स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण हवे असेल तर जाणून घ्या कुठे मिळेल? ३६ जिल्ह्यांतील ३६० युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार | ISDA Scuba Diving Training 2024

ISDA Scuba Diving Training 2024

ISDA Scuba Diving Training 2024

ISDA Scuba Diving Training 2024: Are you ready to explore the mesmerizing underwater world and unlock a realm of adventure? Dive into the exhilarating world of scuba diving with ISDA comprehensive Scuba Diving Training program for 2024! Whether you’re a complete beginner or an experienced diver seeking to advance your skills, ISDA training program offers the perfect blend of theory, practical sessions, and real-life diving experiences to cater to your needs. Here all details about ISDA Scuba Diving Training 2024 In India. Check who can apply for ISDA Scuba Diving Training 2024  here.

तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्रात कोकणातील सात जिल्ह्यांतील तब्बल ७७ विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी शासनाने ५५ लाख रुपयांचा निधी संस्थेला दिला आहे. या प्रशिक्षणातून कोकणातील विद्यार्थी पर्यटन व्यवसायात आपली ओळख बनवू शकणार आहेत. यापूर्वीही शासनाने अशा प्रकारे अनुदान देऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले होते. या प्रशिक्षणाच्या खर्चाचा ९० टक्के वाटा शासन उचलणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Don’t miss out on the opportunity to embark on an adventure of a lifetime with our Scuba Diving Training program for 2024. Whether you’re seeking to explore vibrant coral reefs, encounter majestic marine creatures, or simply experience the thrill of diving, our training program promises an unforgettable journey beneath the waves. Contact us today to reserve your spot and dive into adventure!

एकूण ३६ जिल्ह्यांतील ३६० युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार

महामंडळाच्या व्यवस्थापकीय महाराष्ट्र पर्यटन विकास संचालकांनी सिंधुदुर्ग येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग आणि अॅक्वेटिक स्पोर्टस् अर्थात इसदा या प्रशिक्षण संस्थेला कोकणातील सात जिल्ह्यात हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी तब्बल ५५ लाख ७७ हजार २७७ रुपये निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षणाकरिता निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर केला होता या प्रस्तावानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पाच युवकांना स्कुबा डायव्हिंगचे व्यावसायिक प्रशिक्षण व पाच युवकांना बोट चालविणे व पाण्याशी संबंधित जीवरक्षकाचे प्रशिक्षण असे एकूण ३६ जिल्ह्यांतील ३६० युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच स्कुबा डायव्हिंगच्या व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये १८० प्रशिक्षितांपैकी उच्च गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या ३६ युवकांना दुसऱ्या टप्प्यात डाइव्ह मास्टर याचे अतिरिक्त प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरिता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ३ कोटी १८ लाख ६९ हजार ३६० रकमेचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. त्यावर तांत्रिक समिती मूल्यमापन समितीच्या बैठकीत कोकणातील सात जिल्ह्यात हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे शासनाने कोकणातील सात जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी ५५ लाख ७७ हजार २७७ रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला.

दहा टक्के रक्कम विद्यार्थी भरणार

कोकणातील सात जिल्ह्यात हे प्रशिक्षण राबविण्याकरिता ६१ २ लाख ९६ हजार एवढा निधी आवश्यक होता. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सादर केलेल्या प्रस्तावाप्रमाणे एकूण प्रशिक्षण खर्चाच्या १० टक्के म्हणजे ६ लाख १९ हजार रुपये एवढी रक्कम प्रशिक्षणार्थीकडून घेण्यात येणार आहे. उर्वरित खर्चाची ९० टक्के रक्कम शासन देणार आहे. त्यासाठी ५५ लाख ७७ हजार रुपयांची आवश्यकता एमटीडीसीकडून व्यक्त्त करण्यात आली होती. यासाठी शासनाने ही रक्कम इसदा संस्थेला वर्ग केली आहे.

सेंटरमध्ये असलेल्या सुविधा

अंदाजे पाच एकर क्षेत्रफळ असलेल्या • मालमत्तेमध्ये सुमारे २५ फूट खोलीचा २५ मीटर बाय १० मीटरचा स्विमिंग पूल आहे. ज्या गोताखोरांना समुद्रात नेण्यापूर्वी प्रशिक्षण दिले जाते. त्यांचा अनुभव आलिशान बनविण्यासाठी, प्रशिक्षण संस्थेमध्ये टेनिस कोर्ट, रेस्टॉरंट आदी सुविधा आहेत.

शासकीय अधिकाऱ्यांनाही देणार प्रशिक्षण संस्थेने डिसेंबरमध्ये भारतीय वन्यजीव संस्था आणि जर्मनीस्थित

डझनभर अधिकाऱ्यांना सागरी परिसंस्थेबद्दल प्रशिक्षण देण्यात आले. नवी मुंबई, पुणे आदी ठिकाणचे नागरी अधिकारीही त्यांच्या कर्मचाऱ्यांना इसदा येथे सागरी संवर्धन आणि बचत प्रशिक्षणासाठी प्रशिक्षित करण्यासाठी प्रस्तावांसह रांगेत उभे आहेत


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड