुडकर
- निलेश गोरख सागर
- लक्ष्मण भिका राऊत
- जगदीश गोपाळकृष्ण मनियार
- माधवी समीर सरदेशमुख
- बाळासाहेब जालिंदर बेलदार
- डॉ. ज्योत्स्ना गुरुराज पडियार
- अण्णासाहेब दादू चव्हाण
- गोपीचंद्र मुरलीधर कदम
- बापू गोपीनाथराव पवार
- महेश विश्वास आव्हाड
- वैदही मनोज रानडे
- विवेक बन्सी गायकवाड
- नंदिनी मिलिंद आवाडे
- वर्षा मुकुंद लड्डा
- मंगेश हिरामन जोशी
- अनिता निखील मेश्राम
- गीतांजली श्रीराम बाविस्कर
- दिलीप ज्ञानदेव जगदाळे
- अर्जुन किसनराव चिखले
या निर्णयामुळे महसूल विभागातील रिक्त जागा भरल्या जाणार असून, प्रशासन अधिक सक्षम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















