महाविद्यालयीन तरुणांसाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘झारखंड ग्रासरूट इनोव्हेशन इंटर्नशिप योजना’ (Jharkhand Grassroots Innovation Internship Scheme) या नव्या उपक्रमाला मंजुरी देण्यात आली आहे.

या योजनेतून राज्यातील १७,३८० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीत गावपातळीवर आठ आठवड्यांची इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला एकूण १०,००० रुपये मानधन देखील दोन टप्प्यांत दिले जाणार आहे.
राज्य सरकारच्या प्रधान सचिव वंदना दादेल यांनी सांगितले की, झारखंडमधल्या ४,३४५ पंचायतींमध्ये चार विद्यार्थ्यांचा एक गट तयार केला जाईल आणि या गटाकडून गावांमध्ये नवोपक्रम शोधण्याचे, आणि स्थानिक समस्यांचा अभ्यास करण्याचे काम केले जाईल. ही इंटर्नशिप क्रेडिट-आधारित असून, सरकारी आणि खाजगी विद्यापीठे तसेच संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी खुली असेल.
योजनेचा मुख्य उद्देश गावांमधील पारंपरिक ज्ञान, स्थानिक नवोपक्रम, आणि समस्या समजून घेणे हा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुलभूत स्तरावर समाजाशी संपर्कात राहण्याचा अनुभव मिळणार आहे.
शिक्षक भरतीत बदल – ८,९०० पदं रद्द, १३७३ नव्या माध्यमिक शिक्षक पदांची निर्मिती
त्याचवेळी झारखंड सरकारने शिक्षक भरतीबाबतही मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील टीजीटी (पदवीधर प्रशिक्षित शिक्षक) आणि पीजीटी (पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षक) यांच्या ८,९०० रिक्त पदं रद्द करण्यात आली आहेत. त्याऐवजी ५१० शासकीय प्लस टू शाळांमध्ये १३७३ नवीन माध्यमिक शिक्षकांची भरती केली जाणार आहे.
या नवीन शिक्षकांना सातव्या वेतन आयोगानुसार L-6 स्तरावर वेतन – ३५,४०० ते १,१२,४०० रुपये दिलं जाईल. याआधी टीजीटी पदांना L-7 स्तरावर ४४,९०० रुपये आणि पीजीटी पदांना L-8 स्तरावर ४७,६०० ते १,५१,१०० रुपये मिळत होते.
या निर्णयामुळे झारखंडमध्ये शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडण्याची शक्यता असून, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि शिक्षकांना नवी संधी मिळणार आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















