राजापूर तालुक्यात शिक्षक भरतीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या संख्येने शिक्षक पदे रिक्त असून, शिक्षण विभागाला याचा सामना करावा लागत आहे. सरकारच्या शिक्षक भरती आणि जिल्हा बदली प्रक्रियेमुळे ही पदे लवकरच भरली जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, ती अद्याप अपूर्णच आहे. तालुक्यात ९२१ मंजूर शिक्षक पदांपैकी केवळ ७२१ पदे भरलेली आहेत, तर तब्बल २०० पदे रिक्त आहेत.

यात आणखी अडथळा म्हणजे नवीन संचमान्यता लागू झाल्यास २१४ पदवीधर शिक्षकांपैकी १८४ शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे आधीच रिक्त जागांचा सामना करत असलेल्या शिक्षण विभागासमोर नवीन संकट उभे राहणार आहे.
पालकांचा रोष वाढत असून, रिक्त पदांमुळे शाळांमध्ये शिक्षकांची टंचाई जाणवत आहे. याशिवाय विविध सरकारी कामांसाठी शिक्षकांना शाळेबाहेर जावे लागते, त्यामुळेही पालक अस्वस्थ आहेत. नवीन संचमान्यतेमुळे शिक्षकसंख्या आणखी घटण्याची शक्यता असल्याने शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे.
राजापूर तालुका – शिक्षक पदांची स्थिती
- मंजूर शिक्षक पदे: ९२१
- कार्यरत शिक्षक: ७२१
- रिक्त पदे: २००
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















